200

Followers

Saturday, 25 September 2021

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घरांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करा..


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी..

मोसीन कुरेशी
मंठा:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे प्रमुख हैदराबादचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरांची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोड़फोड़ केली.होती या प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे तर मंठा तालुक्यातील मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ए.आई.एमआईएम पक्षाच्या वतीने तहसील मार्फ़त राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.त्या निवेदनात म्हटले की तोडफोड करणाऱ्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी.. या निवेदनवर एमआईएम् पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख एजाज,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,जुनेद पठान,शेख खाजा,शेख अर्शद,इम्रान मणियार,रियाज शेख,लखन कामळे,इस्माइल शेख,शेख अबरार शेख, सलमान शेख,इसराइल शेख आवेस,सय्यद नवीद,मुस्तकीम, शेख रशीद,शेख सगीर,शेख अफरोज,नितिन बरसे सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे स्वाक्षर्‍या होते.

Wednesday, 15 September 2021

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत राज्य शासषणाकडून जलदगतीने मदत मिळवून देणार..आ.सुरेश जेथलिया

मंठा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्यात मा.आ.सुरेश जेथलिया यांनी व्यक्त केला विश्वास
 
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे एकप्रकारे शेतकऱ्यांवर  आस्मानी संकट कोसळले असून याबाबत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मावेजा  मिळवून  देण्याबाबत शाषणस्तरावरून देखील  जलद गतीने पाठपुरावा चालू आहे, एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास  मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केला. दिनांक 12 ऑक्टोबर  रोजी मंठा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या  नुकसान पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी  बोलताना पुढे म्हटले की, झालेल्या नुकसणीबाबत युद्धय पातळीवर पंचनामे करत संबधीत शेतकरयांना मावेजा मिळण्याबाबत मी वरिष्ट नेत्यांकडे मागणी केली असून चर्चाही झाल्याचे त्यांनी म्हटले . तालुक्यातील ढोकसाळ येथे अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटले.जवळपास सर्वच विहिरी गाळाने भरल्या गेल्या व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले.झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली व तसेच मा.ना.बाळासाहेबजी थोरात साहेब यांना संपूर्ण मतदारसंघातील परिस्तिथीचा अहवाल पाठवून महसूल विभागाला लवकरच वरिष्टांकडून योग्य त्या सूचना मिळवून देण्यासाठी आदेशित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी  त्यांच्यासोबत किसनराव मोरे ,हरिभाऊ देशमुख ,निळकंठराव वायाळ ,अण्णासाहेब खंदारे ,दिलीपराव चव्हाण ,लक्ष्मण शिंदे ,वसंतराव देशमुख,रंजीत देवकर ,अमर देशमुख ,बाळासाहेब देशमुख ,सारंगधर देशमुख ,सुरेश देशमुख ,ऍड भागवत देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्तिथ होते.

Thursday, 9 September 2021

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी सामुहिक बलात्कार हत्याकांड प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

टिपू सुलतान युवा मंचची मागणी

मंठा प्रतिनिधी:राजधानी दिल्ली येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी यांच्यावर २७ आगस्ट रोजी काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली होती.राबिया सैफी ही २१ वर्षाची युवती दिल्ली येथे संगम विहार येथील रहिवासी होती.राबिया हे दिल्ली येथे पोलीस कॉंस्टेबल होती.२७ ऑगस्ट हा दिवस राबिया सह देशाचा कळा दिवस ठरला कही नराधमांनी राबिया वर सामूहिक बलात्कार करुन त्याच्या वर ५० वेळा चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली.इतकंच नाही तर क्रूर आरोपींकडून त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले होते.इतकी निर्घृण पने देशाची राजधानी दिल्ली येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल वर बलात्कार व हत्त्या होते तर आम महिलांचा काय वेळोवेळी होणारे महिलांवर अत्याचार बलात्कार हत्या कधी थांबणार ही कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थितीचा जबाबदार कोण ? या घटनेचा तपास सीबीआय मार्फत लवकरात लवकर लावुन हा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज ९ सप्टेंबर गरुवार रोजी मंठा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,इम्रान मनियार,इन्नु कुरेशी,अलीम कुरेशी,आरिफ कुरेशी,मुक्तदीर बागवान,सिराज कुरेशी,अनिस कुरेशी,इमरान तांबोळी,मुस्तकीम कुरेशी,मोइस कुरेशी,सोनु कुरेशी,सोहेल कुरेशी,शेख अशफाक,जावेद कुरेशी,शेख कलीम यांची स्वाक्षर्‍या होते.

Thursday, 29 July 2021

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा तालुक्यात विविध उपक्रम.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या रणरागीणी, संघर्षकन्या लोकनेत्या मा.ना.पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व वंजारी सेवा संघ मंठा,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंठा येथे पारधी समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच या परिसरात 42 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुहास मुंडे, वंजारी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष  देवेंद्र बारगजे, मराठवाडा उपाध्यक्ष सिद्धेश्वर केकान, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष  संदिप हुशे, युवक जिल्हाध्यक्ष पिंपळवाडी गावचे सरपंच विकास पालवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर नागरे, पंचायत समिती सदस्य दत्तराव कांगणे, शिक्षक नेते भगवान जायभाये,वंजारी सेवा संघाचे मंठा तालुका अध्यक्ष पंजाबराव वाघ, घनसावंगी तालुकाध्यक्ष कृष्णा वाघ,कैलास ऊबाळे, मुन्ना विरकर,विनोद गडदे,राजीव हजारे, गजानन वायाळ,अमोल सोनटक्के,संजय भवर, डॉ. गोपाळ तुपकर,अविनाश लोमटे, सुनील मोरे, नामदेव चव्हाळ, कारभारी ढाकणे,डी. डी.चव्हाण,रामेश्वर मुसळे,सतीश राठोड यांच्यासह परिसरातील अनेक गावचे सरपंच लोकप्रतिनिधी व मुंडे कुटुंबीयांवर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.

खासदार इम्तियाज जलील यांची नियुक्ती

मा.लोकसभा अध्यक्ष द्वारा
सांसद Imtiaz Jaleel  साहब को भारत
के मशहूर विश्वविद्यालय
#जामिया_मिलिया_इस्लामिया के
कोर्ट मेंबर नियुक्त होने पर बहुत बहुत मुबारकबाद...!

Sunday, 25 July 2021

माऊली अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी दीपस्तंभ पुरस्काराणे सन्मानित.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:- तालुक्यातील आग्रगण्य माऊली अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी पतसंस्थेला साल सन 2019 - 20 या वर्षातील दीपस्तंभ पुरस्कार (ता.24) शनिवार रोजी शिर्डी येथील कार्यक्रमात देऊन सन्मानित करण्यात आले.माऊली अर्बन पतसंस्थेने महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले आहे.पतसंस्था चळवळीला चांगली दिशा दर्शवली आहे. या दिशादर्शक कार्याबद्दल मराठवाडा विभागातून दीपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने देण्यात आला.हा पुरस्कार सोहळा दीपस्तंभ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर, सरव्यवस्थापक श्रीमती लवांडे मॅडम यांच्या उपस्थितीत परपडला.हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन तथा भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ,मुरलीधर चौधरी,व्यवस्थापक नंदकिशोर सोमानी,गजानन निर्वळ, अमोल मस्के, कालिदास निर्वळ यांची उपस्थिती होती.
माऊली अर्बन क्रेडिट सोसायटीला दीपस्तंभ पुरस्काराबद्दल माऊली अर्बनचे अध्यक्ष सतीशराव निर्वळ,संचालक व संस्थेचे सभासद व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Friday, 23 July 2021

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे वाजले बारा..लाभार्थ्यांना पैसे मिळेना..

पावसाळ्यात संसार आला उघड्यावर..

मंठा प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांना घरांचे स्वप्न दाखविणारी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे मंठा शहरात बारा वाजले असुन एक वर्ष उलटून गेल्याने ही अर्धे हप्ते न मिळण्याने शहरातील नागरिकांचा ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर आला आहे.कोरोना महामारी मध्ये अगोदरच कामे नसल्याने नागरिक अडचणीत आले आहे.घराची परिस्थिती बिकट झालेली आहे. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे निधीच्या आशेवर लाभार्थ्यांनी किरायाच्या घरात राहून घरकुलाचे कामाला सुरुवात केली.आपले राहते घर उघडे केले.घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले पण घरकुलाचे हफ्ते मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे घर बांधकामाची चिंता तर दुसरीकडे घर भाड्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.अनेक लाभार्थ्यांनी नगरपंचायत मध्ये विचारणा केल्यानेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. मंठा शहरात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनाचे पंधराशे घरकुल मंजूर झाले होते.दरम्यान लाभार्थ्यांना पांच टप्प्यात निधी देण्यात येणार होता.या मध्ये 40 हजाराचा पहिला टप्पा 413 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. दुसरा 40 हजारांचा टप्पा 319 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. तर तिसरा टप्पा 20 हजाराचा 181 लाभार्थ्यांना देण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून एक लाख रुपये तर केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये मिळणार होते पण केंद्र सरकारचा निधी अद्याप मिळालेला नसल्याने लाभार्थ्यांना तीनच टप्पे देण्यात आलेले आहे. अशी माहिती घरकुल प्रकल्प अधिकारी मनोज गिरी यांनी सांगितले.

Wednesday, 21 July 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक प्रतिनिधी यांना ओळखपत्राचे वाटप....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक दि.२० जुलै मंगळवार रोजी मंठा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष डिगंबर गुजर सर यांच्या हस्ते मंठा पत्रकार संघ प्रतिनिधी यांना संघटनांची ओळखपत्र,माक्स दिनदर्शिका यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षांनी पत्रकारांचे विमा तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा केली.याप्रसंगी मंठा पत्रकार संघ तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी,मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पंडित नाना बोराडे,जालना कार्यकारणी सदस्य संतोषजी दायमा सर,आशीष तिवारी,मोसीन कुरेशी,रमेश जोशी,अमोल राऊत, अरुण राठोड,लखन जैस्वाल,जगदीश राठोड शेळके सर,मंजुषा काळे मॅडम मानसिंह बोराडे यांची उपस्थिती होती...

Sunday, 4 July 2021

पालकमंत्री राजेश टोपे यांना शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का ?

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:एमआईएमचे जालना जिल्हाध्यक्ष माजेद भय्याजी यांनी ३ जुलै शनिवार रोजी मंठा-परतुर तालुक्याचा दौरा केला.याप्रसंगी मंठा एमआईएम पदअधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजेद भैय्याजी,निसार पटेल,रियाज अहेमद,इस्माईल भाई,अनवरभाई,इम्रान चौधरी यांचा सत्कार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच मंठा तालुक्यातील एमआईएम पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न जिल्हाध्यक्ष समोर मांडले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजेद भैयाजी यांनि बोलताना सांगितले की पालकमंत्री राजेश टोपे साहेबांना मंठा तालुक्यात शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का असा प्रश्न जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित केला. याप्रसंगी एमआईएमचे तालुकाध्यक्ष शेख एजाज भाई ,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,सय्यदअय्यूब ,प्रदीप मोरे, क़ामळे,जुनेद पठान,शेख मुल्ला,शेख अरशद,शेख सलमान,शेख अजहर शेख शोहेब,शेख खाजा,शेख फयाज,सह मोठ्या संख्येने एमआईएम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Tuesday, 15 June 2021

पत्रकाराच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे लेखी निवेदन.

जालना प्रतिनिधी
शिक्षकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर स्वतंत्र आमदार आणि मतदार संघ असेल, पदवीधरांना देखील स्वतंत्र आमदार आणि मतदार संघ असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेला देखील जर स्वतंत्र आमदार आणि मतदारसंघ असेल तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कणखर करण्यासाठी पत्रकारा मधून देखील स्वतंत्र आमदार असणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून एक स्वतंत्र पत्रकार मतदार संघ सरकारने निश्‍चित करावा. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी पहिली मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने मराठवाडा विभागातून करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी लातूर येथील जिल्हाधिकारी यांना पहिले निवेदन देऊन लोकशाही मार्गाने न्याय हक्काची मागणी केली आहे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक, राज्याचे राज्यपाल यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
सर्वसामान्य, पीडित, वंचितांचे प्रश्न आपल्या धारदार लेखणीतून मांडून ज्या समस्या शासन आणि प्रशासन स्तरावर सोडवल्या जात नाहीत अशा समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रामाणिकपणे करत आहे.मात्र या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या विविध घटकांचे अनेक प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. प्रामुख्याने कोरोना महामारीच्या कार्यकाळात वृत्तपत्र सृष्टीवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ज्या दैनिकांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे असे मोठमोठाली विभागीय दैनिकांनी देखील आता गुडघे टेकण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण आणि जिल्हा , तालुका पातळीवरून निघणाऱ्या दैनिकांची तर पार मान मुरगळली गेली आहे. अशा बिकट परिस्थितीतून वृत्तपत्रसृष्टीला वाचवण्यासाठी आता वाचक , जाहिरातदार यांच्यासोबतच सरकारने सुद्धा सक्षम पणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा लोकशाहीचाहा चौथा स्तंभ मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. या चौथ्या स्तंभाला जर इजा झाली तर संपूर्ण जगभरात ज्या भारतीय लोकशाहीला नावाजले जाते त्या लोकशाहीला देखील डंक लागू शकतो. यासाठी सरकार आणि प्रशासनाने वेळीच गांभीर्याने पावले उचलत लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी निर्णायक पावले उचलणे गरजेचे आहे. प्रामुख्याने जगांचे प्रश्न सोडवताना स्वतःचे प्रश्न पत्रकार आणि वृत्तपत्र सृष्टीतील विविध घटकांना मांडता येत नाहीत. त्यामुळे हळूहळू अनेक समस्या वाढत आहेत. या समस्यांना न्याय मिळण्यासाठी ज्या पद्धतीने शिक्षक मतदार संघ आहे, पदवीधर मतदार संघ आहे, स्थानिक स्वराज्य मतदार संघ आहे याच धर्तीवर राज्यातल्या चारही विभाग अंतर्गत स्वतंत्र पत्रकार मतदार संघ निर्माण करणे काळाची गरज आहे.यासाठी सरकार आणि प्रशासनाने एक स्वतंत्र समिती नेमून या मतदार संघाचे नेमके स्वरूप कसे असावे ? त्याच बरोबर इतर नियम व अटी निश्चित करून लवकरात लवकर स्वतंत्र पत्रकार मतदार संघ निर्माण करावा.या विभागाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी क्रांतीकारी निर्णय घेणे गरजेचे आहे.जर सरकार आणि प्रशासनाला जाग येणार नसेल तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ लोकशाही मार्गाने या प्रश्नाला वाचा फोडून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून भविष्यात संघर्ष करणार आहे, असा इशारा मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी दिला आहे. या प्रमुख मागणीसह जवळपास दहा विविध प्रमुख मागण्या पत्रकारांच्या आणि माध्यमातील विविध घटकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी मागण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पत्रकारिता महाविद्यालय आणि पत्रकारिता महाविद्यालयातील प्राध्यापक , प्राचार्य यांना 100% अनुदान तात्काळ मंजूर करावे., पेपरलेस डिजिटल ऑनलाईन वृत्तपत्रांना शासनमान्य जाहिरात यादीवर घेण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करावी., त्याच बरोबर डिजिटल वृत्तपत्र व वेबपोर्टल न्यूज ला मान्यता देण्यासंदर्भात केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा., महाराष्ट्रातील शासकीय जागेवर असणारे सर्व पत्रकार भवन हे सरकारने ताब्यात घेऊन त्या पत्रकार भावनांच्या अद्यावत विकासासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांना पदसिद्ध सचिव तर जिल्हाधिकारी यांना पदसिद्ध अध्यक्ष नियुक्त करून या पत्रकार भवनाच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यक्ष आणि सचिव यांच्या संमतीने स्थानिक जिल्ह्यातील पत्रकारांची एक स्वतंत्र सभासद नोंदणी करून त्या सभासदा मधून फक्त दोन वर्षासाठी सात सदस्य घेण्यात यावे. एकदा कमिटीवर सदस्य झाल्यावर पुन्हा त्यांना सदरील पत्रकार भवनाच्या कमिटीवर राहता येणार नाही, अशी तरतूद करावी., आर. एन. आय. नसलेले व नियमित प्रकाशित न होणारे वृत्तपत्र यांना राज्यशासनाच्या जाहिरात यादीवरून तात्काळ कमी करावे., जे वृत्तपत्र नियमित प्रकाशित होतात त्यांना वाढती महागाई लक्षात घेऊन जाहिरात दर सरसगट वाढवून द्यावा.,महाराष्ट्रातील बोगस अधिस्विकृतीधारक यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांची अधिस्वीकृती तात्काळ रद्द करावी., covid-19 कालावधीतील कडक लॉक डाऊन मधील वृत्तपत्रांची दैनंदिन हजेरी माफ करावी आणि जानेवारी 2021 ते मे 2021 या कालावधीतील जो कडक लॉक डाऊन चा कार्यकाळ होता त्या काळातील दैनंदिन हाजरी माफ करण्याचा निर्णय तात्काळ जाहीर करावा. कडक लॉक डाउनच्या काळातील वृत्तपत्रांचे कार्यालय, ऑफिस,शासकीय अथवा खासगी जागेत आहेत त्यांचे दर महा असणारे ऑफिस भाडे माफ करण्या संदर्भात शासकीय पातळीवर निर्णय घेण्यात यावा. तसेच नगरपालिकेच्या हद्दीतील वृत्तपत्राच्या कार्यालयाला लागणारा टॅक्स देखील माफ करण्यात यावा.,निराधार, वृद्ध ,कलाकार यांना सरकार या धर्तीवर आर्थिक पाठबळ दरमहा मानधन पोटी देते त्याच धर्तीवर निकष निश्चित करून श्रमिक, कष्टकरी, संपादक, पत्रकार यांना सुद्धा दरमहा मदत म्हणून मानधन विशेष बाब अंतर्गत सुरू करावे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा दर हा किमान दोन लाख रुपये निश्चित करावा., शासनमान्य यादीवर येण्यासाठी जीएसटी सारखा जाचक अट तात्काळ रद्द करून तीन हजार अंक मर्यादेची ही शासकीय आट रद्द करून ती आर एन आ च्या धर्तीवर दोन हजार अंक छपाईस मंजुरी देण्यात यावी., तसेच म्हाडा अंतर्गत निवासासाठी हक्काचे घर हे प्रत्येक पत्रकारांना सवलतीच्या दरात देण्यात यावे. वेळप्रसंगी शासनाने सदरील निवारा घर हे विनामूल्य देण्याची व्यवस्था करावी. वरील मागण्यांची दखल सरकार व प्रशासनाने न घेतल्यास या प्रमुख मागणी साठी पत्रकार संघाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने मराठवाडा विभागातून जनक संघर्ष करण्याचा इशारा मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महा संचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदनाद्वारे बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिला आहे. या निवेदनावर पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे,जालनाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, लातूरचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे,  परभणीचे जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर भोसले,उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह मराठवाडा विभागाचे पदाधिकारी आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा तालुका स्तरीय प्रमुख पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Sunday, 13 June 2021

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपला ताफा थांबवुन केली. अपघात ग्रस्तची मदद.

बदनापुर प्रतिनिधी:केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार नारायण कुचे बदनापूर तालुक्यातील कोरोना मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या परिवारास सांत्वन भेटीसाठी 11 जून शुक्रवार रोजी नानेगाव, मांजरगाव दुधनवाडी, रोशनगाव, येथे जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी विचारपूस कार्यक्रम करून बदनापूर कडे परत येत असताना रोशनगावच्या नदीजवळ पुलावरती हासनाबाद कडून अंबड कडे जाणाऱ्या समाधान मोहिते आणि त्यांची पत्नी यांचा मोटरसायक घसरून अपघात झाला त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत देखील झाली तेवढ्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा ताफा घटनास्थळापासून जात असल्याने लक्षात येताक्षणी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुचे आपल्या गाड्यातून पटापट उतरून पडलेल्या समाधान मोहिते आणि त्यांच्या पत्नीला सावरून दुखापतीची सहानिशा करून जवळ उभा राहून त्यांना मोठ्या प्रमाणात धीर दिला आणि तात्काळ आपली सिक्युरिटी पोलीस व्हॅन रिकामी करून समाधान आणि त्याच्या पत्नीला जालना कडे उपचारासाठी पाठवले तसेच समाधान मोहिते च्या नातेवाईकांचा फोन नंबर उपलब्ध करून थेट समाधान च्या वडिलांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपर्क करून अपघाताची माहिती दिली या मदत कार्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे,आमदार नारायण कुचे यांचे मोठे योगदान राहिले घटनास्थळी बद्री पठाडे, पदमाकर जराड, गणेश कोल्हे तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, भगवान म्‍हात्रे, विलास जराड, भास्कर घनघाव अरुण पठाडे दत्तू लहाने आदींसह ताफियात असलेल्या कार्यकर्त्यांची येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती.

Tuesday, 8 June 2021

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे तत्काळ फायली मंजूर करण्याची युवक काँग्रेसची मागणी..


हाफीज हारुन पठाण
बदनापुर प्रतिनिधी:बदनापूर येथे युवक काँग्रेस च्या वतीने तहसिल कार्यालया मार्फत शहरातील व तालुक्यातील प्रलंबित असलेले निराधारांच्या सर्व फाईल शासनाच्या नियमा प्रमाणे तात्काळ मंजुर करुन निराधारांच्या खात्या वर रक्कम टाकाणे बाबत निवेदन देण्यात आले.या वेळी शहराध्यक्ष मोबिन खान,नानाभाऊ पटोले विचार मंच अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेद भाई बागवान,तालुका उपाध्यक्ष शेख युनुस भैया,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अस्लम शेख,विधानसभा अध्यक्ष दिपक कायंदे,एन.एस.यु.आई चे शफिक पठाण,देवगाव चे सरपंच विनोद मगरे,शेख समिर बिल्डर, विलास खैरे,पप्पू कुलकर्णी,अमित शेख,अलिम खान,नईम शेख,सतिश जाधव आदी युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, 27 May 2021

ब्रेक द चैन अंतर्गत उद्योगधंदे, बाजारपेठ तसेच दुकांनांचे सिल उघडुन सर्वप्रकारचे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी.

(मराठवाडा न्यूज 44 ब्यूरो)

औरंगाबाद:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, दुकानदार, टपरीधारक यांनी आपआपले उद्योगधंदे, बाजारपेठ व दुकाने बंद ठेवुन शासनाने ब्रेक द चैन अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करत आहे. दोन महिन्यापासून सर्व व्यापारी व दुकानदार यांनी आपआपली आस्थापने बंद ठेवल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडलेले असुन शासनस्तरावरुन त्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारचे आर्थिक पॅकेज किंवा मालमत्ता कर, विज बिल, जिएसटी या सरकारी करांमध्ये सुध्दा सवलत देण्यात आलेली नाही. ब्रेक द चैन अंतर्गत औरंगाबाद शहरात तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक प्रकारे हुकुमशाहीच चालवली जात असल्याचे व्यापारी, दुकानदार व टपरीधारक प्रश्न उपस्थित करत आहे. औरंगाबाद शहरात व्यापारी अथवा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर औरंगाबाद महानगरपालिका पथक, पोलीस विभागाचे पथक आणि जिल्हाधिकारीकार्यालयाचे पथक अशा वेगवेगळ्या तीन पथकांकडून कार्यवाही केली जात आहे. विशेष म्हणजे तीन्ही पथकांचे आपआपसात समन्वय नसल्याने व्यापारी व दुकानदारांना चालान देवुन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दुकान ही सिल करण्यात येत आहे, हि तर एक प्रकारची हुकुमशाहीच असल्याचे समजते. सदरील उल्लेखित तिन्ही विभागाकडून करण्यात येणारी कायदेशिर व दंडात्मक कार्यवाही म्हणजे व्यापारी व दुकानदारांवर दहशत निर्माण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार, दुकान भाडे, स्वतःचे घर खर्च भागवणे, औषध उपचार खर्च, व्यावसायिक कर्जावरील व्याज त्यातच आता पावसाळा सुरु होतो त्यादृष्टीने दुकानाची रिपेरिंग, साफसफाई, मालाचे व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक बाबी करणे अत्यंत गरजेचे आहे नसता व्यापारी व दुकानदारांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे छोटे-छोटे दुकानदार व टपरीचालक आहे त्यांचा तर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा झालेला आहे. सद्याच्या परिस्थितीमुळे अनेक व्यापारी, दुकानदार, टपरीधारकांमध्ये सरकार विरोधी भावना निर्माण होत असुन त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या दंडात्मक व कायदेशिर कार्यवाही तसेच कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे संकट निर्माण झाल्याने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचे अनेक व्यापारी व दुकानदार बांधवांनी सविलेले आहे.तरी आपणास नम्र विनंती की, औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार व टपरीधारकबांधवांचा"सहानुभुतीपुर्वक विचार करुन 1 जुन 2021 पासुन सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बाजारपेठा सुरु करण्याची परवानगी देण्यात त्यावी तसेच जिल्हा प्रशासनाच्या तिन्ही पथकामार्फेत दुकानांना लावण्यात आलेले सिल काढुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याचे आदेश संबंधित अधिकारी व विभाग यांना निर्गमित करुन सहकार्य करण्यात यावे.अशी मागणीचे निवेदन खासदार इम्तियाज जलील यांनी दिले..

Wednesday, 26 May 2021

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक कर्ज अर्ज ऑनलाइन करावे संतोष खारवणे..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी/मंठा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवीन खरीप पिक कर्ज मिळवण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत असे आवहान युवासेना तालुका प्रमुख मंठा संतोष खारवणे यांनी केली आहे.त्यांनी प्रसिद्धीपत्रकात असे नमूद केले आहे की दि.21 मे पासून नोंदणी चालू झाली असून दि.15 जून 2021 पर्यंत अर्ज ऑनलाइन करावेत जागतिक महामारी कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यामध्ये संचारबंदी/जमावबंदी घोषित करण्यात आलेली आहे.त्यामुळे कोविड-19 या आजाराचा प्रसार होऊ नये,म्हणून प्रशासनाने बँकेत गर्दी न करता ऑनलाईन सेवा सुरू केलेले आहे.तरी मंठा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी.जिल्हा प्रशासनाकडुन बँकेकडे यादी पाठविण्यात येणार आहे.त्यामुळे कुठल्याही शेतकरी या योजनेपासुन वंचित राहू शकणार नाही.तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज अर्ज ऑनलाइन करावे असे आवाहन युवासेना उपतालुका प्रमुख मंठा संतोष खारवणे यांनी केले आहे.

#Mosin_kureshi
#Mantha_news

Thursday, 20 May 2021

मंठा पोलीस आले ॲक्शन मोलडमध्ये...

मोसीन कुरेशी

मंठा शहरात विनाकारण फिरणाऱ्या 65 नागरिकांची अँटीजण टेस्ट करण्यात आली..

मंठा प्रतिनिधी:शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिपू सुलतान कॉर्नल, बस स्टॅन्ड, मार्केट यार्ड,मंठा फाटा येते दी.20 गरुवार रोजी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या 65 नागरिकांची अँटीजण टेस्ट करण्यात आली.तर शहरात कड़क लॉगडाऊनची  अंमलबजावनी व्हावी नियमचे उल्लंखन होऊ नय म्हणुन मंठा पोलीस निरीक्षक यशवंत बांगुल साहेब यांच्या मार्गदर्शन कड़क बंदोबस्त लावण्यात आला होता.यावेळ विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून आठ हजार चार शे रुपये दंड वसूल करण्यात आल्या असल्याची माहिती नगरपंच्यात कर्मचारी जाविद भाई यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार साहेब यांच्या पथका मध्ये
शाम गायके,कानबा हराळ, राजू राठोड, होमगार्ड कपिल आखाडे, जोशी आणि राठोड तसेच नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक सुधाकर खैरे, कर्मचारी जावेद भाई,आसेफ तांबोळी, रघुनाथ बोराडे, जनार्दन, आरोग्य विभागातून आरोग्य अधिकारी दीपक लोने साहेब,वाघमारे सर,सरकटे सर यांचा समावेश होता.

Wednesday, 19 May 2021

देवगाव फाटा पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांची मनमानी (प्रत्येक वाहनांकडून दोनशे रुपयाची वसुली)......

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी  : जालना जिंतूर रोड वरील देवगाव फाटा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी व चारचाकी वाहन चालकाकडून दोनशे रुपयांची लूट चालवली आहे. पैसे घेऊन पावती न देता वाहने सोडली जात आहेत. चारठाणा  ठाण्यातील  पोलीस बंदोबस्त असलेले पोलीस कर्मचारी शिराळे सह अन्य पोलिस कर्मचारी वाहनधारकांना विनाकारण त्रास देत असून वाहनधारकांसोबत  उद्धटपणाची भाषा केली. जात आहे. या पोलीस चौकीतील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. देवगाव फाटा पोलीस चौकी वसुलीचा अड्डा बनला असून परभणी पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

Tuesday, 18 May 2021

केंद्रशासनाची पेट्रोल, डिझेल व रासायनिक खते दरवाढ अन्यायकारक...नितीनकुमार जेथलिया

काँग्रेसच्या वतिने परतुर उपविभागीय अधीकारी यांना निवेदन सादर


मोसीन कुरेशी
परतुर:सत्तेचा व बहुमताचा गैरफायदा उचलत केंद्रातील शासन मनमानी कारभार करत एकप्रकारे सर्वसामान्यांचा व शेतक-याचा छळवत असून  दरवेळी होणारी पेट्रोल, डिझेल व अलीकडे रासायनिक खतांची दरवाढ करत केंद्राने कहरच केला असल्याचे  प्रतिपिादन काँग्रेसचे नितीनकुमार जेथलिया यांनी केले. याबाबत आज दिनांक 18 मे रोजी येथील उपविभागीय अधीकारी यांना काँग्रेसच्या वतिने केंद्रशासनाने  केलेल्या भाववाढीबाबत निवेदन सादर केले.यावेळी त्यांच्या समेवत यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट, पं.स.सदस्य बाजीरावजी खरात ,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब, नगरसेवक बाबुराव हिवाळे, अय्युबभाई कुरेशी राजेश भुजबळ, सिध्दार्थ बंड, तारेख भाई सिध्दीकी, अविनाश शहाणे, मधूकर झरेकर, गोविंदराव  वाशिंबे, उद्धव बोनगे ,मोसिन बागवान, पाडुरंग गाडगे , मतीन कुरेशी, विकास झरेकर,इंद्रजित डवले (सरपंच,लिंगसा)अप्पासाहेब खंदारे (सरपंच ,अंगलगाव)यांची उपस्थीती होती. यावेळी दिलेल्या निवेदनात केंद्रशासनाच्या  दरवाढीबद्धल रोश व्यक्त करतांना म्हणले की एकीकडे गरीबांना अधार देण्याची भाषा केद्र सरकार करत आहे व दुसरीकडे प्रत्येक महत्वाच्या दळणवळणाची भाववाढ करत सरकार सर्वसामान्याचा खिसा कापण्याचा काम करत असल्याचा आरोप केला. आता तर शेतकऱ्यांना  वेढीस धरत प्रत्येक रासायनिक खतांच्या थैलीमागे आठशे रूपये दर वाढवत सरकारने आपल्या आराजकतेची हद्द  ओलांडली असल्याचे निवदेनात नमुद करत सदरील दरवाढ माघे  घेण्याची मागणी निवेदनावर करण्यात आली आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी प्रतिक्रीया व्यक्त करताना नितीनकुमार जेथलिया यांनी केद्र शासनाच्या धोरणाचा कडाडुन समाचर घेत खतांचे  भाव वाढवणारे हेच व कार्यकर्ते मात्र कृषी  कार्यालयात जात दरवाढी च्या पुढे बाजारात खतांची  विक्री होणार नाही अशी  मागणी करतात. एकप्रकारे देशातील शेतक-यांना व सामान्यांना दिशाभुल करण्याचा हा प्रकार असुन जनता इतकी मूर्ख नाही याचा जाब भविष्यात केंद्रातील  सत्ताधाऱ्यांना  द्यावा लागेल अशा भावना त्यांनी यावेळ व्यक्त केल्या.

Sunday, 16 May 2021

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन.

मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी: पहाटे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये   काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव  यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन

झाले.राजीव सातव यांचे पार्थिव एम्बुलेंस ने हिंगोलीकडे नेत असताना मंठा शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मंठा फाट्यावर अंबुलन्स वर पुष्पहार टाकण्यात आले राजीव सातव अमर रहे अमर रहे अशी घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. शहरातील  सर्व कार्यकर्त्यांकडून  सातव यांना  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार राजेश भैया राठोड यांनी  मराठवाडा न्यूज शी' बोलताना सांगितले की महाराष्ट्र ने राजीव सातव यांच्या रूपाने भावी नेतृत्व गमावलेला आहे.या प्रसंगी अन्वर बापू देशमुख,कयूम भाई कुरेशी, नगरसेवक मुसाभाई कुरेशी,मोईन भाई कुरेशी, प्रकाश अण्णा घुले,उपनगराध्यक्ष सिराज खान पठाण,बालासाहेब वाजोडकर,शबाब भाई कुरेशी सुरेश वावळे,राजेश खंदारे,जफ़र पठान, मुक्तदिर बागवान सह मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


#Mosin_kureshi

#Mantha_news

Thursday, 13 May 2021

सभी देश वासियो को ईद की हार्दिक शुभकामनाए..

सर्व समाज बांधवाला रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक:मराठवाडा न्यूज़ 44,संपादक मोसीन कुरेशी

Tuesday, 11 May 2021

मंठा शहरात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मुफ़्त धान्य वाटप सुरु..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:केंद्र शासन व राज्य शासनाने राज्यातील गरीब कुटुंबांना मे व जून महिन्याकरिता मोफत पाच किलो धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.त्याची अंमलबजावणी मंठा तालुक्यात झाली आहे. तालुका पुरवठा विभाग यांच्या वतीने गावागावांतील सरकारमान्य धान्य दुकानात गहू व तांदूळ पोहोचला असून मंगळवार रोजी स्वस्त धान्य दुकान क्र.12 सुधीर जोशी यांच्या स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मोफत गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ कोरोना प्रादुर्भावचे सर्व नियम पाळून वाटप करण्यात आले,असल्याचे माहिती स्वस्त धान्य दुकानदार सुधीर जोशी यांनी मराठवाडा न्यूज़ शी बोलताना सांगितले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जिल्ह्यात काही गावांमध्ये कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना रोजगारमिळत नाही.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.गरीब कुटुंबे उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्यदेण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणेराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनीसुद्धा मे महिन्याकरिता पिवळ्याव
केशरी रेशनकार्डधारकांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबाजवणी मंठा तालुक्यात चालू झाली आहे.मंठा शहरात पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप सुरु झाले आहे.

Monday, 10 May 2021

मंठा पोलीस स्टेशन येथे पावणे सहा लाख रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुचा साठा नष्ट .....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : मंठा पोलीस स्टेशन येथील जप्त गुन्ह्यातील  9329 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मा. न्यायालयाच्या आदेशाने दोन शासकीय पंचायत समक्ष नष्ट करण्यात आल्या. सन 2012 ते 2020 या कालावधीत जप्त केलेल्या देशी-विदेशी अवैद्य दारूची किंमत 5,78,750 /- रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. टी. बिडकर, मंठा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व्ही. डी. पवार यांच्या उपस्थितीमध्ये जप्त अवैद्य देशी-विदेशी दारुचा साठा सोमवार ता. 10 रोजी नष्ट करण्यात आला. यावेळी एस. एम.भंडलकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनजीतसिंग सेना,पोलीस कॉन्स्टेबल दीपक आडे, नारायण आडे, शुभम ढोबळे, प्रशांत काळे, विशाल खेडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता फुलमाळी, शिवाजी लोखंडे, नगरपंचायतचे कर्मचारी सुनील मोरे व रमेश खंदारे उपस्थित होते.

मंठ्यात ऑक्सीजन प्लांट उभारण्याची आरोग्य मंत्र्यांची ग्वाही...

रुग्ण हा देवता आहे, त्याची काळजी घेऊन सेवा करा:आरोग्य मंत्री राजेश टोपे

मोसीन कुरेशी
मंठा (प्रतिनिधी):- वैद्यकीय आवश्यकता लक्षात घेऊनयेथील ग्रामीण रुग्णालयासाठी ८० लाख रुपये खर्चाच्या ऑक्सीजन प्लांट तसेच रुग्णालय पूर्णतः स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सर्व रिक्त पदे येत्या३-४ दिवसात भरली जातील अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राजेश टोपे यांनी दिली.रविवार रोजी येथील कोवीड सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा आणि उणिवा बाबत सविस्तर बैठक घेतली. कोवीड सेंटर मधील रुग्णांची आस्थेवाईक चौकशी करून त्यांना औषध उपचार कशाप्रकारे दिला जातो याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्नील लाळे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले, तहसीलदार सुमन मोरे,मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी,गोपाळराव बोराडे , शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे.बोराडे , पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्रगायके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे,डॉ.प्रताप चाटसे आदी उपस्थित होते.रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांनाविविध उपाय योजनेबाबत माहिती दिली. हवेतून ऑक्सिजननिर्माण करणारा ८० लाख रुपये खर्चाचा प्लांट येत्या आठदिवसात कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.येत्या तीन ते चार दिवसात डॉक्टरचीआणि नर्सची सर्व रिक्त पदे भरणार असल्याची ग्वाही दिली. शिवाय नर्सची आवश्यक पदे स्थानिक पातळीवरून भरण्याच्या सूचना दिल्या.येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरून पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना सूचना दिल्या. ४० बेडच्या कोवीड सेंटर साठी किमान पाच डॉक्टर्स आवश्यक असताना केवळ दोन डॉक्टर्स उपलब्ध आहेत. उर्वरित तीन डॉक्टर्स चार दिवसात उपलब्ध करून दिले जातील असे त्यांनी सांगितले. मंठा येथील मॉडेल स्कूलच्या इमारतीमध्ये ५० बेडचे नवीन डेडिकेटेड कोवीडसेंटर सुरू करणार असून त्यासाठी सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

Saturday, 8 May 2021

रस्ता देता का रस्ता ?तीस वर्षापासून रस्त्यासाठी कुरेशी मोहल्ल्यातील नागरिक वंचित...

दोन वर्षापासून रस्त्याचे काम मंजूर होऊनही आतापर्यंत काम झालेलं नाही...

याला जबाबदार कोण ?

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा येथील कुरेशी मोहल्लाचा मुख्य रस्त्याचा व नाल्याचा काम 30 वर्षापासून झालेला नाही या रस्त्यावरील नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत.नाल्याचा सांड पानी रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. हा रस्ता मंठा शहरात येतो का नहीं असा प्रश्न कुरेशी मोहल्ल्यातील नागरिकांना पडला आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी कुरेशी मोहल्ल्यातील नागरिक करत आहे.

Mantha news
Mosin kureshi

पवित्र रमजान महिन्यात विजेच्या लपंडाव थांबवा टिपू सुलतान युवा मंच यांची मागणी

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात  लॉकडाउन सुरू असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.व मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला असून.लॉकडाऊमुळे सर्व बांधव घरातच राहून रोजा उपवास तब्बल १५ ते १६ तास ठेवत आहेत व धार्मीक विधी ही करत आहेत. परंतु या काळातच महावितरण कंपनीचा गलथान कारभार सुरु असुन वेळोवेळी विजेच्या लपंडाव होत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून उन्हाने नागरिकांची लाहीलाही होत आहे.सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने २४ तास विज पुरवठा सुरुळीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु विद्युत केंद्राचे हलगर्जीपणामुळे मुस्लिम बांधवांना सुरळीत वीज मिळत नाही उन्हाचा पारा वाढत असून रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम बांधव १५ ते १६ तास अन्न व पाणी न घेता उपवास ठेवतात.घरातच बसण्यासाठी कुलर, पंखे सुरु ठेवण्यात येत आहे.परंतु वेळोवेळी विजेचा लपंडाव होत. असल्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहे.लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विजेचा लपंडाव थांबवावा नसता टिपू सुलतान युवा मंच कडून विद्युत केंद्र समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा टिपू सुलतान युवा मंच अध्यक्ष मोसीन कुरेशी यांनी दिला..यावेळी मोसीन कुरेशी,इस्माईल राज,इम्रान तांबोली,इद्रीस कुरेशी यांची उपस्थिती होती.

Mantha news
Mosin Kureshi

मंठा नगरपंच्यात मुख्याधिकारी साहेब झोपेतुन जागे हुआ आणि शहरात औषध फवारणी करा..

जंतू नाशक औषधांची फवारणी करण्याची नागरिकांची मागणी.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह तालुक्यात कोरोना मुळे 18 जणांचा मृत्य झाला आहे. तर 251 रुग्ण हे विविध रुग्णालयात व घरी विलगीकरनात उपचार घेत आहेत.कोरोना मुळे तालुक्यासह शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे परंतु मंठा नगरपंचायत झोपेचे सोंग घेत आहे शहरात नागरिकांकडून औषध फवारणी
करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे. पण नगरपंचायत मुख्याधिकारी साहेब दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. विविध प्रभागात नाल्याची सफाई न झाल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. नगरपंचायत हद्दीतील १७ प्रभागातील १ हि प्रभागात औषध फवारणी झाली नाही. शहरात नगर निगम आहे का नाही असा प्रश्न नागरिकांना पडला असून, डासांचा नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे आजार पसरण्याची भीती असून, नगरपंचायत सार्वजनिक आरोग्य विभागाने यात लक्ष घालून औषध फवारणी व उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.

Mantha news
Mosin kureshi 

ज़ेबा कुरेशी व अक्सा कुरेशी यांचा पहिला रोज़ा पुर्ण..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी मंठा शहरातील नगरसेवक मुसा भाई कुरेशी यांची नात युवा उद्योगपती जुबेर कुरेशी यांची मुलगी ज़ेबा कुरेशी वय 5 वर्ष याने आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा दी.६ में गरुवार रोजी पूर्ण केला आहे.में महिन्याच्या तापत्या उन्हात ज़ेबा ने रोज़ा पूर्ण केल्याने कदीर कुरेशी,रईस कुरेशी,मुस्तकीम कुरेशी यांनी कौतुक केले.तसेच शहरातील सलाम कुरेशी यांची मुलगी अक्सा कुरेशी वय 6 वर्ष याने पण आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याने उमेर कुरेशी,अजीम कुरेशी,अहेमद कुरेशी,सोहेल कुरेशी यांनी अक्सा कुरेशी यांना शुभेच्या दिले.

Friday, 7 May 2021

मंठा ग्रामीण रुग्णालयत लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दि तर ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाटा चा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या लाटीदरम्यान कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचेदेखील प्रमाण जादा आहे. यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू केली आहे. शहरात २८ एप्रिल बुधवार रोजी सकाळ पासूनच  ग्रामीण रुग्णालय प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने  लस घेण्यासाठी शासनामार्फत कोरोना निर्बंधदेखील लादले जात आहेत.आरोग्य केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची तुडुंब गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे. लस राहिली दूर रांगेतच करोनाची लागण व्हायची असे चित्र दिसत आहे.
या कडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

Tuesday, 16 March 2021

आमदार राजेश भैय्या राठोड यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 17 मध्ये सिमेंट रोडच्या कामाचे उद्धघाटन...

मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी: राजेश भय्या राठोड आमदार झाल्या पासून मंठा तालुक्यात विकास कामाला गती मिळाली

आहे.विविध प्रभागात नाली कॉंक्रीट बांधकाम,सिमेंट रस्ते,शादी खाने,दलित वस्ती व सभाग्रह सह विविध विकास कामे होत आहे. वार्ड क्रमांक 17 मध्ये घारे कॉलनीमध्ये  अशोक रंजवे यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनी मध्ये मुसाभाई चाँदमिया गेवराई वाले यांच्या घरापासून ते  सुभाष चिंचाणे यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनीमध्ये जिंतूर रोड रस्त्यापासून ते शेख दिलावर शेख अमीन यांच्या घरापर्यंत, सरताज कॉलनी मध्ये जालना जिंतूर रोड रस्त्यापासून ते  शेख मुख्तार शेख नजीर यांच्या घरापर्यंत हे प्रभाग 17 मध्ये पन्नास लक्ष रुपयाचे चार सिमेंट काँक्रीट रोडच्या उद्घाटन दी.१५ सोमवार रोजी राजेश भय्या राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अनवर बापू देशमुख,प्रभाग क्रमांक 17 चे मा.नगरसेवक मुसा भाई कुरेशी, भगवान मामा, निलखंड वायाळ, कय्यूम भाई कुरेशी,मोरे काका,मोइन कुरेशी,राजेश खंदारे, प्रकाश अण्णा घुले,सिराज खान पठान,शेख साजिद,मुख्तार अंसारी,शेख चाँद,शेख रईस,शेख पाशा,शेख फारूक बाळासाहेब वांजोळकर सह मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 17 चे नागरिक उपस्थित होते.

Mantha news

Mosin kureshi

Tuesday, 26 January 2021

मंठा तालुक्यात एमआईएमची एन्ट्री... जिल्हाध्यक्ष माजिद भैयाजी यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन...

ये तो सिर्फ झांकी है,अभी पिक्चर बाकी हैं

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:शहरात एमआईएम पक्ष कार्यालयाचा उद्धघाटन एमआईएमचे जालना जिल्हाध्यक्ष माजीद भैयाजी यांच्या हस्ते झाला.तसेच सैकडो कार्यकर्त्यांनी एमआईएम पक्षामध्ये प्रवेश केला.मंठा फाटा,बस स्टॅन्डन,बाबासाहेब आंबेडकर पुतळा,ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत जागो जागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला.तसेच फटाकेची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आली. कोण आया रे कोण आया शेर आया शेर आया,असद ओवैसी जिंदाबाद,अकबर ओवैसी जिंदाबाद,मजलिस जिंदाबाद,घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तसेच  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  व  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात एमआईएम पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजिद भैय्याजी यांनी बोलताना सांगितले की येत्या मंठा नगरपंचायत निवडणुकीत एमआईएम पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहे.तसेच पुढे बोलताना सांगितले की महाविकास आघाडीत लैला कोण आणी मजनू कोण ये कळत नहीं आघाडीत असून ही यांच्यामधील नेतेमंडळी एक दुसर्‍यांच्या कामात मत भेद करत आहे. लवकरात लवकर मंठा शहरात मोठा कार्यक्रम घेण्यात येईल व एमआईएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना मंठा शहरात आनणार असल्याचे भय्याजी यांनी सांगितले..या प्रसंगी मोसीन कुरेशी यांनी सांगितले की ये तो सिर्फ झांकी है,अभी पिक्चर बाकी है आगे आगे देख ते जाओ होता है कुरेशी यांनी जिल्हा अध्यक्ष यांना आश्वासन दिले की येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत एमआईएम पक्षाने दिलेले उमेदवार निवडून देणार आमच्या साठी हे इलेक्शन नवे तर एक मिशन आहे आम्ही हे मिशन जिकनाराच असे कुरेशी यांनी सांगितले.पुढे रियाज अहेमद,गुड्डू भाई या मान्यवारांची भाषणे झाली.यावेळी जिल्हाध्यक्ष  माजिद भय्याजी,निसार पटेल,रियाज अहेमद,  गुड्डू भाई उपनगरध्यक्ष बदनापुर, सैयद वसीम शहर अध्यक्ष परतूर,मान्यवार व शहरातील एमआईएम तालुका अध्यक्ष एजाज भाई,सय्यद अय्यूब,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,कदीर शाह,रफीक शाह,वहाब कुरेशी,जुनेद पठान,मोइस पठान,प्रदीप मोरे,सह मोठिया संख्यात शहरातील नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शेख परवेज यांनी केले.

Mantha news

Mosin kureshi