200

Followers

Thursday, 31 October 2019

मंठा तालुक्यात अवैध दारू विक्री जोमत...

(जिल्हा दारूबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, स्थानिक पोलिसांचे अभय)

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : शहरातील जालना- जिंतूर रोडवर असलेल्या ढाब्यावर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध विदेशी दारू विक्रीने अक्षरशः थैमान घातले आहे शहरातील ए
कही ढाब्याला अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नाही हे विशेष . मंठा तालुक्यातील सर्व ढाबे तसेच ग्रामीण भागात किराणा दुकानावरही अवैद्य विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे तळीरामांची संख्या वाढली आहे. या तळीरामांमुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे .राज्य उत्पादन शुल्क विभाग ,अन्न व औषध प्रशासन विभाग व स्थानिक पोलिसांची अवैद्य विदेशी दारू विक्री करणाऱ्या ढाबे चालकांवर मेहर नजर असून आर्थिक देवाण-घेवाण करून पोलीस सहकार्य करीत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात कुठे नाही तेवढे अवैद्य ढाबे मंठा शहरात विनापरवाना बिनबोभाटपणे चालू आहेत. शहरासह तालुक्यात अवैध देशी दारू मिळत असल्यामुळे शहरासह तालुक्यातील परवाना प्राप्त असलेले वाईन बार ,बार अँड रेस्टॉरंट ओस पडलेले आहेत. वास्तविक परवानाधारक बार चालकांना दरवर्षी शासकीय नियमानुसार सरकारचा टॅक्स जीएसटी भरावा लागतो तर अवैद्य ढाबे चालकांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय टॅक्स न भरता विनापरवाना ढाबे  मागील अनेक वर्षापासून चालू केले आहेत . तालुक्यातील सर्व अवैध धाब्यावर होणारी तसेच ग्रामीण भागात होणारी दारूची अवैध विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी होत आहे

मंठा शहरत डासंचा उपद्रव वाढला... डेंगुचे रुग्ण सापडल्यानंतर ही आरोग्य विभागाचे झोपीचे सोग

धुर फवारणीसह स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: सध्या मंठा शहरात डासांचा उपद्रव वाढल्यामुळे डसाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे थंडी-तापाच्या रुग्णांतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह
नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मंठा शहरात गेल्या आठवड्यात थंडी-तापाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत होती. पुन्हा गेल्या
तीन-चार दिवसांपासून शहरात डासांची उत्पत्ती बाढली आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त आहेत.प्रभाग क्रमांक ७ मध्ये शेख साद जुबेर तांबोली या सहा वर्षीय बालकाला डेंगू झाला आहे व त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.त्याला जालना येथे ओम बाल रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.सध्या मंठा शहरात डेंगूची साथ सुरु असून मच्छर चावल्यामुळे रक्तातील लाल व पांढऱ्या पेशी कमी होत आहे.व तापीचे प्रमाण वाढत आहेत.सध्या मंठा शहरात अशी परिस्थिती असून आरोग्य विभाग व नगरपंच्यात कडून कुठल्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही परिणामी लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.लवकरात लवकर मंठा शहरात धुर फवारणी करण्यात यावी व डेंगूचा बंदोबस्त करण्यासाठी कही उपाय योजना सुरु करावे नस्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय समोर जन आंदोलन करण्याचा इशारा शहरातील नागरिकांनी मंठा नगरपंचायत मुख्याधिकारी ला निवेदन दिला निवेदनात खाटीक लायक शरीफ,कुरेशी मुस्ताक अ.रहीम,शेख जुबरे खालेक,पठान इम्रान कलंदर खान,शेख आसेफ़ असद,शेख अजीज़ सयद लाल,आदिचे स्वाक्षऱ्या होते.

Monday, 21 October 2019

मंठा शहरात सरासरी 51.47 टक्के मतदान..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर-मंठा विधान सभा निवडणुकीत मंठा शहरात 51.47 टक्के एकूण मतदान झाले.
भाग क्रमांक (135) वर 1197 पैकी 841 मतदान झाले
भाग क्रमांक (136) वर 789 पैकी 295 मतदान झाले
भाग क्रमांक (137) वर 777 पैकी 374 मतदान झाले
भाग क्रमांक (138) वर 1127 पैकी 641 मतदान झाले
भाग क्रमांक (139) वर 1374 पैकी 725 मतदान झाले
भाग क्रमांक (140) वर 1389 पैकी 833 मतदान झाले
भाग क्रमांक (141) वर 769 पैकी 373 मतदान झाले
भाग क्रमांक (142) वर 728 पैकी 382 मतदान झाले
भाग क्रमांक (143) वर 678 पैकी 303 मतदान झाले
भाग क्रमांक (144) वर 1270 पैकी 636 मतदान झाले
भाग क्रमांक (145) वर 851 पैकी 312 मतदान झाले
भाग क्रमांक (146) वर 1201 पैकी 558 मतदान झाले
भाग क्रमांक (147) वर 834 पैकी 305 मतदान झाले
भाग क्रमांक (148) वर 996 पैकी 471 मतदान झाले
भाग क्रमांक (149) वर 1136 पैकी 612 मतदान झाले
भाग क्रमांक (150) वर 1230 पैकी 803 मतदान झाले
भाग क्रमांक (151) वर 1083 पैकी 558 मतदान झाले
भाग क्रमांक (152) वर 875 पैकी 401 मतदान झाले
एकूण 18304 पैकी 9422 मतदान मंठा शहरात झाले.





Saturday, 12 October 2019

सुरेश कुमार जेथलिया साहेबांच्या उपस्थिती मध्ये अनेक नागरिकांचा कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया साहेबांवर विशवास टाक़त अनेक  मुस्लिम बांधवांनी कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.या मध्ये बासखान पठान,हाजी सत्तार भाई,कदीरभाई कुरेशी,रहीम पठान,गनीभाई पटेल,अतीक खान,शेख अल्ताफ,राजा पठान,युसुफ बागवान,फारुख बागवान,शेख रियाज,अलीम कुरेशी,अब्दुल अजीज़,अज्जु  शेख,शेख सादेक,इरफान शेख,कदिर शेख,अय्युब शेख,जाबेर शेख,असलम पठान,शेख पाशु,अतीक शेख,मुमताज अतार,शेख नसिर यांनी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला या प्रसंगी परतुर-मंठा मतदारसंघातील उमेदवार सुरेश कुमार जेथलिया साहेब,उपनगरध्यक्ष सिराजखान पठान,राजेश राठोड,कॉंग्रेश तालुकाध्यक्ष निळखंड वायाड,शहरध्यक्ष शबाबभाई कुरेशी,कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक हाजी मुसाभाई कुरेशी,मोईन कुरेशी,अचित नाना,कबीर भाई तांबोली,नासेर तांबोली,राजाभाऊ खंदारे,सुरेश वावडे,विष्णु कळने आदि उपस्थित होते.
  

Friday, 11 October 2019

मंठा येथे लोणीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आठवले गट शिवसंग्राम रयत क्रांती संघटनेचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मंठा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आलेयावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर परभणीचे खासदार बंडु जाधव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एजे बोराडे,भुजंगराव गोरे, भाजप तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे, शिवसेना शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे, रासप तालुकाध्यक्ष भगवान कुर्धने, सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे, जि प सदस्य पंजाबराव बोराडे, किशोर हनवते, विष्णू पाटील, पंचायत समिती सदस्य बीड पवार, दत्तराव कांगणे, बाबाजी राठोड,कैलास बोराडे,अशोक नाना वायाड, मधुकर काकडे, नागेशराव घारे, माजी सभापती संतोष वरकड, सुरेश सरोदे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी संपूर्ण मराठवाड्यातून बबनराव लोणीकर सर्वाधिक मताधिक्याने विजय होणार असून पुढील काळात त्यांना याहीपेक्षा अधिक चांगले खाते मिळेल असा विश्वास व्यक्त केलापालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परतूर विधानसभा मतदार संघात विकासाचा अनुशेष भरून काढण्यात बऱ्याच अंशी यश आले असून उर्वरित विकास कामांना पुन्हा चालना देण्यासाठी व विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन देखील यावेळी उपस्थितांना खासदार बंडु जाधव यांनी केलेयावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आठवले गट शिवसंग्राम रयत क्रांती संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Thursday, 10 October 2019

प्रदेश युवक कॉंग्रेसचा युवकांसाठी काँग्रेसचा विशेष जाहीरनामा.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवकांसाठी विशेष जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे तीन कोटी युवकांनी सहभाग घेतलेल्या वेकअप महाराष्ट्र या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यातील युवकांनी ज्या बहुमूल्य सूचना दिल्या आहेत, त्या सूचनेनुसार आगामी विधानसभेच्या दृष्टीने युवक काँग्रेसचा विशेष जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धोंडीराम जी राठोड, परतूर विधानसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश भैया राठोड, काँग्रेसचे नेते अन्वर बापू देशमुख युवक काँग्रेसचे परतूर विधानसभा अध्यक्ष सुरेश वाव्हळे, मंठा तालुका अध्यक्ष नीळकंठ वायाळ, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब गोरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव गणगे, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, समाजकल्याण सभापती दत्ता बनसोडे,मधुकर मोरे,मूसा भाई कुरेशी,मोईन कुरेशी,प्रकाश अण्णा घुले, बाळासाहेब वांजोळकर, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या जाहीरनाम्यामध्ये युवकांच्या विविध प्रश्नाबाबत विचार करण्यात आलेला आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्ज माफ करण्यात येतील युवकांसाठी वस्तीग्रहांची संख्या वाढवण्यात येईल, दिव्यांगासाठी विनामूल्य प्रशिक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना5000 बेरोजगार भत्ता. सरकारी रिक्त नोकऱ्यांची तात्काळ भरती करणे, नोकरीमध्ये स्थानिक युवकांना(भूमिपुत्रांना) 80 टक्के आरक्षणाचा कायदा करणे, जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, महाराष्ट्रात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे.खास युवकांसाठी बनवलेला देशातील हा पहिला जाहीरनामा असून परतुर विधानसभेतील प्रत्येक युवक मतदारांपर्यंत हा जाहीरनामा पोहोचवण्यात येईल असे प्रदेश सचिव राजेश भैया राठोड यांनी सांगितले

Tuesday, 8 October 2019

वांजोळा येथील युवा नेते कैलास पाटील चव्हाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी, वांजोळा पुनर्वसन येथील युवा नेते कैलास पाटील चव्हाळ यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला पाणीपुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर व युवा नेते राहुल भैया लोणीकर यांच्यावर विश्‍वास टाकत त्यांनी  व त्यांचे मित्र गजानन चव्हाळ पाटील यांनीही त्यांच्या विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला एक तळागळातील कार्यकर्ता असलेले तसेच सामाजिक जीवनामध्ये निस्वार्थपणे काम करणारे तसेच गोरगरिबांच्या हाकेला जाणारे अशी कैलास पाटलांची ओळख आहे माननीय नामदार यांनी व तसेच राहुल भैया यांनी पुनर्वसन झालेल्या गावांची अडचण तसेच असुविधा ह्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की साथ देऊ तसेच जे गावांचे पुनर्वसन झाले आहे तिथल्या अडीअडचणी दूर करू अशी ग्वाही दिली येणाऱ्या काळामध्ये एक नवीन नेतृत्व कैलास पाटील चव्हाळ यांच्याकडे पाहिले जाते

Thursday, 3 October 2019

मंठा येथे स्वीप समिती उपक्रमाअंतर्गत मतदार जागृती आभियानाचा प्रारंभ...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे मतदानात नागरिकाणी मोठया प्रमाणावर सहभाग घ्यावा यासाठी मंठा तालुका स्पीप समितीने सुरुवात केली आहे आज स्वामी विवेकानंद विद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, जि.प.शाळेत संकल्पपत्रक वाटप करण्यात आले त्यांच्याकडून ही संकल्पपत्रे भरूण घेतली जानार आहेत.आज स्वीप समीतीने शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ घेतली मंठा स्वीप समीतीकडून मतदार जागृतीसाठी निबंधस्पर्धा,रांगोळीस्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा,पालकसभा,वकृत्वस्पर्धा मतदार जनजागृती रँलीचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील कला पथके, भारूड पथके, यांचा वापर मतदान जागृतीसाठी केला जानार असल्याचे के.जी राठोड सर,यांणी मराठवाड़ा न्यूजशी'बोलतांना  सांगीतले या स्वीप समितीमध्ये प्राचार्य डॉ.बी.डी खंदारे सर,प्रा.डॉ.एस.के.कमळकर सर,अंकुशराव मोरे (नाना)सौ. वदंना वरकड मॅडम,अशोक मुळे सर कार्यरत आहेत.

Wednesday, 2 October 2019

"स्वच्छता ही सेवा' अभियानाला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:महात्मा गांधी जयंती निमित्त मंठा शहरात आज 2 ऑक्टोंबर बुधवार रोजी "स्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी जिल्हापरिषद शाळा व नगरपंच्यातच्या वतीने शहरातील विविध भागातुन महाऱॅली काढ्ण्यात आली. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय येथून मुजम्मिल अन्सारी सर यांनी हिरवा झेंडा दाखवुन ऱॅलीस सुरवात करण्यात अली "स्वच्छता ही सेवा' अभियान मोहिमेत शहतील प्लास्टिक बैग,पानी बॉटल,कचरा गोंळा करण्यात अला सदरील महाऱॅलीस डॉ.चाटसे सर,रामेश्वर बोराडे, जावेद शेख, सुधाकर खैरे, प्रमोद पालवे, आसेफ़ तांबोळी, सदाशिव मोरे, रघुनाथ बोराडे, मोसीन बागवान, तसेच जि.प. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी व कर्मचारी शहतील नागरिकांची उपस्थित होते.



Tuesday, 1 October 2019

परतुर-मंठा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार कोण?

माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया..    
माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड यांच्या गांव गावत भेटी-गाठी सुरु...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया व माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड दोन्ही इच्छुक असलेले उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला आहे. गावोगाव जावून लोकांच्या भेटी-गाठी घेत आहेत.२०१४ मध्ये विद्धमान पानी पुरवठा मंत्री बबनराव लोनिकर यांनी सुरेश कुमार जेथलिया यांना ४३६० मतानी पराभव केला होता.२०१४ मध्ये कोनी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याने सुरेश कुमार जेथलिया यांना कॉग्रेस पक्षाचे टिकट मिळले होते मात्र अता माजी आमदार धोडीराम राठोड यांचे चिरंजीव जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड हे पण मैदानात उतरले आहे मंठा-परतुर मतदार संघात उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहे मात्र कोणाला कॉंग्रेस पक्षाचे टिकट मिळेल याकड़े सर्वच मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतिचे खासदार बंडू जाधव यांना परतुर-मंठा मतदार संघातून १८७२३ मतांची लिड मिळाली होती सध्या परतुर-मंठा मतदारसंघातून विद्धमान आमदार पानी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोनिकर हे बीजेपीचे उमेदवार जवडपास निश्चित झाले आहे.लोकसभा निवडणुकीत युति धर्म पाडून लोनिकर साहेबांनी युतिला लीड मिडवून दिली होती पण आता शिवसेना युती धर्म पाडणार का?हा देखील महत्वाचा विषय आहे.
.