200

Followers

Thursday, 24 May 2018

जालना : बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात

जालना : बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात

नगराध्यक्षपदी प्रदीप साबळे तर उपनगराध्यक्षपदी शेख युनुस यांची निवड

बदनापुर प्रतिनिधी, बदनापूर नगरपंचायतमध्ये आज ता. 23 मे रोजी 12 वाजता नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली असुन नगराध्यक्षपदासाठी भाजपचे प्रदीप साबळे यांना 10 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रीती प्रमोद साबळे यांना 7 मतदान मिळाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप साबळे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शेख युनुस शेख लालमिया यांनी उमेदवारी दाखल होती व आघाडीचे नगरसेवक राजेंद्र जैस्वाल यांनी उमेदवारी दाखल होती. परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेख युनुस शेख लालमिया यांच्या बाजुने 10 मतदान झाल्याने व प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार राजेंद्र जैस्वाल यांना ही केवळ 7 मतदान मिळाल्याने शेख युनुस शेख लालमिया यांनी बाजी मारली आहे. तसेच बदनापूर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी शेख युनुस शेख लालमिया यांची दुस-यांदा निवड झाली आहे. नगरपंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप साबळे व उपाध्यक्ष शेख युनुस लालमियां यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Wednesday, 23 May 2018

मंठयात नगरपंच्यातच्या सत्तेसाठी शिवसेना-कॉंग्रेस एकत्र

नगराध्यक्षपदी शिवसेनाचे नितिन राठोड तर
उपनगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे सिराज खान पठान यांची बिनविरोध निवड....

मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी:मंठा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र, तत्कालीन नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांचे पती कैलास बोराडे व संजय सरोदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत घरोबा केल्यामुळे ही निवडणूक लागली होती. १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र , शिवसेनेत दोन गट तयार झाल्याने शिवसेनेला सत्ता टिकविण्यासाठी कॉग्रेसला सोबत घेतल्याने पुन्हा नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे सिराज खान पठान यांची निवड झाली. यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए जे पाटील बोराडे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मंठयात सत्तेसाठी भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकजीत आल्याचे पहावयास मिळले आहे.

निवडणूक पीठासीन अधिकारी तथा परतुरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजिश पाटिल व प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी विशेष सभा बोलवुन निवडणूक घेतली. ही निवडणूक शांततेत पार पडली. यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नितिन राठोड, बालासाहेब बोराडे,इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे,सौ. सिमा नीरज सोमाणी तर काँग्रेसचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सिराज खान पठान, अचित बोराडे,शेख साजिद जलील, सौ.बिलकिस मोईन कुरेशी, सौ.एजाज नसरीन मूसा कुरेशी यांची उपस्थिती होती.

Tuesday, 22 May 2018

आज कुमारस्वामी यांचा शपथविधी


कॉंग्रेसचे दलितनेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद

मोसीन कुरेशी

बंगळुरु : जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर गुरुबारी विधानसभाध्यक्षांची निवड करण्यात येईल. शपथविधीनंतर आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडू, असे कुमारस्वामी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या के.आर रमेशकुमार यांचे नाव निश्चित केले आहे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर अन्य मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप केले जाईल, असे कुमारस्वामी म्हणाले.

Monday, 21 May 2018

कर्नाटकात होणार दोन उपमुख्यमंत्री ?

कुमारस्वामींनी घेतली सोनिया राहुलची भेट

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस व जनता दलाचे संयुक्त सरकार बनवण्यासाठीचा मसुदा तयार झाला असून, त्यासंदर्भात भावी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ब यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी ४ बाजता बंगळुरुमध्ये होणार्या शपथविधीला हजर राहणार आहेत. काँग्रेस नेत्यांशी कुमारस्वामी यांची जी

चर्चा झाली, त्यात बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यावर निर्णय झाला. काँग्रेसने दोन उपमुख्यमंत्री असावेत, असा प्रस्ताव कुमारस्वामी यांच्यापुढे ठेवला आहे.तसेच काही महत्त्वाची खाती काँग्रेसला द्यावीत असेही त्यांना सुचवण्यात आले आहे. त्यावर मंगळवारी अंतिम निर्णय होईल. राहुल यांची कुमारस्वामींनी भेट घेतली, तेव्हा खा. के.सी. वेणुगोपालही हजर होते. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने जी. परमेश्वर यांचे नाव नक्की केले आहे.

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा ..पालक मंत्री बबनराव लोनिकर

मोसीन कुरेशी

मंठा, दि. 21 -  जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे.  ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन विकासाची कामे करत असताना ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील विडोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भूजंगराव गोरे ,  संदीप गोरे, अंकुशराव बोराडे, , गणेशराव खवणे, , शिवाजी आबा खंदारे, बाबुराव शहाणे, रामराव लोणीकर, राजेश मोरे, , प्रदीप बोराडे, पंजाबराव बोराडे, कल्याण खरात, संभाजी खरात, नागेशराव घारे ,कैलास बोरडे, प्रकाश टकले, सदाशिव निर्वळ, सुदाम प्रधान, विष्णु फपाटे, शिवदास हानवते,  नाथराव काकडे, गजानन देशमुख, अशोक वायाळ, नितीन सरकटे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार राहूल गायकवाड, रावसाहेब आवचार, एम.डी.राठोड, निवास देशमुख, डिगांबर मुजमुले, विठ्ठलराव काळे,  निवास देशमुख, ज्ञानोबा आवचार रामकिसन आवचार रामराव गोरे, भीमराव भरर्गे संजय सहजराव, लक्ष्मण ज्ञानोबा मगर, अनिल राऊत, शंकर मोरे, परमेश्वर गोरे,  बाबुराव गोरे, सुदाम प्रधान, शेषराव गोरे, रामराव गोरे, रस्तुम कदम, डिगंबर मुजमुले, विठ्ठलराव काळे महादुअप्पा कापसे, नारायणराव कदम, उत्तमराव गोरे, बालासाहेब चिंचोलकर, रंगनाथराव आवचार, विठ्ठलराव कदम, लक्ष्मण आवचार, अच्चुतराव आवचार , सर्जेराव कदम, श्रीमती  झरे  आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन गावामध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.   विडोळी (खु) ते मंगरूळ रस्त्याचे मजबुतीकरण व डाबरीकरणं करणे त्यात ग्रामपंचlयंत आंतर्गत पाईप लाईन व इतर कामे मिळून एकून 01 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गावांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतींची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करुन ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत. 
दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासाला शासनाने प्राधान्य दिले असुन जालना जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी 7 हजार कोटी रुपंयाचा निधी मंजूर करुन या निधीच्या माध्यमातुन संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत.  दोन हजार कोटी रुपये खर्चून शेगाव ते पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे कामही वेगाने करण्यात येत असुन मतदारसंघातील 200 गावांमध्ये रस्त्याची कामे करण्यात येत आहेत.  येणाऱ्या काळात मतदारसंघातील एकही गाव पक्क्या व डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांतील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपये खर्चून वॉटरग्रीड योजना करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत अकराशे किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार असुन आतापर्यंत 450 किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. शंभर गावामध्ये पाण्याच्या टाक्यांची कामे सुरु करण्यात आली असुन लवकरच  या योजनेचे काम पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात वीजचे जाळे निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठयासाठी प्रयत्न करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 उपकेंद्र मंजुर करण्यात आले असुन त्यापैकी 20 उपकेंद्रांची कामे सुरु करण्यात आली आहेत.  विडोळी, पाटोदा येथे 33 के.व्ही. मंजूर असुन केंधळी येथेही 33 के.व्ही.चे उपकेंद्र करण्यात येणार असुन त्यामुळे या भागातील जनतेला सुरळीतपणे वीज पुरवठा होणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात अनेकविध मोठमोठे प्रकल्प उभारणीवर भर देण्यात येत असुन जालना येथे 200 एकर जागेवर रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे.  या महाविद्यालयाच्या माध्यमातुन जिल्ह्यासह मराठवाड्यातील गोरगरीबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.  त्याचबरोबर जिल्ह्यात सीडस पार्कचीही उभारणी 110 एकर जागेवर करण्यात येणार असुन याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन जालना जिल्ह्यात या अभियांनातर्गत 200 कोटी रुपयांचा निधी खर्चून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच 600 बंधाऱ्यांची उभारणी करुन  जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत.  या कामांध्ये महाजनट्रस्ट, नाम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थांचीही मदत घेण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री                      श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

Sunday, 13 May 2018

ऑल इंडीया पयामे इंसनियत फोरमच्या वतीने मंठा बस्थानकात प्रवासी यांना एक हजार पानी पाऊच वाटप करण्यात आले.

(मराठवाडा न्यूज)

मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,सर्व राज्यात उन्हाचा ताड़का बसत आहे व तापमान 43 से. वर गेला आहे. यामुळे प्रवास करणारे प्रवासी यांची लाही लाही होत आहे.बस स्थानकात पानी पाऊच भेटत नाही व  बिसलेरी साठी 15 ते 20 रूपये मोजावे लागत असल्याने गरीब प्रवासियांना  वीना पाण्याचेही प्रवास करावा लागत असल्याने ही परिस्तिथि समजून मानवतेचा संदेश देणारी संघटना ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या वतीने मंठा येथील बस्थानकात प्रवासियांना 1000 हजार पानी पाऊच वाटप करण्यात आले या प्रसंगी थंड पानी पाऊच पिऊन प्रवासीयांनी पयामे इंसानियतच्या सदस्यचे आभार मानले यावेळी मराठा सेवासंघचे एस एन मोरे सर,खराबे सर,नगरसेवक इल्यास कुरेशी व सर्व ऑल इंडिया पयामे इंसानियत फोरमच्या मंठा यूनिट उपस्थित होते.