मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मंठा तालुक्यात पोलिसांनी दी.2 शुक्रवार रोजी दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड मारली आहे पहिली धाड
शहरातील जवाहर कॉलनीत तर दुसरी धाड मंठा तालुक्यातील टोकवाडी येथे टाकण्यात आली आहे. पहिल्या धाडीत जवाहर कॉलनी परिसरातील देशी दारू समोरील मैदानात मंठा पोलीस व परतूरच्या पथकाने छापा मारून नऊ जणांना जेरबंद केले आहे.देशीदारू दुकानासमोरील मैदानात बाभळीच्या झाडाखाली काही लोक गोलकार बसून छन्ना मन्ना जुगार खेळवितांना मिळून आल्याने पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांचे आदेशाने नऊ आरोपींना जेर बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दत्ता निर्वती बोराडे वय ३० राहणार बोराडे गल्ली मंठा, सुशील विष्णू बोराडे वय ३३ राहणार बोराडे गल्ली मंठा, ज्ञानेश्वर उत्तम मुळे वय ३१ राहणार तुकाराम नगर मंठा, दीपक बाबुराव दळवे वय ४८ राहणार शिवाजी चौक मंठा, शेख आसिफ शेख बशीर वय ३० राहणार अहमदपूरा मंठा, शेख शेखअली अहमद वय ३५ राहणार अहमदपूरा मंठा, लक्ष्मण लिंबाजी वय २६ राहणार जवाहर कॉलनी मंठा, श्रीराम बाबासाहेब बनकर वय ३४ राहणार ठेंगेवडगाव तालुका मंठा जिल्हा जालना, रणजीत आनंदराव गायकवाड वय ३८ राहणार जवाहर कॉलनी मंठा असे एकूण नऊ जणांना मंठा पोलीस व परतूरच्या पथकाने छन्ना मन्ना जुगार खेळताना रंगेहात पकडले त्यांच्याकडून सहा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मंठा पोलिसांनी जुगारयांना अटक केली आहे यावेळी पोलीस पथकाने छापा टाकला यामध्ये मंठा पोलीस ठाण्याचे ढवळे साहेब,हगवने साहेब,काढे साहेब,आढे साहेब तसेच परतुर एस.डी.पि.ओ.पथकचे खरात साहेब पवार साहेब तडवी साहेब वाघमारे साहेब यांचा समावेश होता.तर दुसरीधाड मंठा तालुक्यातील टोकवाडी या गावी भगवानराव लक्ष्मणराव गाडेकर यांच्या घरासमोरील लिंबाचा झाडाखाली गोलकार बसून छन्ना मन्ना जुगार पैसा लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती मंठा पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब.यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राऊत साहेब,ढवळे साहेब,प्रशांत काढे साहेब,आढे साहेब,रजाडे साहेब,जुंबडे साहेब यांनी टोकवाडी येथे जाऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊ वाजता धाड टाकली. तेव्हा सात जन पैसे लावून जुगार खेळतांना आढळून आले. या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात गणेश बाबासाहेब वायाळ वय ४५ राहणार टोकवाडी तालुका मंठा, रोहिदास शेषराव गाडेकर वय ३५ राहणार टोकवाडी तालुका मंठा,आबासाहेब दत्ताराव गाडेकर वय ४१ राहणार टोकवाडी तालुका मंठा,लक्ष्मण रामराव वायाळ वय ४८ राहणार टोकवाडी तालुका मंठा, रमेश सखाराम जाधव वय ४८ राहणार टोकवाडी तालुका मंठा, सुरेश सिताराम जाधव वय ३० राहणार टोकवाडी तालुका मंठा, महादेव ज्ञानदेव गाडेकर वय २५ राहणार टोकवाडी तालुका मंठा,असे एकूण सात जणांना मंठा पोलिसांनी जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.असून पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांचे आदेशाने पोलीस राठोड साहेब यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास के एस चव्हाण साहेब करत आहे.