200

Followers

Monday, 25 February 2019

भारताचा पाकिस्तानावर हवाई हल्ला, दहशतवादी तळांवर 1000 किलोचा बॉम्ब टाकला'


पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये
तणावाचे वातावरण आहे.अशातच पाकिस्तानकडून  आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने एलओसी ओलांडली. मात्र, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने केला आहे. भारतीय सैन्याने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची 10 विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे. 
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय
हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे. 
काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. पाकिस्तान आणि भारताकडून दोन्ही बाजुंनी एकमेकांना घेरण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी दिली होती. यावर पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिला होता.

Tuesday, 19 February 2019

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि संत रविदास महाराज यांची जयंती साजरी...

मोसीन कुरेशी मंठा /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज आणि संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माऊली अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सतीशराव निर्वळ यांचा शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथील मार्केट कमिटीच्या सभाग्रहात मंगळवार ता.19 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी होते तर व्यासपीठावर सतीशराव निर्वळ, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष दायमा, बाजार समितीचे संचालक मुस्तफा पठाण ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे ,तुकाराम मुळे यांची उपस्थिती होती .प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज ,संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .श्री सतीशराव निर्वळ  यांनी शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या समाजउपयोगी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघाने त्यांचा यथोचित सत्कार केला तसेच अनिल बा. खंदारे यांची दैनिक लोकपत्रच्या जिल्हा प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री सतीशराव निर्वळ म्हणाले की,पत्रकार हा समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतो आपल्याला समाजात मिळणारा मानसन्मान हा पत्रकारांचे लेखणीमुळे मिळत असून लेखणीची ताकद आहे त्यांच्या लेखणीमुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार काढले पत्रकार संघाचे नवीन सदस्य प्रवीण दीक्षित आणि आसाराम शेळके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा, बालाजी कुलकर्णी ,पंडितराव बोराडे, अनिल बा.खंदारे ,तुकाराम मुळे ,रमेश देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप केला .या कार्यक्रमाला बाजार समितीचे सचिव शिवाजी छानवाल, विजयकुमार देशमुख, लखन जयस्वाल, डाॅ आशिष  तिवारी,कैलास पवार, अमोल राऊत ,रवी पाटील ,प्रकाश भावसार, गौतम सदावर्ते,विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती. पत्रकार संघाचे सरचिटणीस मोसिन कुरेशी यांनी आभार मानले

Sunday, 17 February 2019

मुस्लिम बांधवांनी जाळला पाकिस्तानी झेंडामंठयात निषेध रैलीला उत्स्फुर्त प्रतिसाद ....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:जम्मू काश्मीरमधील पुलवामा
येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद मंठा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही उमटले. मंठा तालुक्यात रविवारी  सकाळ पासूनच व्यापार्यांनी आपल्या बाजारपेठ बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली. शहरातील शिवाजी चौक,टीपु सुल्तान कॉर्नर,मार्किड् यार्ड, ते मंठा फाटा पर्यन्त सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना सर्व समाजांच्या वतीने निषेध रैली काढण्यात आली होती. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा बाजी देत मुस्लिम बांधवांच्या वतीने पाकिस्तानी झेंडा जाळण्यात अला असून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी प्रा. कमळकर सर यांनी या भ्याड हल्ल्याचे पाकिस्तान आणि दहशतवादीयांना चोख उत्तर देण्याची मागणी आपल्या भाषणात केली.या वेळी दुकाने,हॉटेल,पान टपऱ्या सकाळ पासुन उत्स्फुर्तपने कडकडीत बंद पाळण्यात आले.या रॅलीत मोठीया संख्याने हाजरी लावून भारतीय एकात्मताचे दर्शन घडविले, यावेळी सर्वपक्षीय  व हिंदु-मुस्लिम बांधव मोठीया संख्याने सहभागी झाले होते.

Friday, 8 February 2019

सोशल मीडियावरून अर्वाच्च भाषेचा वापर करून पत्रकाराची बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कारवाई करा .........महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...................

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील दैनिक पुढारी चे प्रतिनिधी सिताराम लांडगे यांना सोशल मीडियावरून अर्वाच्च भाषेचा वापर करून बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा च्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय कुमार  डवले यांना देण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा च्या वतीने निषेध करण्यात आला .गुन्हेगारी वृत्तीचा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा ,कार्याध्यक्ष अरुण राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे, तुकाराम मुळे, सरचिटणीस मोसिन कुरेशी, बाबासाहेब कुलकर्णी ,बालाजी कुलकर्णी ,अमोल राऊत, अनिल बा खंदारे, रमेश देशपांडे, विजयकुमार देशमुख ,प्रवीण दीक्षित, प्रदीप तळणीकर, लखन जयस्वाल, डॉ आशिष तिवारी, रवी पाटील, प्रकाश भावसार ,राघूसिंग जनकवार ,किरण अवचार, कैलास पवार, गौतम सदावर्ते, यांच्या निवेदनावर सह्या आहेत