ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी..
मोसीन कुरेशी
मंठा:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे प्रमुख हैदराबादचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरांची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोड़फोड़ केली.होती या प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे तर मंठा तालुक्यातील मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ए.आई.एमआईएम पक्षाच्या वतीने तहसील मार्फ़त राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.त्या निवेदनात म्हटले की तोडफोड करणाऱ्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी.. या निवेदनवर एमआईएम् पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख एजाज,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,जुनेद पठान,शेख खाजा,शेख अर्शद,इम्रान मणियार,रियाज शेख,लखन कामळे,इस्माइल शेख,शेख अबरार शेख, सलमान शेख,इसराइल शेख आवेस,सय्यद नवीद,मुस्तकीम, शेख रशीद,शेख सगीर,शेख अफरोज,नितिन बरसे सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे स्वाक्षर्या होते.