Saturday, 25 September 2021

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घरांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करा..


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी..

मोसीन कुरेशी
मंठा:ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे प्रमुख हैदराबादचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरांची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोड़फोड़ केली.होती या प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे तर मंठा तालुक्यातील मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ए.आई.एमआईएम पक्षाच्या वतीने तहसील मार्फ़त राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.त्या निवेदनात म्हटले की तोडफोड करणाऱ्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी.. या निवेदनवर एमआईएम् पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख एजाज,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,जुनेद पठान,शेख खाजा,शेख अर्शद,इम्रान मणियार,रियाज शेख,लखन कामळे,इस्माइल शेख,शेख अबरार शेख, सलमान शेख,इसराइल शेख आवेस,सय्यद नवीद,मुस्तकीम, शेख रशीद,शेख सगीर,शेख अफरोज,नितिन बरसे सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे स्वाक्षर्‍या होते.

Wednesday, 15 September 2021

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत राज्य शासषणाकडून जलदगतीने मदत मिळवून देणार..आ.सुरेश जेथलिया

मंठा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्यात मा.आ.सुरेश जेथलिया यांनी व्यक्त केला विश्वास
 
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे एकप्रकारे शेतकऱ्यांवर  आस्मानी संकट कोसळले असून याबाबत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मावेजा  मिळवून  देण्याबाबत शाषणस्तरावरून देखील  जलद गतीने पाठपुरावा चालू आहे, एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास  मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केला. दिनांक 12 ऑक्टोबर  रोजी मंठा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या  नुकसान पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी  बोलताना पुढे म्हटले की, झालेल्या नुकसणीबाबत युद्धय पातळीवर पंचनामे करत संबधीत शेतकरयांना मावेजा मिळण्याबाबत मी वरिष्ट नेत्यांकडे मागणी केली असून चर्चाही झाल्याचे त्यांनी म्हटले . तालुक्यातील ढोकसाळ येथे अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटले.जवळपास सर्वच विहिरी गाळाने भरल्या गेल्या व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले.झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली व तसेच मा.ना.बाळासाहेबजी थोरात साहेब यांना संपूर्ण मतदारसंघातील परिस्तिथीचा अहवाल पाठवून महसूल विभागाला लवकरच वरिष्टांकडून योग्य त्या सूचना मिळवून देण्यासाठी आदेशित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी  त्यांच्यासोबत किसनराव मोरे ,हरिभाऊ देशमुख ,निळकंठराव वायाळ ,अण्णासाहेब खंदारे ,दिलीपराव चव्हाण ,लक्ष्मण शिंदे ,वसंतराव देशमुख,रंजीत देवकर ,अमर देशमुख ,बाळासाहेब देशमुख ,सारंगधर देशमुख ,सुरेश देशमुख ,ऍड भागवत देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्तिथ होते.

Thursday, 9 September 2021

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी सामुहिक बलात्कार हत्याकांड प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

टिपू सुलतान युवा मंचची मागणी

मंठा प्रतिनिधी:राजधानी दिल्ली येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी यांच्यावर २७ आगस्ट रोजी काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली होती.राबिया सैफी ही २१ वर्षाची युवती दिल्ली येथे संगम विहार येथील रहिवासी होती.राबिया हे दिल्ली येथे पोलीस कॉंस्टेबल होती.२७ ऑगस्ट हा दिवस राबिया सह देशाचा कळा दिवस ठरला कही नराधमांनी राबिया वर सामूहिक बलात्कार करुन त्याच्या वर ५० वेळा चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली.इतकंच नाही तर क्रूर आरोपींकडून त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले होते.इतकी निर्घृण पने देशाची राजधानी दिल्ली येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल वर बलात्कार व हत्त्या होते तर आम महिलांचा काय वेळोवेळी होणारे महिलांवर अत्याचार बलात्कार हत्या कधी थांबणार ही कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थितीचा जबाबदार कोण ? या घटनेचा तपास सीबीआय मार्फत लवकरात लवकर लावुन हा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज ९ सप्टेंबर गरुवार रोजी मंठा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,इम्रान मनियार,इन्नु कुरेशी,अलीम कुरेशी,आरिफ कुरेशी,मुक्तदीर बागवान,सिराज कुरेशी,अनिस कुरेशी,इमरान तांबोळी,मुस्तकीम कुरेशी,मोइस कुरेशी,सोनु कुरेशी,सोहेल कुरेशी,शेख अशफाक,जावेद कुरेशी,शेख कलीम यांची स्वाक्षर्‍या होते.