200

Followers

Wednesday, 15 September 2021

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत राज्य शासषणाकडून जलदगतीने मदत मिळवून देणार..आ.सुरेश जेथलिया

मंठा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्यात मा.आ.सुरेश जेथलिया यांनी व्यक्त केला विश्वास
 
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे एकप्रकारे शेतकऱ्यांवर  आस्मानी संकट कोसळले असून याबाबत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मावेजा  मिळवून  देण्याबाबत शाषणस्तरावरून देखील  जलद गतीने पाठपुरावा चालू आहे, एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास  मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केला. दिनांक 12 ऑक्टोबर  रोजी मंठा तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या  नुकसान पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी  बोलताना पुढे म्हटले की, झालेल्या नुकसणीबाबत युद्धय पातळीवर पंचनामे करत संबधीत शेतकरयांना मावेजा मिळण्याबाबत मी वरिष्ट नेत्यांकडे मागणी केली असून चर्चाही झाल्याचे त्यांनी म्हटले . तालुक्यातील ढोकसाळ येथे अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटले.जवळपास सर्वच विहिरी गाळाने भरल्या गेल्या व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले.झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली व तसेच मा.ना.बाळासाहेबजी थोरात साहेब यांना संपूर्ण मतदारसंघातील परिस्तिथीचा अहवाल पाठवून महसूल विभागाला लवकरच वरिष्टांकडून योग्य त्या सूचना मिळवून देण्यासाठी आदेशित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी  त्यांच्यासोबत किसनराव मोरे ,हरिभाऊ देशमुख ,निळकंठराव वायाळ ,अण्णासाहेब खंदारे ,दिलीपराव चव्हाण ,लक्ष्मण शिंदे ,वसंतराव देशमुख,रंजीत देवकर ,अमर देशमुख ,बाळासाहेब देशमुख ,सारंगधर देशमुख ,सुरेश देशमुख ,ऍड भागवत देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्तिथ होते.

No comments:

Post a Comment