कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी सजग राहावे...
मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्यावतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांना आवश्यक त्या सूचना आणि कळकळीचे आवाहन करणारी स्टिकर्स आणि
पॉम्पलेटचे विमोचन सोमवार ता.30 रोजी पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे महाभयानक संकट उभे राहिले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तसेच पोलिस प्रशासन वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स फार्मासिस्ट यांच्यावतीने सातत्याने आवाहन करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिक मात्र आवश्यक ती काळजी घेताना दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक होल्डिंग पॉम्पलेट याद्वारे नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे घरी थांबा सुरक्षित रहा,आपण सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित, मास्क वापरावे, वारंवार हात धुवावे, घराबाहेर पडू नये प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना जाहीर पत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा,पोलीस उपनिरीक्षक नितिन गट्टुवार,मंजितसिंग सेना, बिरकायलु अण्णा,शाम गायके,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे, पत्रकार बालाजी कुलकर्णी,अनिल बा खंदारे, रमेश देशपांडे, मोसिन कुरेशी, डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, अमोल राऊत, अरुण राठोड, बाबासाहेब कुलकर्णी, तुकाराम मुळे, विजय देशमुख यांची उपस्थिती होती...