टिपू सुलतान युवा मंचची मागणी
मंठा प्रतिनिधी:राजधानी दिल्ली येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल राबिया सैफी यांच्यावर २७ आगस्ट रोजी काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली होती.राबिया सैफी ही २१ वर्षाची युवती दिल्ली येथे संगम विहार येथील रहिवासी होती.राबिया हे दिल्ली येथे पोलीस कॉंस्टेबल होती.२७ ऑगस्ट हा दिवस राबिया सह देशाचा कळा दिवस ठरला कही नराधमांनी राबिया वर सामूहिक बलात्कार करुन त्याच्या वर ५० वेळा चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली.इतकंच नाही तर क्रूर आरोपींकडून त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले होते.इतकी निर्घृण पने देशाची राजधानी दिल्ली येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल वर बलात्कार व हत्त्या होते तर आम महिलांचा काय वेळोवेळी होणारे महिलांवर अत्याचार बलात्कार हत्या कधी थांबणार ही कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थितीचा जबाबदार कोण ? या घटनेचा तपास सीबीआय मार्फत लवकरात लवकर लावुन हा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज ९ सप्टेंबर गरुवार रोजी मंठा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,इम्रान मनियार,इन्नु कुरेशी,अलीम कुरेशी,आरिफ कुरेशी,मुक्तदीर बागवान,सिराज कुरेशी,अनिस कुरेशी,इमरान तांबोळी,मुस्तकीम कुरेशी,मोइस कुरेशी,सोनु कुरेशी,सोहेल कुरेशी,शेख अशफाक,जावेद कुरेशी,शेख कलीम यांची स्वाक्षर्या होते.
No comments:
Post a Comment