200

Followers

Sunday, 4 July 2021

पालकमंत्री राजेश टोपे यांना शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का ?

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:एमआईएमचे जालना जिल्हाध्यक्ष माजेद भय्याजी यांनी ३ जुलै शनिवार रोजी मंठा-परतुर तालुक्याचा दौरा केला.याप्रसंगी मंठा एमआईएम पदअधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली.यावेळी जिल्हाध्यक्ष माजेद भैय्याजी,निसार पटेल,रियाज अहेमद,इस्माईल भाई,अनवरभाई,इम्रान चौधरी यांचा सत्कार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच मंठा तालुक्यातील एमआईएम पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न जिल्हाध्यक्ष समोर मांडले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजेद भैयाजी यांनि बोलताना सांगितले की पालकमंत्री राजेश टोपे साहेबांना मंठा तालुक्यात शासकीय समित्यांवर नेमणूक करताना मुस्लिम समाजाचा विसर पडला होता का असा प्रश्न जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित केला. याप्रसंगी एमआईएमचे तालुकाध्यक्ष शेख एजाज भाई ,ताहेर बागवान,मोसीन कुरेशी,सय्यदअय्यूब ,प्रदीप मोरे, क़ामळे,जुनेद पठान,शेख मुल्ला,शेख अरशद,शेख सलमान,शेख अजहर शेख शोहेब,शेख खाजा,शेख फयाज,सह मोठ्या संख्येने एमआईएम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment