मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : मंठा पोलीस स्टेशन येथील जप्त गुन्ह्यातील 9329 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मा. न्यायालयाच्या आदेशाने दोन शासकीय पंचायत समक्ष नष्ट करण्यात आल्या. सन 2012 ते 2020 या कालावधीत जप्त केलेल्या देशी-विदेशी अवैद्य दारूची किंमत 5,78,750 /- रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. टी. बिडकर, मंठा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व्ही. डी. पवार यांच्या उपस्थितीमध्ये जप्त अवैद्य देशी-विदेशी दारुचा साठा सोमवार ता. 10 रोजी नष्ट करण्यात आला. यावेळी एस. एम.भंडलकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनजीतसिंग सेना,पोलीस कॉन्स्टेबल दीपक आडे, नारायण आडे, शुभम ढोबळे, प्रशांत काळे, विशाल खेडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता फुलमाळी, शिवाजी लोखंडे, नगरपंचायतचे कर्मचारी सुनील मोरे व रमेश खंदारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment