मंठा प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाटा चा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या लाटीदरम्यान कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचेदेखील प्रमाण जादा आहे. यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू केली आहे. शहरात २८ एप्रिल बुधवार रोजी सकाळ पासूनच ग्रामीण रुग्णालय प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने लस घेण्यासाठी शासनामार्फत कोरोना निर्बंधदेखील लादले जात आहेत.आरोग्य केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची तुडुंब गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे. लस राहिली दूर रांगेतच करोनाची लागण व्हायची असे चित्र दिसत आहे.
या कडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment