200

Followers

Wednesday, 28 March 2018

एटीएम बाहेर लागणार रांगा !


बँकांचे काम आजच अटोपुन घ्या;शनिवार वगळता पुढील चार दिवस बँका बंद

मुंबई : (मराठवाडा न्यूज़ ब्यूरो)शनिवार वगळता गुरुवारपासून पुढील चार दिवस बँकांचे व्यवहार सर्वसामान्यासाठी बंद राहणार असल्याने ए टी एम बाहेर पैसे काढण्यासाठो रागा बघायला मिळु शकतात. त्यामळे बँकेची तातडीची असणारी कामे बुधवारीच आटोपून न घेतल्यास शनिवारी गर्दीत किंवा थेट मंगळवारीच व्यवहार करावे लागतील डिजिटायझेशनमुळे जवळपास ४० टक्के व्यवहार ऑनलाइन होत असले तरी  बँकना सुट्टी असली की सर्वाधिक भार ए टी एम वर येतो. राज्यात सर्व बँकांचे मिळून जवळपास २२००० ए टी एम आहेत. यामध्ये १५००० हून अधिक सरकारी बँकांच्या एटीएमची संख्या आहेत. सरकार बँकांनी एटीएममध्ये रोख भरण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती केली असली तरी सुट्टी असली की या एजन्सीसना बँकांच्या करन्सी चेस्टमधून रोख मिळत नाही. खासगी बँकांचे करन्सी चेस्ट मात्र सुट्टीच्या दिवशी सुरु असतात. एक अधिकारी त्यासाठी नियुक्त असतो. त्यामार्फत सुट्टीच्या दिवशीही एटीएममध्ये रोख भरणा होतो. अशा ४ ते ६ हजार एटीएमवर सुट्टीदरम्यान भार येण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment