मंठा प्रतिनिधी:मोसीन कुरेशी,मानवसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्याला मानून (एआयपीआयएफ)ऑल इंडिया फोरम पयामे इंसानियत संस्था हा मानवतेचा संदेश यांच्या वतीने आठवडयातून एकदा मानवसेवा केली जाते यांचा उद्देश् हा आहे की माणुस मध्ये मानुसकी जीवंत झाली पाहिजे ही संस्था देश पातळीवर सामाजिक कार्य करत आहे सर्व समजा मध्ये एकोपा, भाईचारा टिकून राहवा म्हणुन "मानुसकिचा संदेश" ही संस्था सामाजिक कार्य करत आहे. विशेष म्हणझे ही संघटना कोणत्या ही राजकीय किवां कोणत्या ही धर्माशी निगडित नाही. रुग्णाची सेवा करने, त्यांच्या तबीयती बाबत विचार पूस करने गरजू रुग्णांना मदद करने, तसेच अस्थिव्यंग शाळा मध्ये जाऊन विद्यार्ति यांच्या मध्ये जाऊन नाष्टा, पुस्तक वही वाटप करत आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणुन ही संस्था मंठा तालुक्यात एक वर्षा पासून काम करत आहे. या संस्थाला राजकीय मंडली व ग्रामस्ता कडून कौतुक करण्यात येत आहे.पयामे इंसानियत मंठाचे प्रमुख असलेले.मुफ़्ती रिजवान साहब यांनी महाराष्ट्रन्यूज़शी' बोलतांना सांगितले की आम्ही मंडळी मानवतेचा सन्देश देण्याचा कार्य करतात कारण दिवसेंदिवस मानवता झोपत आहे. मेलीली नाही थोड़ी मेहनत केलि तर संपूर्ण देशभरा मध्ये शातंता मानवता जीवंत होईल व सर्व मानव प्रेमचारा, भाईचारा, समाज बंधीलकी निर्माण होईल सर्व समाज बांधव यांचे पयामे इंसानियत मध्ये स्वागत आहे व येत्या सोमवारी 19 मार्च ला सेलू रेलवे स्थानक व्रती पयामे इंसानियत सेलु व मंठा यूनिट तर्फे जेवण वितरित करण्यात येणार आहे तरी सर्व समाज सेवक, धार्मिक गुरु, राजकीय नेते व नागरिकांनी उपस्तिथ राहावे व "मानुसकिचा सन्देश " द्यावा असे मुफ़्ती रियाज़ नदवी यांनी सांगितले.यावेळी मंठा येथील उपनगरअध्यक्ष बाळासाहेब बोराड़े, मालमत्ता अधीक्षक नगर पंचायत अंसारी सर, नगर सेवक अरुण वाघमारे, इलियास भाई कुरैशी, पत्रकार मोसीन कुरेशी,अनिल खंदारे, अतुल खरात,व म. पयामे इंसानियत यूनिट चे सर्व सदस्य उपस्तिथ होते.
No comments:
Post a Comment