मंठा प्रतिनिधी : ताणतणावात संघर्षरत तरुणपिढी, सततच्या नापिकीमुळे त्रस्त शेतकरी, व्यवसायाचा ताण घेऊन संपूर्ण दिवस घराबाहेर घालविणारे व्यावसायिक, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धेच्या युगात आव्हानं पेलणारे नोकरवर्ग झपाट्याने व्यसनाच्या आधीन जात आहेत. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही मंठा शहरात दररोज लाखोंचा सुपारीचा चोळुन गुटखा ( खर्रा ) फस्त केला जात आहे. सिगारेट , गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचा खप वेगळाच.नागरिकांवर पडलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा हा विळखा निश्चितच गंभीर आहे. मंठा शहराची लोकसंख्येच्या तुलनेत यातील ५० टक्के लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब अशी की यातील १० टक्के सख्या महिलांची आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात जवळपास शंभरच्या पुढे पानटपर्या आहेत. यातून नियमित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. याशिवाय किराणा दुकानामधूनही हे पदार्थ विकले जातात, अशी माहिती आहे. यातील काही पानटपऱ्यांमधून दररोज २०० ते ३०० सुपारीचा चोळून गुटखा ( खर्रे ) विकले जात असल्याचे दिसुन येते. गल्लीबोळातील पानटपऱ्यांमधून खºर्यांचा खप होत नसला तरी गुटखा विकला जातो. या माहितीवरून सरासरी १०० खर्रे एका पानटपरीमधून दररोज विकले जात आहे. एका खऱ्य ची किमत १० ते २० रुपये, याप्रमाणे पानटपरीमधून दररोज लाखोंचा खर्रा खाऊन थुंकला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अगदी १३ वर्षांचे मिसरुड आलेले, न आलेले मुलेही या व्यसनात आकंठ गुरफटले आहेत. चॉकलेट, बिस्कीट व फळे खायच्या वयात ही मुले चक्क गुटखा (खर्रा) चघळताना दिसतात. दर एक तासात एक खर्रा फस्त करणार्यांचा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो. विशेष म्हणजे, शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे.अन्न-औषध प्रशासन विभागाला कारवाई अधिकार दिले आहे. असे असले तरी सुगंधित तंबाखू व त्याचे गुटखा ( खर्रे )सर्रास विकले जात आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जैसे थेच आहे.आरोग्य धोकादायक वळणावर." आरोग्य धोकादायक वळणावर असुन प्रदूषणाचा सरळसरळ परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. आता तरुणांपासून वयोवृध्द व महिलांपर्र्यत तंबाखूजन्य पदार्थाचा विळखा पोहचल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे.. बंदीचा केवळ फुगाच. " शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे.याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. मात्र अगदी डोळ्यादेखत खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री पानटपऱ्यांमधून केली जात असतानाही हा विभाग आपल्याच कार्यालयात अडकून पडला आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या बंदीचा कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. पालकांचे दुर्लक्षही कारणीभूत." अलिकडे मुलगा अगदी लहानवयातच गंमत म्हणून गुटखा ( खर्रा ) खायला लागतो. कधी सिगारेटही ओढतो. पाल्यांचे हे कृत्य प्रत्येक वेळी घराबाहेरच होत असतात असे नाही. घरीदेखील गुटखा (खर्याचा) पालकांना वास येतोच. मात्र याकडे पालक दुर्लक्ष करतात. काही जण याबाबत विचारणा करतातही; मात्र बाब गंभीरतेने घेतली जात नाही. पुढे गंमत म्हणून केलेले हे व्यसन मुलांना व्यसनाधीन करून टाकते.... ******** कायदा होणार कडक.... गुटखाबंदीबाबत अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यात गुटखाबंदीचा कायदा आणखी कडक केला जाईल, असे सांगितले होते. यासोबतच सुगंधी सुपारी, तंबाखू यांचे मिश्रम म्हणजे खर्याला गुटखाबंदीचे नियम लागू होतील, असे म्हटले होते. नियमाचे उल्लंघन करणार्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. याबाबत कठोर कायदा झाल्यानंतर त्याची तरी अंमलबजावणी गांभीर्याने व्हावी, अशी अपेक्षा आहे.
अलिकडच्या काळात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ही गंभीर बाब असुन मुखरोग व कर्करोगाचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. अशा परिस्थिती मुळेच शासनाने गुटखा व खर्यावर बंदी घातली आहे.याची गांभीर्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरूणाईनेही व्यसनाच्या आहारी न जाता सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा यापासून दूर राहिले पाहिजे.तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे केमिकल असते , त्यामुळे शरीराला घातक असुन कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यवसना पासुन दुर राहिले पाहिजे.... डाॅ.प्रताप चाटसे , निवासी वैद्यकीय अधिकारी , ग्रामीण रूग्णालय , मंठा.
तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे.विक्री होत असल्यास कारवाई करण्यात येईल.तसेच लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे. निखिल कुलकर्णी ,अन्नसुरक्षा अधिकारी , जालना
No comments:
Post a Comment