200

Followers

Thursday, 8 August 2019

प्रा. राजेश सरकटे यांचा आज डी डी सह्याद्री वाहिनीवर महाचर्चेत सहभाग ......

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त '' महाराष्ट्रातील समर गीतांची परंपरां व राष्ट्रभक्ती '' या विषयावर होणाऱ्या महाचर्चेसाठी स्वरविहारचे निर्माते प्रा राजेश सरकटे सहभागी होणार आहेत. त्यांना डी डी सह्याद्री वाहिनीचे सहसंचालक जयू भटकर यांनी निमंत्रित केले आहे .आज शुक्रवार ता. 9 ऑगस्ट सायंकाळी 5 ते 6 या वेळेत सह्याद्री वाहिनीवर महाचर्चा हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांमध्ये संगीतकार सोमनाथ परब, युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शहा ,ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा राजेश सरकटे हे 1990 पासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत स्वरविहारच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र व राज्याबाहेर जवळपास 4800 कार्यक्रम सादर केले आहेत तसेच त्यांनी गजर विठ्ठलाचा व वंदे मातरम कार्यक्रमाची निर्मिती सुद्धा केली आहे .भारतरत्न लता मंगेशकर यांच्या समवेत यांचे भक्तीगीत ध्वनिमुद्रित झाले असून त्यांना " मेनका उर्वशी "  या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सह्याद्री वाहिनीवर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्वरविहारचे संचालक संजय सरकटे व विनोद सरकटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment