मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे खंबीर नेतृत्व आणि युवानेते राहुल भैय्या लोणीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आज नेर येथील शेकडो युवकांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. परतूर, मंठा नेर आणि सेवली या मतदारसंघात झालेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन आम्ही पालकमंत्री लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी तयार झालो असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.नेर ही जालना तालुक्यातील आणि परतूर मतदारसंघात असणारी एक मोठी ग्रामपंचायत असून गावाचा विकास फक्त पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि युवानेते राहुल लोणीकर हेच करू शकतात ही भावना जनसामन्यात असून या पंचवार्षिक मध्ये काम करताना लोणीकर यांनी मतदार संघाचा कायापालट केल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुलवन्त यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून नेर फाटा - नेर - सेवली रस्ता डांबरीकरण, नेर ते तलाव सावंगी रस्ता डांबरीकरण, तिमा नाईक तांडा रस्ता डांबरीकरण, नेर-मोहाडी-खांबेवाडी-सेवली रस्ता डांबरीकरण, 132 केव्ही, 30 लक्ष रु चा भव्य सामाजिक सभागृह, नागरी सुविधा अंतर्गत 50 लक्ष रु, गावांतर्गत अनेक सिमेंट रस्ते, वॉटर ग्रीड मध्ये समावेश यासह अनेक विकास कामे झाली असून स्वातंत्र्याच्या 70 वर्षात एवढे काम एका पंचवार्षिकमध्ये याआधी कधीच झाले नाहीत, ते लोणीकर यांनी करून दाखवले असे यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप राठोड यांनी सांगितले.
यावेळी कैलास उफाड, दिलीप उफाड, भास्कर कुलवन्त, जिया चौधरी, अज्जूभाई, संदीप राठोड, विलासराव उफाड, वसीम सय्यद, अमीन शेख, कैलास उफाड, विलास पवार, शेख तंनु, आरिफ पठाण, सचिन उफाड, तोसीन शेख, शेख इम्रान, हिरालाल जैस्वाल, अखिल पठाण, जिजाभाऊ सहाणे, नारायण बोंद्रे, योगेश उफाड, शेख सगीर, प्रभू हिवाळे, अरबाज पठाण, मनोहर पाईकराव, अनिल हिवाळे, नशिर खा पठाण, विष्णू शिंदे, अशोक कुलवंत, कुलदीप कुलवंत, सतीश पाईकराव, अतिष कुलवंत, गणेश कुलवंत, गजानन कुलवंत, सुधाकर कुलवंत, वैजनाथ उफाड, हनुमंत गिरी, अभिजित उफाड, ज्ञानेश्वर उफाड, हकीम शेख, गजानन मोहिते, संदीप उफाड, अनिल राठोड, राहुल राठोड, नितीश चव्हाण, जगदीश राठोड, विलास राठोड, ज्ञानेश्वर राठोड, राजू पवार, गजानन राठोड, गजानन पवार, सतनाम राठोड, गजानन चव्हाण, सुभाष आढे, भारत पवार, विलास राठोड, अमोल राठोड, विकास चव्हाण, विकास राठोड, रवी राठोड, राम राठोड, रोहिदास राठोड, पांडू राठोड, सुदाम राठोड, अर्जुन राठोड, राजू राठोड, शिवाजी राठोड, सतीश राठोड, अमोल राठोड, प्रशांत राठोड, निलेश राठोड, श्रीराम राठोड, बाळू आढे, बंडू राठोड, रवींद्र राठोड अजय चव्हाण, समाधान राठोड, मिथुन राठोड, कैलास राठोड, कृष्णा चव्हाण, गजानन राठोड, सचिन चव्हाण, अशोक पवार, सतीश राठोड, रमेश राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment