मोसीन कुरेशी
मंठा, प्रतिनिधी:विषमतेवर आधारलेली आणि माणसाला गुलाम बनवून त्यांच शोषण करणारी समाजव्यवस्था बदलवून समाजपरिवर्तन करण हे अण्णा भाऊंच्या साहित्यांचे मध्यवर्ती सूत्र होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी केले.मंठा, येथील स्वामी विवेकानंद महाविदयालयात अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. अशोक खरात, पर्यवेक्षक डी.आर. जाधव, प्रा.डी.बी. मगर, प्रा.एस.आर. चव्हाण, प्रा.आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. खंदारे म्हणाले, आपल्या क्षमताच भान आल्यावर माणूस सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून किती उत्तुंग झेप घेऊ शकतो, याच अण्णा भाऊ एक अफलातून अदाहरण आहे. ज्याला इथल्या व्यवस्थेन भाषेच्या, साहित्याच्या विश्वात प्रवेशच नाकारला होता , त्यांच्या नावान आज अनेक साहित्य संमेलन होत आहेत हा विषमतावादी व्यवस्थेवर मिळवलेला क्रांतिकारक विजय म्हणावा लागेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विदयार्थीनी अंजली काकडे यांनी केले. आभार प्राध्यापिका सी.पी. पाटील यांनी मानले. प्रा. परमेश्वर शेळके, प्रा.पंढरीनाथ काकडे व त्यांच्या सहयोगी प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती.

No comments:
Post a Comment