200

Followers

Sunday, 4 August 2019

एआयएमआयएम तर्फे इच्छूक उमेदवारासाठी अर्जाचे वितरण

मोसीन कुरेशी
जालना (प्रतिनिधी)ः जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणूकीची एआयएमआयएमने जोरदार तयारी केली आहे. इच्छूक उमेदवारांसाठी अर्जाचे वितरण आणि मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 साठी ऑल इंडिया मजलिस -ए-इतेहादुल मुस्लिमिन तर्फे निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज वितरण करणे तसेच जमा करणे संबंधी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदरील अर्ज जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या टाऊनहॉल, जुना जालना येथील कार्यालयात  उपलब्ध करण्यात आले आहेत. अर्ज वितरण व दाखल करण्यासाठी दि. 4 ते 10 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असतील. अंतिम तारखे नंतर आलेल्या अर्जावर  प्रदेश कार्यालय तर्फे निर्णय घेण्यात येईल व त्यानंतर मुलाखतीसाठी कार्यक्रम व तारीख घोषित करण्यात येईल. असे एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

No comments:

Post a Comment