प्राप्त केली.नारायण दुभळकर सर यांनी मंठा तालुक्यातून आदिवासी समाजातून प्रथमच पी.एच.डी मिळवली आहे. आपार मेहनत व जिद्दीने त्यांनी ऊच्च शिक्षण घेवुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.त्यानिमित्य महाविद्यालयामध्ये प्रा.डॉ.नारायण दुभळकर सर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे,उप.प्राचार्य प्रा.अशोक खरात ,पर्यवेक्षक प्रा.डि.आर जाधव ,जेष्ट प्रा.सोन्याबापू चव्हाण व सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग हजर होते.व तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अशाताई आकात ,कपिल भैया आकात ,कुणाल दादा आकात प्रा.शेळके सर,प्रा.आघावसर,प्रां काकडे सर,प्रा.पाटील मॅडम,प्रा राऊत सर, प्रा. बांडगे सर,प्रा.कादे सर,प्रा.पंढरीनाथ काकडे प्रा. शिंदे सर,प्रा.मगर सर यांनीही प्रा.डॉ. दुभळकर सरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Tuesday, 31 December 2019
प्रा.नारायण दुभळकर यांना पीएचडी
प्राप्त केली.नारायण दुभळकर सर यांनी मंठा तालुक्यातून आदिवासी समाजातून प्रथमच पी.एच.डी मिळवली आहे. आपार मेहनत व जिद्दीने त्यांनी ऊच्च शिक्षण घेवुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.त्यानिमित्य महाविद्यालयामध्ये प्रा.डॉ.नारायण दुभळकर सर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे,उप.प्राचार्य प्रा.अशोक खरात ,पर्यवेक्षक प्रा.डि.आर जाधव ,जेष्ट प्रा.सोन्याबापू चव्हाण व सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग हजर होते.व तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अशाताई आकात ,कपिल भैया आकात ,कुणाल दादा आकात प्रा.शेळके सर,प्रा.आघावसर,प्रां काकडे सर,प्रा.पाटील मॅडम,प्रा राऊत सर, प्रा. बांडगे सर,प्रा.कादे सर,प्रा.पंढरीनाथ काकडे प्रा. शिंदे सर,प्रा.मगर सर यांनीही प्रा.डॉ. दुभळकर सरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Monday, 30 December 2019
बाबूजी तिवारींचा सपत्नीक सत्कार...
ग्रामीण भागातून प्रतिभावंत खेळाडू तयार होतात..... पो.नि.विलास निकम
मंठा पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा...
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष असून भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतो सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा प्राण आहे असल्याचे मत माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले यावेळी मंठा पंचायत समितीच्या सभापती पदी शिल्पा नरेंद्र पवार तर उपसभापतिपदी नागेश रामकिसन घारे यांची
Saturday, 21 December 2019
नागरिकत्व सुधारना कायद्याविरोधात मंठायात लोटला जनसमुदाय
मंठा प्रतिनिधी: इंकलाब जिंदाबाद,तानाशाही नही चलेंगी,मोदी सरकार हाय हाय,हिंदु-मुस्लिम भाई भाई,मोदी शाह मुर्दाबाद,सीएए बिल रद्द झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो हिन्दु-मुस्लिम बांधवांनी शनिवारी मंठा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत विराट मोर्चा द्वारे केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला.नागरिकत्व सुधारणा विधयेक केंद्र शासनाने पारित केला यावेळी अनेक ठिकाणी शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यास सुरवात झाली दरमियान
याचे पडसाद मंठा शहरात उमटले आहेत.हिंदु-मुस्लिम बांधणी हाताला काळ्या पट्ट्या बांधून व हातात मोदी शाह फेक है, हिंदु-मुस्लिम एक है,इंकलाब जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद,सीएए बिल वापस लो,असे लिहिलेले फलक घेऊन हिंदू मुस्लिम युवक मोर्चेत सहभागी झाले होते मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी नगरसेवक शेख साजिद,नितिन सावंत अड.मधुकर मोरे,शगिर पठान,रियाज मुफ़्ती यांनी मोर्चेला संबोधित करतांना भाषणे केले यावेळी शगिर खान पठान बोलतांना सांगितले की केंद्र शासनाने पारित केलेला हा कायदा संविधान विरोधी असून मुस्लिम समाज या कायद्याला कधीही मान्य करणार नाही जोपर्यंत हा काद्या रद्द होणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाज याला विरोध करणार आहे या सीएए विरोधात मुस्लिम समाज जागृत झाला असुन त्याला कडाडून विरोध करण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणार आहे त्यामुळे केंद्र शासनाने याच वेळीच दखल घेऊन हा कायदा रद्द करावा असे निवेदन तहसीलदार सुमन मोरे व पोलीस उपविभागीय अधिकारी बांगर साहेबसह पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांना देण्यात आले यावेळी हाजी कय्यूम कुरेशी,हाजी मुसा कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठौड़,अड़ अधुकर मोरे, नगरसेवक शेख साजिद,इल्यास कुरेशी,मोईन कुरेशी,शेख साजिद,शबाब कुरेशी,इसाम पटेल,शेख एजाज़,कबीर तांबोली,हाजी इरफ़ान अली,शकील अंसारी,खलील पाशा अंसारी,इब्राहिम तांबोली,शेख रईस,राजेश खंदारे,भीमराव वाघ, इम्रान मनियार,इनुस कुरेशी,शेख अनस,साजिद पिंजारी,ताहेर बागवान,उबेद बागवान,अब्दुल्ला बागवान,इमरान खान,जब्बार मौलाना,आदिसह हजारोच्या संख्येने हिंदू-मुस्लीम युवक उपस्थित होते.
Saturday, 14 December 2019
गुरु अबॅकस अकॅडमीच्या यशाची परंपरा कायम..!नंदन चव्हाण औरंगाबाद विभागातून प्रथम
मंठा प्रतिनिधी:दि.-08/12/2019(रविवार) रोजी औरंगाबाद येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित विभागीय खुली अबॅकस स्पर्धा संपन्न झाली.या अबॅकस स्पर्धेत औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.या विभागीय स्पर्धेत गुरू अबॅकस अकॅडमी,मंठा.(ता.मंठा.जि. जालना) मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.ही परीक्षा भानुदासराव चव्हाण मेमोरिअल हॉल,रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे दोन सत्रात पार
Friday, 13 December 2019
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बिल रद्द करण्याची जमियत उलेमा-ए-हिन्दची मागणी...
सीएबीविरुद्ध तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन..
मंठा प्रतिनिधी.देशातुन वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्धचे आंदोलन तीव्र झाले असून ठीक ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा उद्रेक पहावयास मिळत आहे.सीएबी नागरिकता संशोधन बिलाच्या विरोधात आज जमियते ऊलेमा हिंद शाखा मंठाच्या वतीने 13 डिसेंबर शुक्रवार रोजी शेकडो मुस्लीम बांधवांनी तहसीलदार सौ.सुमन मोरे मॅडम,व पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नागरिकता संशोधन बिल संविधानाच्या विरोधात आहे तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा.लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात नागरिक संशोधन बिल पारित करण्यात आले.
Saturday, 30 November 2019
हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी हत्याकांड प्रकरणात नराधमांना फाशी द्या।
मंठा प्रतिनिधी:हैदराबाद येथील शादनगर येथील राहणाऱ्या 27 वर्षीय पशुवैद्य डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर 27 नोहेंबर रात्री कही नराधमांने सामूहिक बलात्कार करुण त्यांचे अंगावर पेट्रोल टाकून नग्न करुण पीडिताला जीवित जळण्यात आले.सदरील घटनेच्या निषेध करुन टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने मंठा येथे पोलीस निरीक्षक विलास निकम साहेबांना निवेदन देवुन कलेक्टर मार्फ़त नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
Thursday, 28 November 2019
मंठा येथील माळकिनीत आजारांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष....
मंठा प्रतिनिधी:मंठा येथे माळकिनी गावत डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे मात्र कुठेच उपाय योजना नाहीत आरोग्य विभाग झोपा काढतो आहे धुर फवारणीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.करत आहे.
Saturday, 23 November 2019
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निवडीबद्दल मंठा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
मंठा प्रतिनिधी: अत्यंत नाट्यमय पद्धतीने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजितदादा पवार यांच्या झालेल्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून प्रचंड घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केलं
Thursday, 21 November 2019
मंठा येथे टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.....
Monday, 11 November 2019
पाणीपुरवठा यांत्रिकी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशी मागणी....
मंठा पंचायत समिती गैरकारभार करून कोट्यावधीचा घोळ...
Monday, 4 November 2019
संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका..... ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर
मंठा /प्रतिनिधी : आपले आयुष्य हे अनमोल आहे जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात काल काय झाले, आज काय होईल ,उद्या काय होणार याची चिंता करत बसू नका फक्त आज वाईट वागू नका चांगलंच होईल आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य ठेवा संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका असा उपदेश संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केला. शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार ता. चार रोजी मंठा येथील जिनिंग प्रेसिंगच्या भव्य मैदानावर ह भ प इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .सर्व श्रीमंत जीवनात सुखी नाहीत ज्याला जीवनामध्ये संतांची संगत लाभली त्याच्यासारखा भाग्यवान आणि सुखी कोणीच नाही असे सांगून ह भ प इंदूरीकर महाराज यांनी मोबाईल मुळे संवाद संपला माणसं एकलकोंडी झाली चिडचिडी झाली डोकेदुखी वाढली सांधेदुखी वाढली दृष्टी गेली झोप गेली असे दुष्परिणाम सांगितले. अंगातील ताकद जपून वापरा खिशातील पैसा जपून वापरा आणि आयुष्यातील वेळही जपून वापरा असा उपदेश त्यांनी शेवटी केला .शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी आपली ताकत गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरली. आज ते जिल्ह्यापर्यंत गेलेत भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील असा आशीर्वाद दिला. वाढदिवसानिमित्त शेतकरी सुखी होऊ दे गाईचे रक्षण होऊ दे हिंदू धर्माचे रक्षण होऊ दे असे साकडे त्यांनी भगवंताकडे घातले. वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश खवणे, प्रल्हादराव बोराडे ,सुरेशराव सरोदे, श्रीरंग अण्णा खरात, जि प सदस्य संजय राठोड, नगराध्यक्ष नितीन राठोड, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली सरकटे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, मधुकर काकडे, नगरसेवक बालासाहेब बोराडे, नीरज सोमानी, प्रदीप बोराडे, इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे ,संजय नागरे, विभागप्रमुख बबनराव शेळके, भगवान वरणकर, विष्णुपंत खराबे, पांडू वैद्य, दासुपंत खरात, बेबीताई पावशे, गयाताई पवार, यांची उपस्थिती होती
Saturday, 2 November 2019
परतीच्या पाऊसाने झालेल्या नुकसानीची तत्काड भरपाई देण्याची युवक कॉंग्रेसची मागणी...
मंठा प्रतिनिधी:मंठा तालुक्यात परतीच्या पाऊसामुळे कढणीच्या आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.ज्यामध्ये कापूस,तुर,सोयाबीन,मुंग,मक्का,बाजरी यासह बाहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे.
शासनाचे आदेशीत केल्याप्रमाणे पंचनामे सुरु झाले आहेत परंतु त्यामध्ये केवळ सोयाबीन व मका याच पिकाचा समावेश करण्यात येत असल्याचे समजले आहे. मंठा तालुक्यात कापुस,तुर या पिकाचा मोठ्या प्रमाणात लागवड आहे.आणि प्रामख्याने तिच पिके वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्यासारखा पंचनामा व सर्व्हे होत आहे. यामध्ये मका व सोयाबीन या पिकाचा पेरा कमी आहे वास्तविक पाहता शेतात जी पिके उभी आहेत त्या सर्व पिकांचा समावेश पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.असे निवेदन युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसील येथे पेशकार दवने सर यांना देण्यात आले तसेच याच मागणी करीता युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल देशमुख यांच्यावर दिनांक ३० ऑक्टोंबर 2019 रोजी भोकरदन येथे सादरील मागणी करीता करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे माघे घेण्यात यावे.अशी मागणी युवक कांग्रेसच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी बाळासाहेब वाजोळकर,सुरेश वाव्हळे,जफ़र पठान,रवि भांमळे,सतीष काळे,प्रदीप चोरमारे,जगन मोरे,बाळू गायकवाड़ आदि उपस्थित होते.
Thursday, 31 October 2019
मंठा तालुक्यात अवैध दारू विक्री जोमत...
मंठा प्रतिनिधी : शहरातील जालना- जिंतूर रोडवर असलेल्या ढाब्यावर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध विदेशी दारू विक्रीने अक्षरशः थैमान घातले आहे शहरातील ए
मंठा शहरत डासंचा उपद्रव वाढला... डेंगुचे रुग्ण सापडल्यानंतर ही आरोग्य विभागाचे झोपीचे सोग
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: सध्या मंठा शहरात डासांचा उपद्रव वाढल्यामुळे डसाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे थंडी-तापाच्या रुग्णांतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह
नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मंठा शहरात गेल्या आठवड्यात थंडी-तापाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत होती. पुन्हा गेल्या
Monday, 21 October 2019
मंठा शहरात सरासरी 51.47 टक्के मतदान..
मंठा प्रतिनिधी:परतुर-मंठा विधान सभा निवडणुकीत मंठा शहरात 51.47 टक्के एकूण मतदान झाले.
Saturday, 12 October 2019
सुरेश कुमार जेथलिया साहेबांच्या उपस्थिती मध्ये अनेक नागरिकांचा कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश....
मंठा प्रतिनिधी:माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया साहेबांवर विशवास टाक़त अनेक मुस्लिम बांधवांनी कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.या मध्ये बासखान पठान,हाजी सत्तार भाई,कदीरभाई कुरेशी,रहीम पठान,गनीभाई पटेल,अतीक खान,शेख अल्ताफ,राजा पठान,युसुफ बागवान,फारुख बागवान,शेख रियाज,अलीम कुरेशी,अब्दुल अजीज़,अज्जु शेख,शेख सादेक,इरफान शेख,कदिर शेख,अय्युब शेख,जाबेर शेख,असलम पठान,शेख पाशु,अतीक शेख,मुमताज अतार,शेख नसिर यांनी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला या प्रसंगी परतुर-मंठा मतदारसंघातील उमेदवार सुरेश कुमार जेथलिया साहेब,उपनगरध्यक्ष सिराजखान पठान,राजेश राठोड,कॉंग्रेश तालुकाध्यक्ष निळखंड वायाड,शहरध्यक्ष शबाबभाई कुरेशी,कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक हाजी मुसाभाई कुरेशी,मोईन कुरेशी,अचित नाना,कबीर भाई तांबोली,नासेर तांबोली,राजाभाऊ खंदारे,सुरेश वावडे,विष्णु कळने आदि उपस्थित होते.
Friday, 11 October 2019
मंठा येथे लोणीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आठवले गट शिवसंग्राम रयत क्रांती संघटनेचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मंठा येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आलेयावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर परभणीचे खासदार बंडु जाधव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एजे बोराडे,भुजंगराव गोरे, भाजप तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे, शिवसेना शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे, रासप तालुकाध्यक्ष भगवान कुर्धने, सभापती संदीप गोरे, उपसभापती राजेश मोरे, जि प सदस्य पंजाबराव बोराडे, किशोर हनवते, विष्णू पाटील, पंचायत समिती सदस्य बीड पवार, दत्तराव कांगणे, बाबाजी राठोड,कैलास बोराडे,अशोक नाना वायाड, मधुकर काकडे, नागेशराव घारे, माजी सभापती संतोष वरकड, सुरेश सरोदे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी संपूर्ण मराठवाड्यातून बबनराव लोणीकर सर्वाधिक मताधिक्याने विजय होणार असून पुढील काळात त्यांना याहीपेक्षा अधिक चांगले खाते मिळेल असा विश्वास व्यक्त केलापालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परतूर विधानसभा मतदार संघात विकासाचा अनुशेष भरून काढण्यात बऱ्याच अंशी यश आले असून उर्वरित विकास कामांना पुन्हा चालना देण्यासाठी व विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन देखील यावेळी उपस्थितांना खासदार बंडु जाधव यांनी केलेयावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आठवले गट शिवसंग्राम रयत क्रांती संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Thursday, 10 October 2019
प्रदेश युवक कॉंग्रेसचा युवकांसाठी काँग्रेसचा विशेष जाहीरनामा.
मंठा प्रतिनिधी:महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवकांसाठी विशेष जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे तीन कोटी युवकांनी सहभाग घेतलेल्या वेकअप महाराष्ट्र या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यातील युवकांनी ज्या बहुमूल्य सूचना दिल्या आहेत, त्या सूचनेनुसार आगामी विधानसभेच्या दृष्टीने युवक काँग्रेसचा विशेष जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धोंडीराम जी राठोड, परतूर विधानसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश भैया राठोड, काँग्रेसचे नेते अन्वर बापू देशमुख युवक काँग्रेसचे परतूर विधानसभा अध्यक्ष सुरेश वाव्हळे, मंठा तालुका अध्यक्ष नीळकंठ वायाळ, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब गोरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव गणगे, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, समाजकल्याण सभापती दत्ता बनसोडे,मधुकर मोरे,मूसा भाई कुरेशी,मोईन कुरेशी,प्रकाश अण्णा घुले, बाळासाहेब वांजोळकर, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या जाहीरनाम्यामध्ये युवकांच्या विविध प्रश्नाबाबत विचार करण्यात आलेला आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्ज माफ करण्यात येतील युवकांसाठी वस्तीग्रहांची संख्या वाढवण्यात येईल, दिव्यांगासाठी विनामूल्य प्रशिक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना5000 बेरोजगार भत्ता. सरकारी रिक्त नोकऱ्यांची तात्काळ भरती करणे, नोकरीमध्ये स्थानिक युवकांना(भूमिपुत्रांना) 80 टक्के आरक्षणाचा कायदा करणे, जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, महाराष्ट्रात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, यासारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे.खास युवकांसाठी बनवलेला देशातील हा पहिला जाहीरनामा असून परतुर विधानसभेतील प्रत्येक युवक मतदारांपर्यंत हा जाहीरनामा पोहोचवण्यात येईल असे प्रदेश सचिव राजेश भैया राठोड यांनी सांगितले
Tuesday, 8 October 2019
वांजोळा येथील युवा नेते कैलास पाटील चव्हाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश
मंठा प्रतिनिधी, वांजोळा पुनर्वसन येथील युवा नेते कैलास पाटील चव्हाळ यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला पाणीपुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर व युवा नेते राहुल भैया लोणीकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांनी व त्यांचे मित्र गजानन चव्हाळ पाटील यांनीही त्यांच्या विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला एक तळागळातील कार्यकर्ता असलेले तसेच सामाजिक जीवनामध्ये निस्वार्थपणे काम करणारे तसेच गोरगरिबांच्या हाकेला जाणारे अशी कैलास पाटलांची ओळख आहे माननीय नामदार यांनी व तसेच राहुल भैया यांनी पुनर्वसन झालेल्या गावांची अडचण तसेच असुविधा ह्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की साथ देऊ तसेच जे गावांचे पुनर्वसन झाले आहे तिथल्या अडीअडचणी दूर करू अशी ग्वाही दिली येणाऱ्या काळामध्ये एक नवीन नेतृत्व कैलास पाटील चव्हाळ यांच्याकडे पाहिले जाते
Thursday, 3 October 2019
मंठा येथे स्वीप समिती उपक्रमाअंतर्गत मतदार जागृती आभियानाचा प्रारंभ...
मंठा प्रतिनिधी:परतुर विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे मतदानात नागरिकाणी मोठया प्रमाणावर सहभाग घ्यावा यासाठी मंठा तालुका स्पीप समितीने सुरुवात केली आहे आज स्वामी विवेकानंद विद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, जि.प.शाळेत संकल्पपत्रक वाटप करण्यात आले त्यांच्याकडून ही संकल्पपत्रे भरूण घेतली जानार आहेत.आज स्वीप समीतीने शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ घेतली मंठा स्वीप समीतीकडून मतदार जागृतीसाठी निबंधस्पर्धा,रांगोळीस्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा,पालकसभा,वकृत्वस्पर्धा मतदार जनजागृती रँलीचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील कला पथके, भारूड पथके, यांचा वापर मतदान जागृतीसाठी केला जानार असल्याचे के.जी राठोड सर,यांणी मराठवाड़ा न्यूजशी'बोलतांना सांगीतले या स्वीप समितीमध्ये प्राचार्य डॉ.बी.डी खंदारे सर,प्रा.डॉ.एस.के.कमळकर सर,अंकुशराव मोरे (नाना)सौ. वदंना वरकड मॅडम,अशोक मुळे सर कार्यरत आहेत.
Wednesday, 2 October 2019
"स्वच्छता ही सेवा' अभियानाला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद...
मंठा प्रतिनिधी:महात्मा गांधी जयंती निमित्त मंठा शहरात आज 2 ऑक्टोंबर बुधवार रोजी "स्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी जिल्हापरिषद शाळा व नगरपंच्यातच्या वतीने शहरातील विविध भागातुन महाऱॅली काढ्ण्यात आली. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय येथून मुजम्मिल अन्सारी सर यांनी हिरवा झेंडा दाखवुन ऱॅलीस सुरवात करण्यात अली "स्वच्छता ही सेवा' अभियान मोहिमेत शहतील प्लास्टिक बैग,पानी बॉटल,कचरा गोंळा करण्यात अला सदरील महाऱॅलीस डॉ.चाटसे सर,रामेश्वर बोराडे, जावेद शेख, सुधाकर खैरे, प्रमोद पालवे, आसेफ़ तांबोळी, सदाशिव मोरे, रघुनाथ बोराडे, मोसीन बागवान, तसेच जि.प. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी व कर्मचारी शहतील नागरिकांची उपस्थित होते.
Tuesday, 1 October 2019
परतुर-मंठा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार कोण?
माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड यांच्या गांव गावत भेटी-गाठी सुरु...
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया व माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड दोन्ही इच्छुक असलेले उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला आहे. गावोगाव जावून लोकांच्या भेटी-गाठी घेत आहेत.२०१४ मध्ये विद्धमान पानी पुरवठा मंत्री बबनराव लोनिकर यांनी सुरेश कुमार जेथलिया यांना ४३६० मतानी पराभव केला होता.२०१४ मध्ये कोनी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याने सुरेश कुमार जेथलिया यांना कॉग्रेस पक्षाचे टिकट मिळले होते मात्र अता माजी आमदार धोडीराम राठोड यांचे चिरंजीव जिल्हापरिषद सदस्य राजेश राठोड हे पण मैदानात उतरले आहे मंठा-परतुर मतदार संघात उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहे मात्र कोणाला कॉंग्रेस पक्षाचे टिकट मिळेल याकड़े सर्वच मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतिचे खासदार बंडू जाधव यांना परतुर-मंठा मतदार संघातून १८७२३ मतांची लिड मिळाली होती सध्या परतुर-मंठा मतदारसंघातून विद्धमान आमदार पानी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोनिकर हे बीजेपीचे उमेदवार जवडपास निश्चित झाले आहे.लोकसभा निवडणुकीत युति धर्म पाडून लोनिकर साहेबांनी युतिला लीड मिडवून दिली होती पण आता शिवसेना युती धर्म पाडणार का?हा देखील महत्वाचा विषय आहे.
Friday, 27 September 2019
अफवावर विश्वास ठेवु नका.. नितिन कुमार जेथलिया
मंठा प्रतिनिधी:अलीकडे व्हाट्सअप फेसबुक सह सोशल मीडियावर कॉंग्रेस उमेदवारांची यादी जाहीर झाली अशी बनावटी अफवा सोशल मिडियावर पसरत आहे.मात्र,अशा प्रकारची कुठलीही अधिकृत काँग्रेस उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली नाही.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून कुठल्याही राष्ट्रीय पक्षाकडून पत्रकार परिषद न घेता अशी यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध करता येत नसते, हे सर्व नागरिकांना माहीत आहे.म्हणून अशी अनाधिकृत यादी तयार करत कुणी सोशल मीडियावर टाकू नये व कुणी यावर विश्वास ठेवू नये.हा जनतेत व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा पर्यत्न विरोधक करत असल्याचे नितिन कुमार जेथलिया यांनी मराठवाडा न्यूजशी' बोलतांना सांगितले.
पुणेकर यांना बेस्ट परफाॅर्मर आॅफ दी बॅच पुरस्काराने सन्मान....
मंठा प्रतिनिधी : शहरातील छायाचित्रकार बाळासाहेब पूणेकर यांना नुकताच नागपूर येथील बेस्ट परफाॅर्मर आॅफ दि बॅच पुरस्कार प्राप्त झाला.तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसागणीक प्रगती होत असून वेळोवेळी अपडेट राहणे निकडीचे झाले आहे. फोटोग्राफीचे क्षेत्र सुद्धा यापासून वेगळे राहीलेले नाही. याच कारणांमुळे अनेक फोटोग्राफर्स व फोटो एडीटर अॅडव्हांस फोटोशाॅपीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी तत्पर होत आहे. बाळासाहेब पुणेकर यांनी नुकतेच नागपूर येथे या क्षेत्रातील अॅडव्हांस फोटोशाॅपीचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल फोटोशाॅपीचे सुविख्यात प्रशिक्षक गणेश कटकोजवार यांच्या के.गणेश अल्बम अकॅडमीच्यावतीने प्रगतशिल व्यावसायिक फोटोग्राफर यांना नव्याने विकसित असलेले अद्ययावत फोटोशाॅपीचे प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षित विद्यार्थ्यातून अभ्यासक्रमातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण , जिज्ञासा , कठोर परिश्रम आणि जिद्द या कसोटीवर खरे उतरून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थीची "बेस्ट परफाॅर्मर आॅफ द बॅच" म्हणून मतदानाव्दारे निवड केली जाते. सप्टेंबर - २०१९ या वर्षीच्या वर्गातून बाळासाहेब पुणेकर यांची निवड झाली असून यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याप्रसंगी के.गणेश अल्बम अकॅडमीच्या संचालिका पूजा कटकोजवार व प्रशिक्षक गणेशसर यांच्या शूभहस्ते प्रोफेशनल डीझायनरचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून पुणेकर यांचा गौरव करण्यात आला.या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन केले जात आहे. आपल्या या यशाचे श्रेय पुणेकर यांनी आपले आई-वडील व प्रशिक्षकांना दिले आहे....
Thursday, 26 September 2019
व्यापारी महासंघ आयोजित बिझनेस सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मंठा ता.प्र:- व्यापारी महासंघ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक व व्यावसायिकांसाठी बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनार मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांचे व्याख्यान येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. ता.(26)गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भारतराव बोराडे, मंठा ता. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, राजेश जैन,हस्तीमलजी बब, अशोकजी संचेती,सतिशराव निर्वंळ,कैलाशराव बोराडे, संजय छल्लाणी, प्रा.भारत खंदारे,दत्तराव निर्वळ, संतोष शहाणे, मोहन अग्रवाल, राधाकिशन बोराडे, शिवाजीराव सुरवसे, राधेश्याम बिर्याणी, मनोज राठी, अमोल काला, शिवाजी आकमार, डॉ. सदाशिव कमळकर,विजय सराफ, दीपक बोराडे, विजय बोराडे, यांच्यासह शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या प्रसंगी मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांनी आपल्या व्याख्यानात आजच्या काळातील व्यापारातील आव्हाने त्यावर काढावयाचा मार्ग. तसेच आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा व्यापारामध्ये होत असलेला वापर या बाबत जनजागृती, व्यवसायात टिकायचे असेल तर येणाऱ्या काळानुसार बदलणे किती गरजेचे आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. आज स्मार्टफोनच्या युगामध्ये मोबाईल ॲप्स तयार करून अनेक कंपन्या लाखोंचा नफा कमी होत आहे. सोबतच ग्राहकांना आकर्षित करून सर्व सुख सुविधा देण्याचे काम करत आहेत. ऑनलाइनच्या या व्यवहारामुळे ट्रॅडिशनल (परंपरागत) मार्केटवर परिणाम होत असून मंदी आली आहे. वास्तविक व्यापारामध्ये आजही मंदी नसून ऑनलाइन मार्केट मुळे या समस्यांना व्यापाऱ्यांना समोर जावे लागत आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसाय बदल केले पाहिजेत. सेल वाढण्यापेक्षा आपली व्यवसायाची व्हॅल्यू कशी वाढेल हे पाहणे आजच्या दृष्टीने गरजेचे आहे. यासाठी नवयुवकविद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना टेक्निकल ज्ञान घेणे गरजेचे असल्याचे शेवटी नमूद केले.
ईडी'च्या करवाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मंठा बंद...
मंठा प्रतिनिधी:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार व 70 लोकांवर ईडीने केलेली कारवाहीच्या निषेधार्थ राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वर येवून निदर्शने करत आहेत आज मंठा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंठा बंद करण्यात अला यावेळी बंदला सर्व व्यापाऱ्यानी आपले दुकाने बंद ठेवून मोठा प्रतिसाद दिला शहरातील दुकाने,पान टपऱ्या ,कपडेचे स्टॉल सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 8 वाजता मंठा फाटा,मार्किट यार्ड,बस स्टैंड,टीपू सुल्तान चौक,आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रैली काडून जोरदार निदर्शने केली मोदी अमित शाह आणि बीजेपी सरकारवर जोरदार घोषणाबाजी केली.या प्रसंगी पंकजनाना बोराड़े,भाऊसाहेब गोरे,गोपाळराव बोराड़े,राजेश राठोड,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निळखंड वायाळ,शहरध्यक्ष शबाब भाई कुरेशी,कय्यूम भाई कुरेशी,नगरसेवक मोईन कुरेशी,मूसा भाई कुरेशी,अचित् नाना बोराड़े,प्रकाश घुले बाळासाहेब वाजोड़कर,सुरेश वावडे,आदिसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर पेवा ते पेवा तांडा रस्त्याच्या कामासाठी सुरू केलेले उपोषण अखेर मागे..........
मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : मौजे पेवा ते तांडा वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवार ता. 24 पासून तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तहसीलदार सुमन मोरे यांचे लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंठा तालुक्यातील मौजे पेवा ते तांडा रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अरुंद झाला होता तांड्यातील ग्रामस्थांनी हा रस्ता स्वखर्चाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला मात्र पांदण रस्त्याच्या लगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्ता करण्यास विरोध केला त्यामुळे तांड्यातील नागरिकांना महिला व विद्यार्थ्यांना रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली होती हा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेकडो महिला व ग्रामस्थांनी मंगळवार ता 24 पासून उपोषण सुरू केले होते. तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक विलास निकम ,वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय चव्हाण, मानव मुक्ती मिशनचे पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुमन मोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्त्यांना मध्ये दामोदर वाणी ,सुरेश गव्हाणे, ब्रह्मानंद पवार, रमेश राठोड ,मदन राठोड, पंडित चव्हाण, सखाराम मोरे,रफीक भाई, रामेश्वर पवार ,मांगीलाल राठोड ,भुजंग राठोड, रामेश्वर राठोड, साहेब राठोड, संतोष राठोड ,भाऊ चव्हाण, गजानन जाधव ,रामप्रसाद नरवाडे, दगडू नरवाडे ,अशोक चव्हाण, रावसाहेब नरवाडे, अंकुश राठोड ,सुभाष नरवाडे, विलास राठोड यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता
गावे आणि तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी संघर्ष करणार ......संजय चव्हाण परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे आणि तांड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्त्यांचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे गावे आणि तांड्यातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे .भविष्यामध्ये मंठा तालुका तसेच नेर शेवली भागातील गाव व तांडे आणि परतूर तालुक्यातील रस्त्यापासून काही वंचित राहिलेल्या गावातील रस्त्यासाठी संघर्ष करणार असे वंचित बहुजन आघाडीचे परतूर विधानसभा मतदार संघाचे नेते संजय चव्हाण यांनी सांगितले
Tuesday, 17 September 2019
तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो --न्या. शर्मा
मंठा /प्रतिनिधी : आनंदी जीवनासाठी तडजोड आवश्यक असून तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो आणि सुखासमाधानाने जीवन जगता येते असे प्रतिपादन न्या. शर्मा यांनी केले. मंठा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार ता. 14 रोजी कायदेविषयक लोक न्यायालयात न्या. शर्मा यांनी दोन अर्जदारांना गैरअर्जदार सोबत समेट घडवून आणला व अर्जदारांना त्यांच्या सासरी नोंदविण्यास पाठविले .यावेळी न्या. शर्मा बोलत होते. जीवनाला सुखी आणि समाधानी करण्याचा एकमेव मार्ग तडजोड हा असून संसारामध्ये सुद्धा तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी लोक न्यायालयात 28 प्रकरणे निकाली काढून 7 लाख 3 हजार 500 रुपये वसुली झाली. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून न्या. शर्मा तर सदस्य म्हणून ॲड डी एस निंबाळकर, ॲड आर बी गडदे उपस्थित होते .याप्रसंगी ॲड पी डी चव्हाण, अॅड ए आर देशपांडे, अॅड व्ही आर वायाळ ॲड ए व्ही वायाळ, ॲड एस आर झोल ,अॅड एम एस मोरे, अॅड मोगल, अॅड वेव्हल , अॅड राठोड, अॅड अवसरमोल,अॅड हेलसकर, ॲड लिंबुळकर,अॅड जाधव, ॲड कुलकर्णी,अॅड राठोड तसेच न्यायालयीन अधीक्षक श्री जोशी कर्मचारी वेळीकर ,पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टू वार ,पो हे कॉ डांगरे पो कॉ चव्हाण इतर न्यायालयीन कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते
Sunday, 15 September 2019
वंचित बहुजन आघाडीची मंठा शहरात महारॅली.....
मंठा /प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने शनिवार ता 14 रोजी मंठा शहरातून काढलेल्या भव्य रॅलीने विरोधकांना धडकी भरली. शहरात या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पार्लमेंटरी बोर्डचे अण्णाराव पाटील, प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, यशपाल भिंगे ,मोहन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मंठा फाटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली, बँड बाजा सहित फटाक्यांची आतषबाजी करत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत ही रॅली मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली .तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे परतुर तालुका अध्यक्ष रोहन वाघमारे ,मंठा तालुका अध्यक्ष डॉ. त्रिभुवन, दीपक मोरे ,भारत उघडे, गुलाबराव बचाटे, चोखाजी सौंदर्य ,जगदीश राठोड, अविनाश चव्हाण, सुनील इंगळे, सुरमासिंग जुनी ,पंकज राठोड, राहुल नाटकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Friday, 13 September 2019
बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.....कोल्हापूरच्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या थरारक प्रात्यक्षिकाने मंठेकरांची मने जिंकली........
मंठा प्रतिनिधी : मंठा शहरात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडले .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात श्रीचे विसर्जन करण्यात आले .शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे संस्थापक अध्यक्ष असलेल्या जयभवानी गणेश मंडळाने कोल्हापूर येथून आणलेल्या शंभूराजे मैदानी खेळ विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी विविध थरारक खेळ सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मैदानी खेळ यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, युवराज शंभूराजे, झाशीची राणी, तलवार लढत ,लाठीकाठी लढत ,लाठी काठी ,दांडपट्टा, पट्टा लिंबू, केळी, नारळ, काठी पट्ट्याने लिंबूचे दोन तुकडे करणे, एका वेळेस अनेक लिंबू कापणे आदि प्रात्यक्षिक सादर केली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुरज ढोली यांनी केली, शिवाजी नलावडे, ऋतुजा पाटील, युवराज पाटील, सरोजिनी लोहार, विक्रम पाटील, तुषार कांबळे, प्रथमेश पाटील, वैभव पाटील, संग्राम गणाचारी, सुरज पोळ, रणजीत मुरस्कर, नितीन मोरबळे, सर्वेश व वेदांत या बाल कलाकारांनी सोळा चमूने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला होता. श्री गणरायाची मिरवणूक मज्जित समोर आल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या वतीने श्री गणरायावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली .यावेळी कयूमभाई कुरेशी, शबाब भाई कुरेशी, हाजी जलील भाई, कबीर तांबोळी, मुसाभाई कुरेशी, इलियास कुरेशी, इसामोदीन पटेल,उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, बास खा पठाण, सगीर पठाण, शेख एजाजउद्दीन, पाशाभाई टेलर ,अली कुरेशी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .तसेच जयभवानी गणेश मंडळाने अहमदनगर येथून सात जणांच्या वाद्य पथकाला पाचारण केले होते त्यात तीन सनईवादन, एक सूर ,एक संबळ ,एक ताशा, एक हलगी याचा समावेश होता रावसाहेब हनुमंता फुलमाळी यांनी या सनई वाद्याचे प्रमुख नियोजन केले होते. वाजत गाजत श्री गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख ए जे बोराडे पाटील , प्रल्हादराव बोराडे ,श्रीरंग अण्णा खरात, नगराध्यक्ष नितीन राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे ,सुरेश सरोदे ,नगरसेवक बाळासाहेब बोराडे, प्रदीप बोराडे, इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे, नीरज सोमानी ,अचित नाना बोराडे, संजय गायकवाड ,गणेश बोराडे, संजय बोराडे ,बाजीराव आप्पा बोराडे, दिगंबर बोराडे, सौरभ झोल ,रवी भांबळे , गजानन बोराडे ,महादेव वाघमारे, तुळशीराम कोहिरे ,गजु भाऊ बोराडे, मधुकर काकडे ,भारतशेठ बोराडे, बालासाहेब बोराडे, प्रकाश घुले ,दीपक बोराडे, महादेव खरात ,विलास ठोकरे, कृष्णा हेलसकर ,संदीप बोराडे ,किरण सूर्यवंशी ,विकास ठोकरे ,नानासाहेब बोराडे ,विजय बोराडे ,नाथा बोराडे, भागवत बोराडे, आकाश कास्तोडे ,शुभम बोराडे, दळवे यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधीक्षक चैतन्य आणि उपअधीक्षक श्री बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
Tuesday, 10 September 2019
तळणी येथील चाळीस ते पन्नास तरूणांचा काॅग्रेस मध्ये प्रवेश....कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माजी आ.सुरेशकुमार जेथलिया...
मंठा प्रतिनिधी सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असुन जोरदार तयारी सर्वञच सुरू असल्याचे दिसुन येत आहे.म्हणुनच मंठा तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे माजी.आमदार सुरेशकुमार जेथलिया याच्या माध्यमातुन जन संपर्क चालु असुन याचे औचित्य साधुन तळणी कराच्या वतीने जेथलिया यांचा फटाक्याची अतीषबाजी करत गावातुन मिरवणुक काढत हजारो नागरीकांच्या साक्षिने व मंगलसींग ठाकुर,रीतेश चंदेल ,रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात राजपुत गल्लितील मारोती मंदीरावर जवळपास चाळीस ते पन्नास नव तरूणांनी सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वावर विस्वास टाकुन त्यांच्या ऊपस्थितीत नवतरूणाचे स्वागत करून हा प्रवेस सोहळा काल दि.08 सप्टेबर रविवारी रोजी संध्याकाळी सपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमात जि.प.समाज कल्याण सभापती बनसोडे,प.स.सदस्य किसनराव मोरे,काॅग्रेस कमीटी मंठा ता.अध्यक्ष निळकंठराव वायाळ,बोराडे,अण्णा खंदारे,विनोद डोईफोडे,रामेश्वर कांगणे,महादेव माने,गौतम सदावर्ते,शीवाजी गुजर,अमोल सरकटे,जनार्धन आडळकर यांची प्रमुख ऊपस्थिती होती.यावेळी ऊपस्थित जनसमुदायांना बोलत असतांना सांगीतले की समस्या मिटवण्याबाबत भाजपा सरकार अपयशी ठरले असुन पाच वर्षे नुसत्या कोटीची विकास कामे केल्याच्या गप्पा मारत भाजपा सरकारने नागरिकांची दिशाभूल केली असून प्रत्यक्ष जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेश जेथलिया यांनी केले.यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जेथलिया यांनी भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले की , खऱ्या समस्या ऐरणीवर ठेवत भाजपाने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे भटकवण्याचा डाव रचण्याचा कुटील डाव आखला , यात कधी जातीवाद धोरण, तर कधी दादागिरीचे राजकारण यामुळे येथील सर्वसाधारण जनता भयभीत झाली आहे. पाच वर्षे यांनी केवळ जनतेला वेठीस धरण्याचे काम केले असून, शेतकरी, मजूर ,व्यापारी व सामान्य नागरिकांच्या कुठल्याच हितकारी योजना यांनी प्रत्यक्ष राबवल्या नसल्याने आज सर्वच अडचणीत सापडले असल्याचे ते म्हणाले काँग्रेस यापूर्वी अनेक वर्षे सत्तेत राहिले मात्र काँग्रेसने कधीच भाजपा सारखे सुडाचे राजकारण केले नाही , काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मला साथ द्या नागरिकांच्या प्रत्येक समस्यांबाबत मी नेहमी तत्पर राहुण,तालुक्यात पंचसूत्री कार्यक्रम राबवणार असून सिंचनावर जास्तीत जास्त भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले .या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. व आज तरूणानी जो माझ्यावर विस्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला त्यांच्या विस्वासला तडा जाऊ देनार नसुन येनारा काळ आपलाच आहे व मतदार भरभक्कमपणे माझ्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी त्यांनी सांगीतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल सरकटे यांनी केले तर आभार रितेश चंदेल यांनी मानले
यावेळी गावातील नागरीक मोठ्यासंख्येने ऊपस्थित होते.
मार्केट यार्डातील अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांचे निवेदन .....
मंठा /प्रतिनिधी : मंठा येथील मार्केट कमिटी यार्डातील जुना स्टेट बँक रोड प्रभाग क्रमांक पंधरा मधील कृष्णा खरात घरापासून महादेव टाके यांच्या घरापर्यंत अतिरिक्त अतिक्रमण झाले असून अतिक्रमण हटवून रोडचे काम सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी नगरपंचायत मंठा यांना निवेदन देण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी रोडचे उद्घाटन केले असून सदरील रोडचे काम चालू आहे ना. लोणीकर यांनी मार्केट कमिटी यार्ड मध्ये रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे नागरिकांची सुविधा होणार आहे सदरील रोडवरील अतिक्रमणे हटवून कामाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या रस्त्याचे काम करताना अतिक्रमण असल्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाले आहे त्यामुळे काम करून देखील पाहिजे तेवढा फायदा होणार नाही या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मार्केट यार्ड शेतकरी नागरिक व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे अतिक्रमण काढणे अत्यंत गरजेचे आहे या रोडवरील अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करावे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे या निवेदनावर अविनाश खरात पवन राठोड अशोक शेरे गजानन टाके रुपेश लखोटिया पवन खरात भगवान खवणे शेखर शेटे महादेव टाके कृष्णा खरात रंगनाथ अवचार महादेव अवचार गजानन खरात शिवाजी खारवणे केशव खरात यांच्या सह्या आहेत
स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज.......दिपक बोराडे
मंठा प्रतिनिधी : मंठा नगरपंचायतच्या वतीने शहरात मेन रोड सह गावात दररोज साफसफाई केली जाते आणि ओला आणि सुका कचरा घंटागाडीद्वारे गावाबाहेर नेऊन टाकला जातो .परंतु मेन रोडवर असलेल्या डिव्हायडर मध्ये काही व्यापारी कचरा टाकतात त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी जागरूक राहून स्वच्छतेच्या कामात नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन जयभवानी गणेश मंडळाचे उपाध्यक्ष दीपक बोराडे यांनी केले आहे. डीवाईडरच्या मध्ये टाकलेला कचरा मेन रोडवर खाली पडतो दोन दिवसापूर्वी मेसखेडा येथील दुचाकीस्वार पती-पत्नी मेन रोडवरील कचऱ्यामुळे खाली पडले आणि त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यावेळी दीपक बोराडे, नाना बोराडे, संदीप बोराडे, पप्पू शेजुळ, सुनील बोराडे यांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले अशा प्रकारचे अनेक अपघात मेन रोडवर होतात मोटरसायकली स्लीप होण्याचे प्रकार मेन रोडवरील कचऱ्यामुळे वाढत आहेत यासाठी नागरिकांनी सजग राहून आपल्या दुकानातील घरातील केरकचरा डीवाईडर मध्ये न टाकता घंटागाडीत टाकून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे
Monday, 9 September 2019
गणपतीसमोर जुगार खेळाणारांची थेट कारवाही.....पो.नि.विलास निकम
मंठा प्रतिनिधी : गणेशोत्सव सुरु होऊन पाच दिवस झाले असुन येत्या पाच दिवसानंतर होणार्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर व जुगार गणपती समोर जुगार खेळणाऱ्यावर पोलिस थेट कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी आयोजित बैठकी सांगितले.श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात मंठा पोलीस ठाण्यात शनिवार [ता.७] रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विलास निकम , ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी , नगराध्यक्ष नितीन राठोड, उपनगराध्यक्ष सिराज पठाण , नगरसेवक बाळासाहेब बोराडे , सखाराम बोराडे , यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विलास निकम म्हणाले की , गणपतीचे पावित्र्य राखावे गणपतीसमोर जुगार खेळू नये. गणपतीसमोर धार्मिक तसेच समाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करावे तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करावा.डिजे वाजविण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.तसेच गणपती मंडळाच्या परिसरात जुगार खेळणाऱ्या वर अथवा दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.तसेच शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.अशी अपेक्षा शेवटी बोलतांना व्यक्त केली.यावेळी प्रसंगी नगराध्यक्ष नितीन राठोड , उपनगराध्यक्ष सिराज पठाण , ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या बैठकीस शहरातील मंडळाचे पदाधिकारी , पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...










































