Friday, 13 December 2019

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बिल रद्द करण्याची जमियत उलेमा-ए-हिन्दची मागणी...


सीएबीविरुद्ध तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी.देशातुन वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्धचे आंदोलन तीव्र झाले असून ठीक ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा उद्रेक पहावयास मिळत आहे.सीएबी नागरिकता संशोधन बिलाच्या विरोधात आज जमियते ऊलेमा हिंद शाखा मंठाच्या वतीने 13 डिसेंबर शुक्रवार रोजी शेकडो मुस्लीम बांधवांनी तहसीलदार सौ.सुमन मोरे मॅडम,व पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नागरिकता संशोधन बिल संविधानाच्या विरोधात आहे तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा.लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात नागरिक संशोधन बिल पारित करण्यात आले.
मात्र हे बिल भारतीय राज्य घटनेच्या धर्मनिरपेक्ष व्याख्याला मलिन करणारी आहे हे विधेयक अन्यायकारक असल्या कारणाने मुस्लिम समाजाच्या वतीने आज मंठा येथील मर्कज मस्जिद ते तहसील कार्यालय पर्यंत अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढुन तहसीलदार सौ.सुमन मोरे यांना निवेदन देण्यात आले नागरिकता संशोधन विधायक पारित झाल्याने हे विधायक संप्रदायीक असून असे कायदे संपूर्ण देशासाठी घातक आहे.या विधेयकाला जमियत  उलेमा-ए-हिंद द्वारा वेळोवेळी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने विरोध करण्यात येईल.हा विधेयक धर्माच्या नावाने भेदभाव करणारे आहे.याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवरून संघटने द्वारा येणाऱ्या निर्णयानुसार विरोध सुरूच राहील सीएबी संविधानाच्या मूळ भावनेला आणि संरचनेला पूर्णपणे बाधक आहे.असे प्रतिपादन यावेळी जमियते उलेमा-ए-हिंदच्या वतीने हाफेज शबाब बागवान यांनी केले.यावेळी मुफ्ती इरफान मिल्ली,मौलाना सलीम,हाफीज शबाब,हाफिज साकिब,हाफिज शाकेर, हाफिज युनुस, मौलाना अहमद,मौलाना रफिक,मौलाना हाजी बशीर मिल्ली , हाफिज वलीउल्लाह, हाफिज अब्बर, मौलाना साबीर, हाफिज सलीम, ईसामोद्दीन पटेल , प्रकाश अण्णा घुले,इलयास कुरेशी नगरसेवक, बाज खाँ साहब,सय्यद इरफान अली,शबाब कुरेशी,खालील पठाण,इब्राहिम तंबोली,सिद्दीक बागवान,रफिक शेख,भिमराव वाघ,शकील अन्सारी,रवी सदावर्ते, योगेश  सूर्यवंशी,राजेश खंदारे,रियाज बागवान, साजिद पिंजारी,इन्नु कुरेशी,शेख अनस,अलीम कुरेशी,अमजद कुरेशी,तोफिक अतार संदीप प्रधान,मोठिया संख्येने सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment