Saturday, 30 November 2019

हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी हत्याकांड प्रकरणात नराधमांना फाशी द्या।

टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने निषेध करुन पोलीसांना निवेदन....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:हैदराबाद येथील शादनगर येथील राहणाऱ्या 27 वर्षीय पशुवैद्य डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर 27 नोहेंबर रात्री कही नराधमांने सामूहिक बलात्कार करुण त्यांचे अंगावर पेट्रोल टाकून नग्न करुण पीडिताला जीवित जळण्यात आले.सदरील घटनेच्या निषेध करुन टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने मंठा येथे पोलीस निरीक्षक विलास निकम साहेबांना निवेदन देवुन कलेक्टर मार्फ़त नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
सदरील माहिती अशी की तेलंगणेच्या रंगा रेड्डी या जिल्यातील शादनगर येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी आपल्या कुटुंब सोबत राहत होत्या पीड़ित महिला हे कल्लुरु मधील पशुवैद्य होते.आपले काम आपटुन ते आपल्या घरी परत जात असताना त्यांची स्कूटी हे पंचर झाली.रात्री उशीर होत असल्याने पीड़ित महिला घाबरलेले होत्या त्यांनी 9:30 च्या सुमारास आपल्या बहिणीला फोन लावला.बहिणीने महिला डॉक्टरांना टोल प्लाझावर जाऊन कॅबने येण्याचा सल्ला दिला. या लेडी डॉक्टरने असेही म्हटले आहे की काही लोकांनी मदतीची अपेक्षा केली आहे आणि थोड्या वेळाने बहिणीने कॉल केला.यानंतर महिला डॉक्टरचा मोबाईल बंद होता. शादनगर टोल प्लाझाजवळ कुटुंबीयांनी महिला डॉक्टरांचा शोध घेतला पण ती सापडली नाही. सकाळी त्यांचा शादनगरच्या अंडरब्रिजखाली जळालेला मृतदेह आढळला.काही नाराधमांने पीड़ित सोबत सामूहिक बलात्कार करुण त्यांची हत्या केली माणुस किला काळीमा फसनारी घटना हैदराबाद येथे घडली या घटनेच्या जाहिर निषेध संपूर्ण भारत देशातून होत आहे.नराधमांना समाजात जगण्याचा अधिकारच नही हा सैतान नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी ही अशी मागणी टीपु सुल्तान युवा मंचच्या वतीने पोलिसांना निवेदन द्वारे करण्यात अली आहे तसेच पोलीस व टीपु सुल्तान संघटनेच्या वतीने पीडिताला दोन मिनिटे मौन बाळगुण श्रद्धांजली वाहण्यात आली.निवेदनावर टीपु सुल्तान युवा मंचचे तालुका अध्यक्ष मोसीन कुरेशी,उपध्यक्ष शेख मोसीन,माजी ग्राम पंचायत सदस्य एजास भाई,इम्रान मनियार, मुस्तकीम कुरेशी,इनुस कुरेशी,इम्रान तांबोळी,शेख अनस,शेख सलमान,शेख वसीम,जाविद कुरेशी डी.के,अलीम कुरेशी,शीनू कुरेशी,शारुख अतार,सोहेल कुरेशी,साजिद कुरेशी,इब्राहिम कुरेशी,शेख इल्लु,इस्माईल राज,इद्रीस कुरेशी,साजिद पिंजारी,जाविद पिंजारी,जाविद डैनी,रहीम तांबोली आदींचे स्वक्षऱ्या होते.
                             
                              
      

No comments:

Post a Comment