Monday, 4 November 2019

संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका..... ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : आपले आयुष्य हे अनमोल आहे जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच असतात काल काय झाले, आज काय होईल ,उद्या काय होणार याची चिंता करत बसू नका फक्त आज वाईट वागू नका चांगलंच होईल आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य ठेवा संकटे कितीही आली तरी जीवन संपविण्याचा विचार मनात आणू नका असा उपदेश संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केला. शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार ता. चार रोजी मंठा येथील जिनिंग प्रेसिंगच्या भव्य मैदानावर ह भ प इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .सर्व श्रीमंत जीवनात सुखी नाहीत ज्याला जीवनामध्ये संतांची संगत लाभली त्याच्यासारखा भाग्यवान आणि सुखी कोणीच नाही असे सांगून ह भ प इंदूरीकर महाराज यांनी मोबाईल मुळे संवाद संपला माणसं एकलकोंडी झाली चिडचिडी झाली डोकेदुखी वाढली सांधेदुखी वाढली दृष्टी गेली झोप गेली असे दुष्परिणाम सांगितले. अंगातील ताकद जपून वापरा खिशातील पैसा जपून वापरा आणि आयुष्यातील वेळही जपून वापरा असा उपदेश त्यांनी शेवटी केला .शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे  पाटील बोराडे यांच्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी आपली ताकत गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरली. आज ते जिल्ह्यापर्यंत गेलेत भविष्यात ते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील असा आशीर्वाद दिला. वाढदिवसानिमित्त शेतकरी सुखी होऊ दे गाईचे रक्षण होऊ दे हिंदू धर्माचे रक्षण होऊ दे असे साकडे त्यांनी भगवंताकडे घातले. वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख  ए जे बोराडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश खवणे, प्रल्हादराव बोराडे ,सुरेशराव सरोदे, श्रीरंग अण्णा खरात, जि प सदस्य संजय राठोड, नगराध्यक्ष नितीन राठोड, उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली सरकटे, पंचायत समिती सदस्य बाबा राठोड, मधुकर काकडे, नगरसेवक बालासाहेब बोराडे, नीरज सोमानी, प्रदीप बोराडे, इलियास कुरेशी, अरुण वाघमारे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे ,संजय नागरे, विभागप्रमुख बबनराव शेळके, भगवान वरणकर, विष्णुपंत खराबे, पांडू वैद्य, दासुपंत खरात, बेबीताई पावशे, गयाताई पवार, यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment