Monday, 11 November 2019

पाणीपुरवठा यांत्रिकी व कार्यालयीन अधीक्षक यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशी मागणी....

मंठा पंचायत समिती गैरकारभार करून कोट्यावधीचा घोळ...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : तालुक्यातील पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या आला गोंदी कारभार व भ्रष्ट काम चालू आहे.यात नुकतॆच लाचेच्या जाळ्यात सापडलेलॆ सुधिर पैठणकर हे व कार्यालय अधीक्षक राठोड या दोघांनी संगनमताने पंचायत समितीमध्ये केलेल्या भष्ट्राचाराची व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या म्हटले आहे की , पैठणकर व राठोड यांनी तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून पाणीपुरवठा व इतरही विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील योजना कागदोपत्री करून बळकावल्या आहेत. यात पाईपलाईन असतील विहीर दुरुस्ती , हातपंप दुरुस्ती , तसेच विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव कागदोपत्री दाखल करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यांनी विविध विभागांतर्गत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून नुकतेच काही दिवसांपूर्वी पैठणकर हे लाच लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक राठोड हेही त्यामध्ये तेवढेच सहभागी आहेत. यांचीही चौकशी वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. कार्यालयीन अधीक्षक राठोड हे नागरिकांना अरेरावीची भाषा  वापरतात तर माझे सत्ताधाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी सोबत चांगले संबंध आहेत. व मी आर्थिक हितसंबंध हे त्यांच्यासोबत जोपासत असल्याने मला तुमच्या तक्रारीची काही फरक पडत नाही.तर मी या तालुक्यातील आहे , त्यामुळे माझे कोणीही काहीही करू शकत नाही.जर कोणी काही विचारणा केल्यास त्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. कार्यालयीन अधिक्षक यांनी व कनिष्ठ यांत्रिक पैठणकर या दोघांनी पंचायत समितीतील शासकीय निवासस्थानी ही भाडेतत्वावर देऊन  महिन्याला पैसे गोळा करून हडप करत आहेत. याबाबत गटविकास अधिकारी यांना देखील काही माहिती नाही. त्यामुळे पाणीपुरवठा अभियंता व कार्यालयीन अधीक्षक राठोड यांच्या कामाची खाते निहाय व मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. नसता लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल असे नमूद केले आहे. यानिवेदनावर बाबासाहेब देशमुख , नागेश कुलकर्णी , अतुल खरात , शबाब बागवान यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्या आहेत...

No comments:

Post a Comment