Monday, 30 December 2019

ग्रामीण भागातून प्रतिभावंत खेळाडू तयार होतात..... पो.नि.विलास निकम

खेळाने सांघिक भावना निर्माण होऊन एकोपा वृध्दींगत होतो.... संचालक वैजनाथ बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतात , त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी उदघाटन समारंभा प्रसंगी मांडले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त [ता.२९] रविवार रोजी नगरसेवक सचिन बोराडे यांनी आयोजित केलेल्या मंठा प्रमियर लीगच्या किक्रेट सामान्यांच्या
उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे,अमोल मोरे,दिनेश बोराडे,दिपक बोराडे,सरपंच माऊली गोंडगे, विनायक चव्हाळ,सतिश बोराडे,रहीम पठाण, महादेव खरात,उबेद भाईजी,राजेश बोराडे , केशव बोराडे,इम्रान पठाण,कय्युम कुरेशी व शेख परवेज यांच्यासह आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस संचालक वैजनाथ बोराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक विलास निकम म्हणाले कि ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतात,ग्रामीण भागातून आत्तापर्यंत प्रतिभावंत खेळाडू तयार झाले असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले.तसेच वाढदिवसानिमित्ताने ठेवलेल्या या सामन्याला उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात संचालक वैजनाथ बोराडे म्हणाले की खेळाने सांघिक भावना निर्माण होऊन एकोपा वृध्दींगत होऊन इतर गुणांचाही विकास होत असतो. त्यामुळे आपले सुप्त गुणही विकसित होत असतात.खिलाडी वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास या गुणांचा नियमित खेळामुळे विकास होतो. त्याकरिता मानवाला व्यायाम हा खूप आवश्यक आहे. त्याक डे दुर्लक्ष केले तर विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते.त्याकरिता क्रिकेट बरोबर अन्य मैदानी खेळही खेळणे आवश्यक  असल्याचे यावेळी बोराडे यांनी सांगितले.याप्रसंगी सचिन चव्हाळ,मोहसीन मिस्बा,अंजर शेख,साजिद बागवान,शेख इम्रान,सय्यद तोफिक,मुक्तदिर बागवान, रवि काळे,तान्हाजी मोरे,अजिंक्य गोरे,शेख शमीम, शेख रयाज,जुनेद पठाण,राजु चव्हाण, तोफीक पठाण,शेख इल्लु,एहसान शेख,अमोल चव्हाळ , कृष्णा वाघ,यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू व किक्रेटप्रेमी उपस्थित होते.या किक्रेट सामान्यांसाठी स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन बोराडे यांनी प्रथम पारितोषिक २२ हजार २२२ , बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्याकडुन द्वितीय १७ हजार १११ , अमोल मोरे तृतिय पारितोषिक यांनी १२ हजार २२२ रूपयांचे,चतुर्थ बक्षीस ११ हजार १११ रूपयांचेे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्याकडुन तर उत्कृष्ठ संघ म्हणुन निलेश जोजारे यांच्याकडुन ५ हजार ५५५ रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे...

No comments:

Post a Comment