Monday, 30 December 2019

मंठा पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा...

सभापतीपदी शिल्पा पवार उपसभापदी पदी नागेश घारे यांची बिनविरोध निवड

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष असून भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतो सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा प्राण आहे असल्याचे मत माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले यावेळी मंठा पंचायत समितीच्या सभापती पदी शिल्पा नरेंद्र पवार तर उपसभापतिपदी नागेश रामकिसन घारे यांची
बिनविरोध निवड करण्यात आली मंठा पंचायत समिती च्या सभापती व उपसभापती निवडीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोणीकर बोलत होते यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भैया लोणीकर माजी तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  रामराव लावणीकर  माजी सभापती अंकुशराव बोराडे तालुका अध्यक्ष सतीश राव निर्वळ सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे बीडी पवार दत्तराव कांगणे राजेश मस्के माऊली वायाळ सोमय्या स्वामी माजी सभापती सौ स्मिता मस्के  सौ  यमुना कांगणे  श्रीमती लक्ष्मीबाई स्वामी गटविकास अधिकारी  संजय पाटील  सहाय्यक गटविकास अधिकारी मेथे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टी कोणत्याही एका व्यक्तीच्या मनावर चालत नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय पातळीवरच्या सर्वोच्च व्यक्तीपर्यंत पार्टी मध्ये केलेल्या कामानुसार सर्वांना स्थान दिले जाते सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा भारतीय जनता पार्टीचा नारा असून त्यानुसार निष्ठापूर्वक पक्षाचं काम करणाऱ्या सर्वसामान्य पक्षाचे काम करणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पदावर बसण्याचा मान दिला आहे.सभापती आणि उपसभापती पदावर विराजमान झालेल्या नवनिर्वाचित यांना उद्देशून सल्ला देताना लोणीकर म्हणाले की पंचायत समितीच्या सभापती आणि सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यथोचित मानसन्मान झाला पाहिजे असे लोणीकर यांनी यावेळी सभापती उपसभापती यांना सांगितले सर्वसामान्यांची सेवा करून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.मंठा पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकी दरम्यान सभापतीपदासाठी सौ शिल्पा नरेंद्र पवार व उपसभापती पदासाठी नागेश रामकिसन घारे यांचा एकच नामनिर्देशन पत्र आल्याने सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी शिवसेनेचे दोन काँग्रेसचे एक तर भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य गैरहजर होता जयपुर पंचायत समिती गणाच्या सदस्य  शालनताई नाथराव काकडे  यांच्या अकाली निधनामुळे  एक जागा रिक्त होती मंठा पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होतेयावेळी उद्धव गोडगे प्रसादराव गडदे विलास घोडके नरसिंग राठोड निवास देशमुख नवनाथ देशमुख नवनाथ खंदारे महादेव बाहेकर सुभाष राठोड जिजाभाऊ झोल अशोकराव सोनटक्के अनिल खंदारे बाबाजी जाधव सूर्यकांत जाधव तानाजी शेंडगे हरिभाऊ जाधव अमोल नरेंद्र ताठे भगवान लहाने शंतनू काकडे कैलास नेवरे रामप्रसाद चव्हाण बाळासाहेब इंगळे दत्ता खराबे रमेश वायाळ गजानन फुपाटे गजानन शिंदे जितेंद्र सरकटे प्रल्हादराव सरकटे एकनाथ जाधव श्रीराम राठोड दीपक दवणे बळीराम दवणे सुभाष चव्हाण रामेश्वर चव्हाण कल्याण चव्हाण दत्ता उबाळे शिवाजी जंजिरे लतिष शिंदे गणेश राव चव्हाण विठ्ठल राव कदम दिगंबर अवचार राजूभाऊ खराबे नारायणराव बागल अरुण खराबे रमेश बादल अरुण खराबे संतोष बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment