Monday, 30 December 2019

बाबूजी तिवारींचा सपत्नीक सत्कार...

नवयुवक नाट्य मंडळ औंढा नागनाथचा अविस्मरणीय उपक्रम

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:जेष्ठ पत्रकार बाबूजी तिवारी यांच्या उत्कृष्ठ नाट्य दिग्दर्शनाने घडलेल्या नाट्य कलावंतांनी दि 22 डिसें रविवार रोजी सर्व नाट्य कलावंत व नागरिकांच्या उपस्थितीत  तिवारी यांचा सपत्नीक  ह्रद्य सत्कार केला व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती तेजकुमारजी झांजरी प्रमुख अतिथी प्रसिद्ध नाटककार व लेखक विनोदजी डावरे औरंगाबादचे डॉ अग्रवालजी जेष्ठ भाजप नेते पांडुरंगजी पाटील आदि होते. सर्व प्रथम अभिनय सम्राट डॉ श्रीराम लागू यांना आदरांजली अर्पण करून दीप प्रज्वलन केले स्वागत गीत नंतर उपस्थितांचे हस्ते सत्कार मूर्ती बाबूजींना सपत्नीक
शाल श्रीफल सन्मान चिन्ह व सन्मान पत्र  देऊन गौरवांवित करण्यात आले तसेच  सुश्री ज्योती जोशी यांनी सन्मान पत्राचे वाचन करून बाबूजींना प्रदान करण्यात आले.प्रास्ताविकात गणपत सोनुने यांनीं नाट्य मंडळाची निर्मिती, यशस्वी नाटके, त्यातील विशिष्ट प्रसंग, आलेल्या अडचणी आणि सरांची दिग्दर्शन शैली आदींची विस्तृत माहिती दिली तर नाट्य कलावंतांनी नाटकातील संवाद व प्रसंग हुबेहूब प्रस्तुत करून जुन्या आठवणींना उजाळा दिला स्त्री भूमिका साकारणाऱ्या तान्हाजी मुंदळे पवन झांजरी, वजीरभाई आदिंनी सर्वात कठीण असलेली भूमिका ही स्त्री पात्राची असते आणि पुरुषाने स्त्री साकारणे, मुद्राभिनय हावभाव हे फारच अवघड होते पण तिवारी सरांनी आम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करून मनातील भीती दडपण नाहीसे केले म्हणूनच आमच्या भूमिका चिर स्मरणीय ठरल्या असे सांगितले  या प्रसंगी मनोहर पायघन यांनी १०१ नाटकाच्या शिर्षकांचा समन्वय साधून मनोगत व्यक्त केले तर चंद्रकांत  तम्मेवार यांनी लाडिक संवादाचे वेळी सरांनी श्रीमुखात कशी भडकावली हे सांगून श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या प्रमुख अतिथी नाटककार डावरे यांनी अभिनयाचे बारकावे उच्चार आणि हावभाव या बद्दल महत्वाची माहिती दिली तसेच उपस्थित कलावंतांचे भरभरून कौतुक केले पांडुरंग पाटील यांनी नवयुवक मंडळाने स्थापिलेल्या ज्ञानदीप वाचनालय व उत्तरोत्तर झालेली प्रगती सांगून यापुढेही सहकार्याचे वचन दिले याशिवाय  अनेकांनी सरांच्या वेगवेगळ्या कलागुणांचा अध्यापन पद्धतीचा आणि शिस्तीचा उल्लेख केला.सत्काराला उत्तर देत तिवारी यांनी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे ग्रामीण भागातील एकमेव माध्यम नाटक असल्याचे सांगितले  नाटकात संवाद  पाठांतर पूर्ण पक्के असेल तर अभिनय करणे सोपे होते आणि या कलावंतांनी यात १००% यश मिळविले असे सांगून १९७० च्या काळात नाटकासाठी शेंडी पासून तयारी करणे अवघड होते पण औंढावासीयांनी सर्वेपरी मदत केली कलावंतांनी अहं विसरून कामे केली मी दाखविलेल्या चुका दुरुस्त केल्या म्हणून या मंडळाची  नाटके यशस्वी झालीत असे सांगितले तत्कालीन सरपंच माणिकराव देशमुख ध्वनी क्षेपक विनामूल्य देणारे लिंबाजी वानखेडे ,सुरेश वैद्य ,राजाभाऊ देशपांडे, संगीत साथ देणारे माताडे ,खुळखुळे, कुलकर्णी, लांबडे दत्ता गुरू लक्ष्मणाप्पा डोंगरे बाबुराव जवादे आदिंचा आवर्जून उल्लेख केला.आपल्या अध्यक्षीय समारोपात झांजरी यांनी ,पूर्वी पासून अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वांच्या सहकार्यामुळेच सांभाळता आल्याचे सांगून कलोपासना वृत्ती, बालपणाचे हे चांगले मित्र आणि विधायक कामासाठी सर्वाचा आग्रह ,आवड जिद्द यामुळे चिमुकल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होत असल्याचे सांगितले तसेच या व अशा सर्व यशस्वी कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन अथ:पासून इति:ची एकमेव मेहनत गणपत सोनुने यांनी केल्याचा विशेष साभार उल्लेख अध्यक्षांनी केला.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन व आभार प्रदर्शन पांडित्य शिरोमणी,वाक् चतुर निळकंठ देव यांनी केले.कार्यक्रमास शहरातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment