Tuesday, 31 December 2019

प्रा.नारायण दुभळकर यांना पीएचडी

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.नारायण दुभळकर सर यांना डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठांनी पदवी प्रदान केली आहे. इंग्रजी विषयात (Resistance and Representation in Doris Lessing Fiction)हा विषय घेवून डॉ.व्ही.एम.रासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पुर्ण करूण पी.एच.डी
प्राप्त केली.नारायण दुभळकर सर यांनी मंठा तालुक्यातून आदिवासी समाजातून प्रथमच पी.एच.डी मिळवली आहे. आपार मेहनत व जिद्दीने त्यांनी ऊच्च शिक्षण घेवुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.त्यानिमित्य महाविद्यालयामध्ये प्रा.डॉ.नारायण दुभळकर सर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे,उप.प्राचार्य प्रा.अशोक खरात ,पर्यवेक्षक प्रा.डि.आर जाधव ,जेष्ट प्रा.सोन्याबापू चव्हाण व सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग हजर होते.व तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अशाताई आकात ,कपिल भैया आकात ,कुणाल दादा आकात प्रा.शेळके सर,प्रा.आघावसर,प्रां काकडे सर,प्रा.पाटील मॅडम,प्रा राऊत सर, प्रा. बांडगे सर,प्रा.कादे सर,प्रा.पंढरीनाथ काकडे प्रा. शिंदे सर,प्रा.मगर सर यांनीही प्रा.डॉ. दुभळकर सरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment