Thursday, 31 October 2019

मंठा शहरत डासंचा उपद्रव वाढला... डेंगुचे रुग्ण सापडल्यानंतर ही आरोग्य विभागाचे झोपीचे सोग

धुर फवारणीसह स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: सध्या मंठा शहरात डासांचा उपद्रव वाढल्यामुळे डसाचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे थंडी-तापाच्या रुग्णांतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह
नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मंठा शहरात गेल्या आठवड्यात थंडी-तापाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत होती. पुन्हा गेल्या
तीन-चार दिवसांपासून शहरात डासांची उत्पत्ती बाढली आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त आहेत.प्रभाग क्रमांक ७ मध्ये शेख साद जुबेर तांबोली या सहा वर्षीय बालकाला डेंगू झाला आहे व त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.त्याला जालना येथे ओम बाल रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.सध्या मंठा शहरात डेंगूची साथ सुरु असून मच्छर चावल्यामुळे रक्तातील लाल व पांढऱ्या पेशी कमी होत आहे.व तापीचे प्रमाण वाढत आहेत.सध्या मंठा शहरात अशी परिस्थिती असून आरोग्य विभाग व नगरपंच्यात कडून कुठल्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही परिणामी लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.लवकरात लवकर मंठा शहरात धुर फवारणी करण्यात यावी व डेंगूचा बंदोबस्त करण्यासाठी कही उपाय योजना सुरु करावे नस्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय समोर जन आंदोलन करण्याचा इशारा शहरातील नागरिकांनी मंठा नगरपंचायत मुख्याधिकारी ला निवेदन दिला निवेदनात खाटीक लायक शरीफ,कुरेशी मुस्ताक अ.रहीम,शेख जुबरे खालेक,पठान इम्रान कलंदर खान,शेख आसेफ़ असद,शेख अजीज़ सयद लाल,आदिचे स्वाक्षऱ्या होते.

No comments:

Post a Comment