200

Followers

Tuesday, 3 September 2019

मंठा ग्रामीण रुग्णालयाच्या गैर कारभाराची चौकशी करावी ...... प्रल्हादराव बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा/प्रतिनिधी : मंठा ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालत असून रोजंदारी वरील कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरत असल्याचा प्रकार शिवसेना शहरप्रमुख बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे यांच्या निदर्शनास आला .मंठा ग्रामीण रुग्णालय संदर्भात अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी श्री प्रल्हादराव बोराडे यांनी शुक्रवार 30 रोजी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांना रुग्णालयात कार्यरत दोन एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएएमएस डॉक्टर अधिकार नसताना बाह्यरुग्ण विभाग चालवीत असल्याचे निदर्शनास आले. मंजूर आठ वैद्यकीय अधिकारी पदांपैकी दोन  वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक एम के राठोड यांनी आर्थिक तडजोड करून त्यांच्या सोयीनुसार प्रतिनियुक्तीवर पाठविल्याचे सांगण्यात आले. नियमित सहा शिपाई कार्यरत असतांना स्वतः स्वच्छतेची कामे न करता रोजंदारीवर मजूर लावून स्वच्छता करीत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे स्टॉप नर्स, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक ही पदे असतानासुद्धा  रोजंदारी कर्मचाऱ्याकडून कामे करून घेतल्या जातात चार औषधी निर्माण कर्मचारी हे खाजगी व्यक्ती द्वारे औषध विभाग चालवितात, एनसीसी व आयसीटीसी चे कर्मचारी आपल्या सोयीनुसार पंधरा-पंधरा दिवस गैरहजर राहून रोजंदारी च्या मजुरांकडून कामे करून घेतात बाह्यरुग्ण विभागाची वेळी सकाळी 8:45 ते 12:45 व दुपारी 03:45 ते 05:45 असताना ओपीडी दररोज सकाळी दहा ते बारा व सायंकाळी चार ते पाच या मनमानी वेळेत काढली जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांकडून रात्रीच्यावेळी कंत्राटी परिचारिका एक हजार ते तीन हजार रुपये पर्यंत पेशंट कडून डिलीवरीची वसूल केले जातात पैसे दिले नाही तर त्यांना जालना येथे रेफर केले जाते .1 एप्रिल ते 31 जुलैअखेर जालना येथे पाठविण्यात आलेल्या 18 पैकी 12 महिलांना रस्त्यातच प्रसूती झाली त्यापैकी दोन माता व त्यांची बालके दगावली अशा गंभीर परिस्थितीने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेचे वयाच्या प्रमाणपत्र करता कुठली नोंद वा पावती न देता शंभर रुपये प्रति प्रमाणपत्र घेऊन प्रमाणपत्र दिले जाते जन्म प्रमाणपत्र साठी सुद्धा गोरगरीब जनतेकडून शंभर ते दीडशे रुपयांची लूट ग्रामीण रुग्णालय कडून केली जाते. आरबीएसके चे डॉक्टर व पथक वरचेवर दौरे करून त्यांच्या लावलेले गाड्यांचे किलोमीटरच्या खोट्या नोंदी घेऊन परस्पर दिले उचलली जातात हा प्रकार जिल्हाभर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. माजी वैद्यकीय अधीक्षकांनी तयार केलेल्या गार्डन दुरुस्तीची अंदाज एक लक्ष रुपये खर्चून गार्डनला बसविण्यात आलेल्या जाळ्या  वापरून बोगस बिले उचलली आणि मोठ्या रकमेचा अपहार करण्यात आला ट्रामा केअर युनिट मध्ये कोणाची परवानगी न घेता वैद्यकीय अधीक्षक यांनी स्वतःची केबिन तयार केली बोगस बिल सुद्धा उचलले आहे नियमित चे एकोणवीस कर्मचारी व कंत्राटी 25 कर्मचाऱ्यांपैकी  ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता फक्त पाच ते आठ कर्मचारी ड्युटीवर हजर असल्याचे आढळून आले ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेला हा सर्व गैरप्रकार जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक जालना यांच्यासोबत आर्थिक संगनमताने सुरू आहे या सर्व गैर कारभाराची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment