200

Followers

Friday, 7 June 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार ....... मंठा-परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-------- जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रविवार 9 जून रोजी साळेगाव( घारे) ता. जि. जालना येथे येणार असून मंठा- परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे  यांनी केले आहे. मा उद्धव ठाकरे हे आपल्या दौऱ्यात जिल्ह्यातील चारा छावण्यांना भेटी देऊन चारा वाटपाचे सोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून दुष्काळावर काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा करणार आहेत. संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे संवाद साधून त्यांना दिलासा देणार आहेत. यावेळी मंठा परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री बोराडे प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे

No comments:

Post a Comment