200

Followers

Thursday, 6 June 2019

मंठा शहराला डिजिटल बॅनरचा विळखा....दुभाजांकामध्ये डिजिटल बॅनरमुळे वाहन धारकांना अपघात होण्याची शक्यता वाढली

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:मंठा शहराला डिजिटल बॅनरचा विळखा लागला असुन दुभाजांकामध्ये डिजिटल बॅनर लावले जात असल्याने वाहन धारकांना अपघातला समोर जावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून वादळी वारे वाहू लागले़ यामुळे दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर वाहन धारकांच्या गाड़ी समोर तर  रास्त्यातून पायी चालणाऱ्याच्या डोक्यावर पडतात यामुळे शहरतील वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या डिजिटल बॅनरला शहरात मुख्य रास्ते पहिल्यास सर्वत्र डिजिटल बॅनर दिसून येतात डिजिटल बॅनर प्रतिसाद मिडत असल्याने दोन ते तिन व्यापाऱ्यांनी 19 लाख किमतीचे डिजिटल बॅनर छपाई यंत्र आणले आहे.कुणाचा वाढदिवस असो या कोणाचे खासगी कार्यक्रम दुभाजांकावरचे डिजिटल बॅनर बनविण्यासाठी ग्राहक छपाई करणाऱ्या व्यापारिला 2×8 चे 20 बॅनर बनविन्यासाठी नऊ ते दहा हजारात गुत्ता देतात आणि बॅनर छापणारे व्यापारीहे खेडेगावातून रोजदारने मजूर अंतात आणि हे मंजूर
नियमाचे पालन करत नही कुठे पण वाकडे तिकडे बॅनर लावून निघुन जातात यामुळे वाहन धारकांना व रास्त्यातून पायी चालणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.मात्र याकडे नगरपंच्यातीचे दुर्लक्ष पहिला होतांना दिसत आहे.

No comments:

Post a Comment