हजरत टिपू सुलतान युवा मंचतर्फे महावितरण कार्यालय येथे निवेदन देण्यात आले...
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना 3 एप्रिल रविवार पासून सुरू झाला असून सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे घराच्या बाहेर पळणे म्हणजे जीवाला धोका करून घेणे आहे.उन्हाळा असल्यामुळे देखील सतत उकाडा होत आहे. आणि अशा परिस्थितीत महावितरण कार्यालय मार्फत नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा एवजी रमजान महिना लागल्यापासून मागील चार ते पाच दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा तासनतास खंडित होत. असल्यामुळे
हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने महावितरण कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता अनिल जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवून घरीच विश्रांति करतात परंतु सतत विजेचा लपंडाव होत असल्याने उपवास रोजा करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या बंधू-भगिनींना अनेक अडचणींस समोरे जावे लागत आहे जे नागरिक वयोवृद्ध आहे. त्यांना सतत पंखा किंवा कुलर चालू केल्या शिवाय जमत नाही परंतु सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ते शक्य होत नाही. तरी रमजान महिना व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. नसता टिपू सुलतान युवा मंच तर्फे महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोसीन कुरेशी यांनी दिला आहे. याप्रसंगी निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,नगरसेवक उबेद बागवान,इस्माईल राज,इम्रान मनियार,अब्दुल्ला बागवान,इद्रीस कुरेशी,इम्रान तांबोली,सिराज कुरेशी,जाविद पिंजरी,साजिद पिंजरी,जाविद डी.के शारुख अतार,वसीम शेख,मोइस तांबोली,जाकेर कुरेशी,इनुस कुरेशी यांचे स्वाक्षऱ्या होते.
No comments:
Post a Comment