मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठेत गर्दी होऊ शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना आमदार राजेश राठोड यांनी आढावा बैठकीत बोलताना
केली.येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी आ.राजेश राठोड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार सुमन मोरे, गटविकास अधिकारी सुरडकर, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी, बांधकाम विभागाचे उपअभियंता कोल्हे, पोलीस निरीक्षक विलास निकम, कृषी अधिकारी विष्णू राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला आ. राठोड यांनी कोरोनाबाबत तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांबाबत माहिती घेतली. लॉकडाउन उठवल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे आणि खते बांधावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सम-विषम दिनाप्रमाणे बाजारपेठेतील दुकाने सुरू ठेवता येतील का याबाबत विचार व्हावा. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावीत यासारख्या बाबी नमूद करण्यात आल्या.मंठा प्रतिनिधी :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठेत गर्दी होऊ शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना आमदार राजेश राठोड यांनी आढावा बैठकीत बोलताना

No comments:
Post a Comment