200

Followers

Saturday, 14 December 2019

गुरु अबॅकस अकॅडमीच्या यशाची परंपरा कायम..!नंदन चव्हाण औरंगाबाद विभागातून प्रथम

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:दि.-08/12/2019(रविवार) रोजी औरंगाबाद येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित विभागीय खुली अबॅकस स्पर्धा संपन्न झाली.या अबॅकस स्पर्धेत औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.या विभागीय स्पर्धेत गुरू अबॅकस अकॅडमी,मंठा.(ता.मंठा.जि. जालना) मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.ही परीक्षा भानुदासराव चव्हाण मेमोरिअल हॉल,रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे दोन सत्रात पार
पडली.पहिल्या सत्रात परीक्षा घेण्यात आली तर दुसऱ्या सत्रात बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास सन्माननीय श्री.गिरीश करडे,श्री.अजय मणियार,श्री.राज लोचनी तसेच मराठवाडा समन्वयक श्री.जनार्धनजी पवार सर उपस्थित होते. या स्पर्धेत गुरु अबॅकस अकॅडमीतील नंदन आसाराम चव्हाण हा थर्ड लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून प्रथम आला तर शामल भरतराव बागल ही सेकंड लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून प्रथम आली.तसेच रेणुका दत्तराव बोराडे ही फोर्थ लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून द्वितीय तर आकांक्षा बालासाहेब बोराडे ही फर्स्ट लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून द्वितीय आली.तसेच वैष्णवी सुधाकरराव टकले ही फर्स्ट लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून बेस्ट-5 मध्ये आली आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं सर्वच स्तरातुन गोड कौतुक होत आहे.या गुरु अबॅकस अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुरू अबॅकस अकॅडमी परिवाराचे श्री.गणेश गुंड सर,श्री.संतोष खुळे सर,श्री.दत्ता सहाणे सर,श्री.राहुल सरवदे सर तसेच प्रा.हेमंतराव निर्वळ सर,श्रीनिवास मोरे यांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!

No comments:

Post a Comment