200

Followers

Tuesday, 3 April 2018

मनरेगाची कामे सुरु करण्यासाठी मंठा पंचायत समिती व तहसिल कार्यालयला मजुरांचा घेराव...

मोसीन कुरेशी

मंठा प्रतिनिधी:तालुक्यातील 28 गावच्या मजुरांनी कामाची मागणी केली.. ६ गावात कामे सुरु होऊन पुन्हा बंद पडली. आज दिनांक ३/४/२०१८ रोजी मनरेगाच्या कामासाठी मंठा तालुक्यातील विविध गावच्या मजुरांनी मंठा पंचायत समिती व तहसिल कार्यालयला मजुरांनी घेराव घातला. कामाची मागणी केलेल्या गावात मनरेगाची कामे सुरु करा, रोजगार हमी आमच्या हक्काची, मजुर एकजुटीचा विजय असो अश्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी हजर नसल्याने मजुरांनी निषेध व्यक्त केला. व तहसिल कडे मजुरांचा मोर्चा वळला तहसिलदार गायकवाड यांनी मजुरांशी गाव निहाय सविस्तर चर्चा करुन मनरेगाची कामे सर्व गावात दोन दिवसात सुरु करण्याचे सांगीतले जिथे कामे देण्यास विलंब झालेला आहे तिथे कायद्यानुसार बेरोजगार भत्ता वाटप करण्याचे पत्र काढुन मजुरांना न्याय देऊ असे तहसिलदार यांनी सांगितले. मागण्या मनरेगाची कामे त्वरित सुरु करा. प्रत्येक गावात मजुरांना पुरेल असा सेल्फ तयार करा मंठा तालुका जेसीबी मुक्त करा, मजुरांसाठी काम राखीव करा. गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी मंठा यांना मनरेगाच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश द्या. याव इतर मागण्या साठी घेराव घालण्यात आला. या आंदोलनात मारोती खंदारे सचिन थोरात कालिदा प्रधान श्रावण शिंदे कलावती भोंगाळ सखुबाई लाखुळे विक्रम जाधव कैलास भोरसड विष्णू वोटकर गजानन वायसे, गुफाताई पडुळ मंडाबाई घुगे गजानन नागरे मैनाजी पितळे सिध्दार्थ देशमाने, इत्यादी मजुर हाजर होते.

No comments:

Post a Comment