200

Followers

Tuesday, 20 March 2018

अजमेर उरुसासाठी विशेष रेल्वे गाडया

(मराठवाडा न्यूज़ ब्युरो) : अजमेर येथील ८०६ व्या उरुसासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे २१ मार्च रोजी नांदेड ते अजमेर नांदेड येथून सायंकाळी १६.५० वाजता सुटणार आहेती रेल्वे पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोलामार्गे अजमेर येथे दुसया दिवशी रात्री २१.२५ वाजता पोहोचले. तसेच काचीगुडा ते अजमेर-मदार, काचीगुडा ही रेल्वे २० मार्च रोजी ११.३० वाजता निघणार आहे.नांदेडला ही रेल्वे २१ मार्चला ५.२० वाजता सुटेल. अकोला मार्गे अजमेर येथे २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता अजमेरला तर ११ वाजता मदारला पोहोचेल. हैदराबाद ते अजमेर ही रेल्वे २१ मार्च रोजी दुपारी ४.१५ वाजता निघेल आणि नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाडमार्गे अजमेर येथे २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी अजमेर ते हैदराबाद ही रेल्वे अजमेर येथून २६ मार्च रोजी सकाळी १०.५५ वाजता निघणार असून मनमाड-औरंगाबादपरभणी, नांदेड मार्गे हैदराबाद येथे २८ मार्चला १.४० वाजता पोहोचणार आहे.

No comments:

Post a Comment