हुकुमत अपना काम करे, इस्लाम को ना बदनाम करे!
उस्मानाबाद प्रतिनिधी;(मराठवाडा न्यूज ब्योरो)तिन तलाख विधेयकाचा निषेधार्थ देशभरतील मुस्लिम महिलाकडून इतिहासिक मुक मोर्चा काढण्यात येत आहे.
केंद्र शासनाने आणलेल्या तीन तलाक विधेयकाच्या निषेधार्थ राज्यात नव्हे तर देशभरातील मुस्लिम महिलांकडून मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोडच्या आवाहनानुसार या तीन तलाक विधेयकाच्या विरोधात १७ मार्च रोजी उस्मानाबादेत महिलांचा मूक मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मागील आठ ते दहा दिवसांपासून मुस्लिम समाजबांधव, महिला पदाधिकान्यांकडून नियोजन करण्यात येत होते. नियोजनानुसार शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शहरातील गाझी मैदानावर मुस्लिम समाजातील महिला, मुलींच्या आगमनास सुरुवात झाली. गाझी मैदानावर येणान्या महिलांसाठी तेथे मंडप मारण्यात आला होता. मंडपात येणार्या महिलांपैकी उपस्थित काही महिलांनी शरियतबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासन निर्णयाचा विरोध दर्शविला. गाझी मैदानाकडे येणार्या विविध मार्गावर दहा ते वीस फुटावर उभारलेले स्वयंसेवक महिलांना गाझी मैदानाकडे जाण्याचा मार्ग दर्शवित होते. तसेच वाहतूक वळविण्यासाठी मदत करीत होते. सकाळी साधारणत११.३० वाजण्याच्या सुमारास हा मूक मोर्चा गाझी मैदान येथून निघाला. मूक मोर्चात सहभागी स्वयंसेवक मुली, महिलांनी तिन तलाक बिल वापस लो- वापस लो, ‘शरियत में मुदाखिलत नही चलेगी, ‘शरियत हमारी पहचान है, ‘इस्लामी शरिअत हमारा गर्व है’ असे विविध घोषवाक्य असलेले फलक हाती घेऊन मोर्चात सहभाग नोंदविला.
सुपर
ReplyDelete