200

Followers

Friday, 30 March 2018

मंठा येथे दोन जुगारी अटकेत 1 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त.

(मराठवाडा न्यूज़)
मंठा प्रतिनिधी;मोसीन कुरेशी,मंठा शिवारातील बाबासाहेब गणपतराव बोराडे यांचे शेतात सापळा रचुन झन्ना-मन्ना जुगार खेलतांना दोन जणांना रंगेहत पकडन्यात आला व बाकी जुगारी यांनी पोलिसांना बघुन पसार झाले. ही करवाई गरुवार 29 मार्च रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास केली. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला.आरोपी यांना अटक करण्यात आली.बाबासाहेब गणपतराव बोराडे यांच्या शेतात झन्ना-मन्ना नावाचा जुगार पैसे लाउन खेडत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी सायंकाळी सापळा रचुन जुगार खेडणाऱ्या दोन जणांना मुद्देमालसह रंगेहात पकडले. मुकेश राजेभाऊ गायकवाड वय 20 वर्ष (रा.इंदिरा नगर परिसर,मंठा) प्रकाश आसाराम बोराडे वय 28 वर्ष (रा.बोराडे गल्ली, मंठा)अशी जुगार खेड़तांना पकडलेल्या आरोपीचे नाव आहेत.त्यांच्या ताबेतुन 1 लाख 77 हजार 220 रुपये किमतीचे मोबाईल,मोटरसायकल मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पोलिस कॉ.मंठा.प्रकाश गौतम काळे यांच्या फिर्यादिवरुन कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने नापोकॉ/922 बिरकायलु साहेब यांच्याकडे तपास कामी दिला आहे.

No comments:

Post a Comment