Saturday, 20 June 2020

हजरत टिपू सुलतान युवा मंच मंठा तर्फे अमिष देवगण यांचा जाहिर निषेध;कारवाही करण्याची मागणी..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मुस्लिम धर्माचे व भारत वासियांचे श्रद्धास्थान असलेले सूफी संत हजरत खाजा मोहिनुद्दीन चिशती रहे. यांच्याबद्दल 15 जुन संध्याकाळी 7:30 न्यूज 18 वृत्तवाहिनीवर अमिष देवगण यांनी अप शब्द वापरल्याबद्दल मंठा येथील हजरत टिपू सुलतान युवा मंच या संघटनेच्या वतीने मंठा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की हजरत खाजा मोहिनुद्दीन चिशती रहे.हे एक मोठे सोफी संत असून फक्त मुस्लिमच नव्हेतर सर्व जाती धर्मातील लोकांचे श्रद्धस्थान असून त्यांचा प्रत्येक धर्मातील व्यक्ती आदर करतो व त्यांची प्रेरणा घेतो तसेच त्यांना आपला धर्म गुरु मानतो आणि सबंध भारत व जगात त्यांचे अनुयायी आहे.अशा थोर सोफि संताबद्दल 15 जुन संध्याकाळी 7:30 न्यूज 18 वृत्तवाहिनीवर अमिष देवगण यांनी "आर पार" या नावाने त्यांचे वर्त वाहिनीवर युक्तिवाद घेत होते त्यावेळी बोलता बोलता जाणून-बुजून पत्रकारिताचे ज्ञान असतांना सुद्धा त्यांनी अजमेर दर्गा चे थोर सूफी संत हजरत खाजा मोहिनुद्दीन चिशती रहे. यांच्याबद्दल "अकांत चिश्ती आया, लुटेरा चिश्ती आया,उसके बाद उसने धर्म बदले" अशा प्रकारचे अपशब्द वापरून मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखवून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केला असल्याने तालुक्यातील हजरत टिपू सुलतान युवा मंच व मानव मुक्ती मिशन या संघटनेच्या वतीने मंठा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांना निवेदन देऊन अशा
समाज विघातक निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर त्वरित दखल घेऊन संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी, शेख मोहसीन, मुस्‍तकीम कुरेशी,इस्माईल राज, इमरान मणियार,इमरान तांबोळी,युनुस कुरेशी शेख अनस,शेख सलमान,साजिद पिंजारी, जावेद पिंजारी,मानव मुक्ती मिशनचे सय्यद रफिक यांचे स्वाक्षऱ्या होते.

Saturday, 6 June 2020

शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते द्यावीत आमदार राजेश राठोड

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने  बाजारपेठेत गर्दी होऊ शकते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना आमदार राजेश राठोड यांनी आढावा बैठकीत बोलताना
केली.येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी आ.राजेश राठोड यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार सुमन मोरे, गटविकास अधिकारी सुरडकर, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी, बांधकाम विभागाचे उपअभियंता कोल्हे, पोलीस निरीक्षक विलास निकम, कृषी अधिकारी विष्णू राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला आ. राठोड यांनी कोरोनाबाबत तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांबाबत माहिती घेतली. लॉकडाउन उठवल्यामुळे बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे आणि खते बांधावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सम-विषम दिनाप्रमाणे बाजारपेठेतील दुकाने सुरू ठेवता येतील का याबाबत विचार व्हावा. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावीत यासारख्या बाबी नमूद करण्यात आल्या.

मंठ्यात शिवराज्यभिषेक सोहळा दिन साजरा...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त [ता.६] शनिवार रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवमय उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना
अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरिक्षक विलास निकम , स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन बोराडे , बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी , मोसीन कुरेशी , पो.हे.काॅ. रामचंद्र खडसे , रवींद्र बीरकायलु , पप्पू दायमा , तोफीक अन्सारी यांच्या उपस्थिती होती.तसेच तालुक्यात घरोघरी शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून घरोघरी अभिवादन करण्यात आले..

Saturday, 23 May 2020

रमजान ईद निमित्त मंठा पोलीस ठाण्यातशांतता कमिटी बैठक संपन..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विलास निकम साहेब यांनी दी.23 में शनिवार रोजी रमजान ईद निमित्त शांतता बैठक घेवून शहरातील मुस्लिम बांधवांची त्यांच्या सुचना एकूण घेतल्या या निमित मुस्लिम समाजातील
प्रतिष्ठित नागरिक यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व धार्मिक कार्यक्रमला बंदी असल्याने रमजान ईदची नमाज ईदगा मैदनात न जाता घरीच अदा करण्याचे या बैठित निर्णय घेण्यात आला.तर ईद उत्साहात साजरी करा पण घरीच साजरी करा शहरातील कायदा सुव्यवस्था  ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा असे मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक विलास निकम साहेब बोलत होते.या प्रसंगी कय्यूम कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान, नगरसेवक मुसा कुरेशी,शबाब कुरेशी,कबीर भाई,शकील अंसारी,सादेक बागवान पत्रकार मोसीन कुरेशी यांची उपस्थिती होती.बैठक यशस्वी पार पाडण्यासाठी पो.ना राजाडे यांनी परिक्षम घेतले.

Friday, 1 May 2020

लाज़ीना कुरेशी हीचा पहीला रोजा...

मेहकर प्रतिनिधी:मेहकर शहरातील इमाम बाडा येथील माजी नगरसेवक मुजीब कुरेशी यांची नात मोहसीन कुरेशी यांची नऊ वर्षाची मुलगी लाज़ीना कुरेशी हिने आपल्या आयुष्याचा सुरवातीचा पहीला रोजा ठेवला आहे.मुस्लिम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात रोजा (उपवास)ठेवला जातो.लाज़ीनायाने कमी वयात रोजा ठेवल्याने परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक केले आहे.

Monday, 13 April 2020

दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच क्वारंटाइनतुन मुक्त केले...

पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 वी जयंती निमित्त सोशल डिस्टेंसचे पालन करुण अभिवादन करण्यात आले..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: देशभरात 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मनोरंजन,कार्यक्रम,प्रबोधनी स्पर्धा आदि आयोजित करून मोठ्या आनंदाने भिम जयंती साजरी करण्यात येत पण
देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणू मुळे देशभरात लॉग डाऊन करण्यात आला त्यामुळे शासनाने सर्व धार्मिक कार्यक्रम घरी राहूनच साजरी करण्याचे आदेश दिले असल्याने आज मंठा शहरात सोशल डिस्टन्स पाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मोजक्याच् अनुयायी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी विलास निकम यांनी बोलताना सांगितले की काही वर्षापूर्वी दलित समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच क्वारंटाइनतुन मुक्त केले. कोरोनाचे संकट पाहता भीम जयंती घरीच राहून साजरी करा असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांनी केले. तसेच जयंतीनिमित्त पोलिसांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याचे निकम साहेब यांनी सांगितले याप्रसंगी भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष प्रकाश अण्णा घुले यांच्यावतीने पत्रकार व पोलीस कर्मचारी यांना माक्स व सॅनिटायझरचे वाटप केले यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम, नगरसेवक अरुण वाघमारे, प्रकाश अण्णा घुले, राजेश खंदारे, गणेश वाघमारे , प्रदीप वाघमारे,डॉक्टर प्रताप चाटसे,दीपक लोणे,मोजक्या अनुयायी व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

Friday, 10 April 2020

आरोग्य सेवकांच्या वतीने मौजे जाटखेडा या गावात साबणाचे वाटप....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत मौजे जाटखेडा या गावात आरोग्य सेवकांच्या स्वखर्चाने गावकऱ्यांना लाईफ बॉय साबणचे वाटप करण्यात आले .. यावेळी आरोग्य शिक्षण देताना सांगितले की संध्याची परिस्थिती कोरोना व्हायरस मुळे गंभीर आहे.मात्र व्यवस्थित पणे काळजी घेतली तर कोणालाही या आजाराची लागण होणार नाही..यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी वैयक्तिक पातळीवर घ्यावी जसे दर तासाला हात स्वच्छ धुवून घेणे..नाकाला व तोडाला रुमाल बाधणे.ज्यांना ही सर्दी खोकला ताप अशी लक्षणे आहेत त्याचे पासून 1 मिटर दुर राहणे गर्दी चे ठिकाणी जायचे टाळवे संध्या कलम 144 लागु आहे. त्या मुळे नागरिकांनी घरीच राहवे.आदी बाबतीत आरोग्य शिक्षण देण्यात आले.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खातगावकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे,डॉ अर्चेना पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात व मंठा तालुक्यात प्रत्येक नागरिकांचे आरोग्याची काळजी आरोग्य विभाग घेत आहे.तरी कोणाला सर्दी खोकला ताप.खशात खवखवणे आदी लक्षणे असतील तर तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना पाटील,आरोग्य सहाय्यक सतिष निकम,औषध निर्माण अधिकारी गणेशराव बोराडे,आरोग्य सेविका सुनंदा लोखंडे,आशा शोभा झोरे,गावातील सिताराम चिचाणे,विठ्ठल चिचाणे,अंगणवाडी सेविका इदुमती चिचाणे उपस्थित होते.

मंठा तालुक्यात 365 लोकांना होम क्वारंटाइन..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:आजपर्यंत मंठा तालुक्यात पर जिल्ह्यातील आलेले एकुण लोकसंख्या 6026 असुन या सर्वांची प्राथमिक तपासणी ग्रामीण  रुग्णालय मंठा आणि 4 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 24 उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य
कर्मचारी यांचे मार्फत करण्यात आली असून त्या मध्ये 365 जणांना फ्ल्यू ची लक्षणे असणाऱ्यांना प्राथमिक औषध उपचार करून होम क्यारंटाईन केले होते.त्यामध्ये 202 व्यक्ती चा 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत.उर्वरित 163 व्यक्ती चा 14 दिवसाचा कालावधी येते काही दिवसात संपेल व या सर्व जणाचा दैनंदिन पाठपुरावा आरोग्य कर्मचारी व आशा वर्करचे मार्फत  सुरू असून या सर्वाची तब्येत चांगली आहे.आजपर्यंत एकुण 16 मंठा शहरातील 14 आणि ग्रामीण भागातील 2 व्यक्ती ना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे  कोरोना संशयित लक्षणे असल्याने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. व त्या मध्ये सर्व 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ..तरी तालुक्यातील सर्व जनतेला आरोग्य विभाग मंठा याचे वतीने आवाहन करण्यात येते की कोणी ही घाबरून जाऊ नये अथवा अफवांना बळी पडू नये .प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करावे तसेच कुठल्याही व्यक्ती ला कोरोना संशयित लक्षणे असल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात दाखवून घ्यावे ..त्या प्रमाणे प्रशासणाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपक लोणे यांनी केले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख  ए.जे बोराडे यांच्या शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी...

गोरगरिबांना धान्याचे वितरण व्यवस्थित करा..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी आज शुक्रवार ता.10 रोजी शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन धान्य वितरण व्यवस्थेची पाहणी केली लॉकडाऊन काळात शासन नियमाप्रमाणे गोरगरिबांना धान्य मिळाले पाहिजे,
स्वस्त धान्याचे व्यवस्थित वितरण करा, सोशल डिस्टन्स पाळा अशा सूचना त्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत मंठा अर्बन बँकेचे संचालक अंकुशराव अवचार, बाजार समितीचे माजी सभापती प्रल्हादराव बोराडे, पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, माजी सभापती सुरेश सरोदे, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, तालुका संघटक तुळशीराम कोहिरे यांची उपस्थिती होती कोरोना या अतिभयानक विषारी संसर्गामुळे संपूर्ण देश व राज्यावर मोठे संकट कोसळले आहे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे हा गंभीर विषय सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याची खरेदी करताना प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी रेशनकार्डधारकांना दिल्या शिवसेनेच्या सर्व तालुका प्रमुख विभाग प्रमुख आणि गावागावातील शाखाप्रमुख यांनी आपल्या गावात स्वस्त धान्याचे वितरण व्यवस्थित होते का याची पाहणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना बचावा करिता व्यंकटेश क्लिनिकचा मानवी संदेश..

तू रस्त्यावर आला तर.. मी तुझ्या घरी येणार..!

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे.  मंठा शहरात देखील मोठी दक्षता पाळण्यात येत आहे. यासाठी मंठा नगरपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन कंबर
कसली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मुख्यरस्ता संपुर्ण शहर वार्ड आलाउसिंग संदेशाद्वारे पिंजुन काढला जात आहे.प्रशासनाने ला हातभार मदत म्हणुन येथिल  डॉ  प्रवीण मालेगावकर यांचे व्यंकटेश क्लेनिक स्त्यांच्या मधोमध लिहिलेले संदेश बोधक आणि मजेशीर आहे त्यामुळे हा संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांना अंतर्मुखदेखील करीत आहेत. तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार' असा कोरोनाबाबत संदेश रेखाटण्यातांना  आकाश उत्तमराव मोरे हा तरुण युवक कारागीर.

Sunday, 5 April 2020

मंठा शहरात मुंबई येथील जमातसाठी आलेल्या कोरोना संशयित १३ पैकी १३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा शहरात ३ एप्रिल शुक्रवार  रोजी रात्री उशीरा मंठा शहरातील एकुण १३
व्यक्तीना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना विलगीकारण कक्षात उपचारसाठी पाठविण्यात आले.होते हे १३ व्यक्ती मुबंई
येथून दी.१६.मार्च रोजी मंठा येथे जमात कार्यक्रमासाठी आले होते.या पैकी सहा व्यक्तीना ताप असल्याणे त्यांचे व त्यांच्या संर्पकातील इतर ७ जनाचे असे एकुण १३ पैकी १३ रुणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मंठा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक लोणे साहेब यांनी दिली...तर अजुन एक ग्रामीण भागातील यक्तिला दि. ४ एप्रिल शनिवार रोजी सकाळी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.होते सदरील व्यक्तिचापण अहवाल निगेटिव्हआल्याची माहिती दीपक लोणे साहेब यांनी दिली.तर मुबंई,पुणा अथवा इतर ठिकाणाहुन आलेल्या व्यक्तीची प्राथमिक तपासणी चारही प्रा.आ.केंद्र स्तरावर व ग्रामीण रुग्णालय मंठा येथे करण्यात येत असुन आवश्यकता भासल्यास नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा व नागरीकांनी घाबरून न जाता आपल्या घरीच थाबांवे व बाहेरगावाहुन आलेल्या व्यक्तीनी घरातच वेगळे रहावे वारंवार साबनाने हात धुवावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार मॅडम श्रीमती सुमन मोरे यांनी सर्व जनतेस केले आहे.

Wednesday, 1 April 2020

मंठा तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडला.

नागरिकांनी सावधगिरी पाळावी, घराबाहेर पडणे टाळावे.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनीधी: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशात शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. देशात संचारबंदी लागू झाली आहे. परंतु संचारबंदी असताना देखील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक दवाखाना, औषधी, जीवनावश्यक वस्तू खरेदी आदी कारणे सांगून रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत. नागरिकांनो सावध व्हा कोरोना आपल्या घराच्या दारापर्यंत पोहोचला आहे.
कोरोना विषाणूच्या धास्तीने कोणत्याही खेड्यात बाहेरून आलेल्या जवळच्या नातेवाईकांना देखील प्रवेशबंदी केली आहे. मुंबई-पुण्याहून व इतर शहरातून आलेल्याना शेतात दुरून थांबावे लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे रोहिणा ता. परतूर येथे गुरुवारी ( ता. 19 ) पुण्याहून आलेल्या एका नातेवाईकास गावकऱ्यांनी गावात प्रवेश देण्यास नाकारले. त्यामुळे तो मंठ्या शहरास लागून असलेल्या वांजोळा पुनर्वसन येथे मुक्कामी आला. त्यास सर्दी-खोकला-ताप असल्याने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर औषध उपचार केले. परंतु त्यात सुधारणा न झाल्याने त्यास मंगळवारी ( ता.  31 ) पुढील उपचाराकरिता जालना येथे पाठवीत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी दीपक लोणे व वैद्यकीय अधीक्षक प्रताप चाटसे यांनी दिली आहे. तसेच तो ज्या घरात मुक्कामी राहिला त्या घरातील सर्वांची वैद्यकीय अधिकारी पथक तपासणी करण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Monday, 30 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी सजग राहावे...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी सजग राहावे...

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्यावतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत असून नागरिकांना आवश्यक त्या सूचना आणि कळकळीचे आवाहन करणारी स्टिकर्स आणि
पॉम्पलेटचे विमोचन सोमवार ता.30 रोजी पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे महाभयानक संकट उभे राहिले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत तसेच पोलिस प्रशासन वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स फार्मासिस्ट यांच्यावतीने सातत्याने आवाहन करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिक मात्र आवश्यक ती काळजी घेताना दिसून येत नाही.  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक होल्डिंग पॉम्पलेट याद्वारे नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे घरी थांबा सुरक्षित रहा,आपण सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित, मास्क वापरावे, वारंवार हात धुवावे, घराबाहेर पडू नये प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना जाहीर पत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष दायमा,पोलीस उपनिरीक्षक नितिन गट्टुवार,मंजितसिंग सेना, बिरकायलु अण्णा,शाम गायके,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे, पत्रकार बालाजी कुलकर्णी,अनिल बा खंदारे, रमेश देशपांडे, मोसिन कुरेशी, डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, अमोल राऊत, अरुण राठोड, बाबासाहेब कुलकर्णी, तुकाराम मुळे, विजय देशमुख यांची उपस्थिती होती...

Sunday, 29 March 2020

मॉडर्न इंग्लिश स्कूलचा आदित्य राठोड आरटीई परीक्षेत तालुक्यातून सर्वप्रथम, राज्यातून सतरावा...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्य विनोद राठोड हा आर टी एस ई परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम आला तर  जिल्ह्यातून  सातवा राज्यातून सतरावा  आला आहे तर इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी काव्य रमेश जोशी तालुक्यातून दुसरी तर जिल्ह्यातून आठवी राज्यातून चोवीसावी आली आहे इयत्ता चौथीचा विद्यार्थी पृथ्वीराज
तानाजी शेंडगे हा तालुक्यातून दुसरा आहे तर सोहम भगत हा राज्यातून 45 वा आला आहे सदरील परीक्षा डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेकडून घेण्यात आली होती.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठी  युपीएससी-एमपीएससी च्या धर्तीवर घेतली जाणारी आरटीएसई परीक्षा दि 02 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या टैलेंट चा शोध घेणाऱ्या या परीक्षे साठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा  मराठी माध्यमाच्या शाळा  तसेच इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळेतील इ.२ री ते  ९ वी  चे  २०४  विद्यार्थी या परीक्षेला बसले होते ही परीक्षा बुद्धिमत्ता, चालू घडामोडी व क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित होती.या परीक्षेचा निकाल आज रोजी जाहीर झाला यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांने नेत्रदीपक यश मिळवले,गुणवंत विद्यार्थ्यांचे तहसीलदार सुमन मोरे,गटविकास अधिकारी एस.एम.पाटील,पोलीस निरीक्षक विलास निकम,सभापती पवार,उपसभापती नागेश घारे,संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग खराबे यांनी अभिनंदन केले..

Friday, 27 March 2020

कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर सर्वांनी घरीच थांबुन सहकार्य करावे ....बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :कोरोना या विषाणूचे रुग्ण वाढत दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.यासाठी आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.कोरोना विषाणूचा संसर्ग विषाणुला आळा घालण्यासाठी प्रशासनने आणि वैद्यकीय यंत्रणा देत असलेल्या
बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे म्हणाले की , जगभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा धसका घेतला असुन चीन, इटली, इराण या देशात कोरोनाच्या संसर्गामुळे मोठी हानी झाली आहे.त्यासाठी आता आपण वेळीच सावध झालो नाही , तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी आपल्याला महसुल , पोलीस यंत्रणा , आरोग्य व नगर पंचायत प्रशासनाने सुचविलेल्या प्रतिबंधक उपाययोजना व सुचनाचे पालन करावे.जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.प्रत्येकाने कोणताही धोका न पत्करता याप्रसंगाला घरी थांबुन तोंड द्यायचे आहे. यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपण व आपल्या घरातील प्रत्येकाला बाहेर जाऊ देऊ नका.स्वतः बरोबर व आपल्या परिवाराची व समाजाची सुरक्षिततेची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. काम नसतांना विनाकारण बाहेर येऊ नये , नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे.कुठेही काही शंकास्पद आढळून आल्यास प्रशासनास कळवावे , असे कळकळीचे विनंतीपूर्वक आवाहन मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे यांनी केले आहे..
सूचनांचे तंतोतंत पालन करावे.आपली व आपल्या कुटुंबियांची तसेच समाजाची काळजी घ्यावी , कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा मुकाबला करण्यासाठी आपण घरीच थांबावे. तसेच अत्यावश्‍यक कामाशिवाय कोणीही बाहेर फिरू नये , असे कळकळीची आवाहन मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे यांनी केले आहे.

Monday, 23 March 2020

उस्वद शिवारातील पूर्णा नदी पात्रात अवैध रित्या वाळू उत्खणन करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

जनता कर्फ्यूचा कालावधीत 2 लाख 25 हजारचे मुद्देमल जप्त...

मोसीन कुरेशी. मंठा प्रतिनिधी:उस्वद शिवारातील पूर्णा नदी पात्रात अवैध रित्या वाळू उत्खणन करणाऱ्या लोकांचे 2 लाख 25 हजारचे 15 मोटरसायकल नितिन शेषराव चिंचोले वय 41 उस्वद सजा येथील तलाठी यांच्या फिर्यादि वरुण मंठा पोलिसांच्या वतीने 2 लाख 25 हजारचे 15 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. 22 मार्च रविवार रोजी जनता कर्फ्यू असल्याने फिर्यादी नितिन शेषराव चिंचोले आपल्या निवास्थानी 4 वाजेच्या सुमारास मंठा येथे असतांना बातमी मिळाली
कार्यक्षेत्रातील उस्वद शिवारातील पूर्णा नदी पात्रात महादेव मंदिराच्या पाठीमागे काही लोक नदीपात्रात वाळू उत्खनन करून वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने व चोरटी वाळू कण्यासाठी वाहनासह थांबले आहे. सदर माहिती मिळताच फिर्यादी यांनी मंठा तहसीलदार यांना कळवुन फिर्यादी व ऊस्वद गावाचे पोलीस पाटील गजानन भगवान राउत रा.छलाणी कॉलनी मंठा फिर्यादी यांचे मोटरसायकलवरून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी उस्वद शिवारातील पूर्णा नदी पात्रात महादेव मंदिराच्या पाठीमागे गेले असता नदी पात्रात वाळू भरण्यासाठी थांबलेले वाहनासह टेम्पो त्या चालकांनी अर्धवट वाळू भरलेल्या अवस्थेत पळवून घेऊन गेले वरील चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर देखरेख करून त्यांना माहिती देणाऱ्या व वाळू भरणाऱ्या लोकांच्या त्या ठिकाणी एकूण 15 मोटर सायकल उभ्या असल्याचे दिसल्या फिर्यादी सदर ठिकाणी जाताच सदर मोटरसायकल चालक-मालक मोटर सायकल सोडून त्यांना पाहून पळून गेले म्हणून त्या मोटर सायकल जप्त करून चालक-मालक विरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिल प्रमाणे मो.सा. चालक मालक यांनी उस्वद नदी पात्रात अवैद्य रित्या वाळूचे उत्खनन करण्यासाठी व वाळु ची चोरटी वाहतुक करुन, मा.जिल्हाधिकारी यांनीजनहितार्थ कोरोना साथरोग (आजार) प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुशंगाने आदेशीत केलेल्या संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन गैरकाययदेशीर रित्याजमाव करुन शासकीय आदेशाचा अवमान केला.फिर्यादिला पाहुन जाय मोक्यावरुनपळुन गेले.म्हणुन मोटार सायकल चालक मालक यांच्या विरुद्ध भादवीकलम-379,188, गौण खनिज कायदा कलम-3, 4 व 1897 चा साथरोग प्रतिबंधकअधिनियमाचे उल्लंघन कलम-2,3,4 व मु.पो.का.कलम-37(3),135 प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिली आहे.


Thursday, 27 February 2020

व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर म्हणजेच मराठी भाषेचागौरव होय.... प्राचार्य डॉ.भारत खंदारे


मंठा प्रतिनिधी:येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालात दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी'मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती होती तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विनायक काळे.प्रा.सौ.चारुलता पाटील यांची विचारमंचावर
विशेष उपस्थित होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर उपस्थित
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.विनायक काळे म्हणाले की, आपली मातृभाषा मराठी ही वैभवशाली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये दर्जेदार साहित्याची निर्मिती झालेली आहे तेव्हा या आषेचे संवर्धन करण्याची
जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे ..
तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे म्हणाले की, भाषा
ही संस्कृती संवार्धानाचे कार्य करते.भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतारित होतो.आपली मातृभाषा'मराठी' ही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी कुठेच कमी पडत नाही
तेव्हा प्रत्येकाने भाषा जतन करुन दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर केला तर खऱ्या अर्थाने तो मराठी भाषेचा गौरव होईल.याप्रसंगी प्रा.सौ.चारुलता पाटील यांचेही समायोचित भाषान झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.के.एम.कांबळे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.रवींद्र गायके यांनी केले. कार्यक्रमास महाविद्याला यीन विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीयांची बहुसंख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.पंढरीनाथ काकडे यांनी मानले .

Wednesday, 26 February 2020

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात 24 तास वीज सेवा देण्यात यावी- संतोष खारवणे

मोसीन कुरेशी
वाटुर प्रतिनिधी/वाटूर येथील एम.एस.सिबी ला युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की,वाटूर शहरासह वाटुर परिसरात विज बिल थकीत असल्यामुळे विज सेवा खंडीत करण्यात आली आहे. परंतु या काळात दहावी-बारावीच्या
विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तेव्हा प्रशासनाने थकीत वीज बिलामुळे विज सेवा खंडीत केलेली कार्यवाही पुढे ढकलण्यात यावी व विद्यार्थ्यांचे होणारे मोठे नुकसान थांबवावे अशी मागणी युवासेना तालुका उपप्रमुख मंठा संतोष खारवणे, यांनी केली.यावेळी राजू शिंदे, गजानन सोनवणे, महादेव शिंदे.अनिस पठाण,देवीदास राठोड,प्रभाकर आढाव,रामचंद्र काळे,विकास आढाव,सुरेश बच्छीरे,परमेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती.

Friday, 31 January 2020

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक बोराडे यांची निवड..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मंठा येथे शासकीय विश्रामगृह येथे २६ जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मंठा च्या अध्यक्षपदी दीपक बोराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीत उपाध्यक्षपदी संदीप बोराडे,महादेव खरात, सचिवपदी महेश बोराडे,कोषाध्यक्ष दीपक बोराडे,खजिनदार विजय बोराडे,सहसचिव बाबा
कतारे, प्रसिद्धीप्रमुख विशाल देशमुख, यांची निवड करण्यात आली आहे तर सल्लागारपदी बाजीराव बोराडे,संजय बोराडे, दिगंबर बोराडे,सतीश बोराडे,केशव बोराडे, कृष्णा खरात,विष्णू गायकवाड,संदीप मणियार,संतोष बोराडे,एकनाथ काकडे,दिनेश बोराडे, मोहित बंसल,महेश बोराडे,संभाजी बोराडे तुकाराम गोडगे,सुरेश बोराडे,कुलदीप बोराडे विजय बोराडे,किरण बोराडे,उदय बोराडे निलेश शिंगने,गजानन बोराडे,शेळके सर भागवत बोराडे,भागवत चव्हाण,आकाश कास्तोडे,गणेश बोराडे,सचिन चव्हाण,पप्पू राठोड,कपिल तिवारी तर सदस्यपदी विकास बोराडे,पप्पू शेजुळ,गणेश मिसाळ,कृष्ण वाघ योगेश खानदेशी,रोहित कुलकर्णी,सचिन खंडागडे,सचिन काळे,सचिन रणनवरे अशी निवड करण्यात आली..

Thursday, 9 January 2020

स्वामी विवेकानंद महाविद्यालयमध्ये पालक मेळावा संपन्न.....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी शिक्षक,पालक मेळावा अयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये विविध ख्यातनाम मान्यवरांन विद्यार्थी,पालकांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये रिल्याबल स्पर्धा परीक्षा केंद्र औ.बाद चे संचालक धंनजय आकात प्रा.डॉ.धोंडोपंथ मानवतकर,प्रा.डॉ.पुरोषोत्तम वायाळ या मान्यवरांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.धनंजय आकात यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व समजाऊन सांगताना,अभ्यास कसा करायचा, तसेच वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी यशस्वी होत आहेत.व येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे सांगीतले.दुसरे मार्गदर्शक प्रा.डॉ.वायाळ सर यांनी विद्यार्थी,पालक,शिक्षकांनी व्यक्तीमत्व विकास कसा करावा,आरोग्य चांगले कसे राखावे,मन स्थिर राहण्यासाठी कोणते प्राणायाम करावेत. विद्यार्थी जर मनानी सशक्त राहीले तरच ते जीवनात यशस्वी होतील असे सांगतीले विद्यार्थी
,शिक्षक व पालकांना वेगवेगळे उदाहारणे देऊन माहिती सांगितली.प्रा.डॉ.मानवतकर सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजाऊन सांगताना,अभ्यास कसा करावा,उच्च शिक्षण घेवुन स्वःत,कुटूंब व समाजाचा विकास करावा असे सांगीतले.अध्यक्षीय समारोप भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांनी विद्यार्थी,पालकांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगीतले की विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून अभ्यास करावा,या महाविद्यालयामध्ये  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर भर देण्यात येतो' असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेष्ठ प्राध्यापक सोन्याबापू चव्हाण व प्रा.ए.एल.मगर यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर धनंजय आकात,प्रा.डॉ. पुरोषोत्तम वायाळ,प्रा.डॉ धोंडोपंथ मानवतकर,प्राचार्य डॉ.भारत खंदारे, विद्यार्थी पालक नगरसेवक सौ.सोमानी ताई,निरज सोमानी,उप.प्राचार्य डॉ.एस.के.कमळकर,उप.प्राचार्य डॉ.बापू सरवदे,उप.प्राचार्य अशोक खरात, डॉ.नेताजी मुळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रियाशिल प्रा.सौ.सी.पी.पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रर्दशन प्रा.डॉ.नवल यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पंढरीनाथ काकडे,प्रा.कादे,प्रा.शेळके ,प्रा.बांडगे प्रा.डॉ.नारायण दुभळकर, प्रा.आर. के.शिदे, प्रा.नारायण राऊत,प्रा.भगवान वाघ्राळ यांनी प्रयत्न केले.

Monday, 6 January 2020

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने दर्पण दिन साजरा.....

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ६ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठाच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विलास निकम,जालना मर्चंट बॅंकेचे
व्यवस्थापक सुरज देशमुख,ॲड. मधुकरराव मोरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडित बोराडे पत्रकार, संघाचे तालुकाध्यक्ष संतोष दायमा, रमेश बोराडे ,श्याम हजारे, यांची व्यासपीठावर उपस्थिती होती प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विलास निकम म्हणाले की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात प्रिंट मिडियाचा महत्त्व आजही कायम आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.वाईट परंपरांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांना करावे लागते अन्यायाच्या विरोधात पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले बँकेचे व्यवस्थापक सुरेश देशमुख यांनीही पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांनी अन्यायाच्या विरोधात पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे असे सांगून बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पत्रकारांनी पुढे चालवावा असे सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम मुळे,अनिल बा. खंदारे,बालाजी कुलकर्णी,रमेश देशपांडे, विजयकुमार देशमुख, किरण अवचार,आसाराम शेळके, कैलास पवार ,राघूसिंग जनकवार,डॉ.आशिष तिवारी,अमोल राऊत,अरुण राठोड,प्रकाश भावसार,रवी पाटील,मोसीन कुरेशी, लखन जयस्वाल,शुभम दायमा,यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Wednesday, 1 January 2020

कुमारी गोदावरी देविदास गायकवाडचे घवघवीत यश...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथील बी.ए. प्रथम वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी गोदावरी देविदास गायकवाड हिने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाने कै. विनायक रावजी पाटील स्मृती
समारोह -2019 अंतर्गत आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते.या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये काव्यवाचन ,वादविवाद , वक्तृत्व व सुगम गायन आधी स्पर्धांचा समावेश होता.यापैकी कु. गोदावरी गायकवाड हीने सुगम गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र  रोख सहा   हजार रुपये (६०००) असे या बक्षिसाचे स्वरूप आहे.तिच्या या यशाबद्दल मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमती आशाबाई आकात,उपाध्यक्ष मा.कुणाल दादा आकात, सचिव मा.कपिल भैया आकात   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे,उपप्राचार्य डॉ.सदाशिव कमळकर ,उपप्राचार्य डॉ. बापू सरवदे,उपप्राचार्य प्रा. अशोक खरात , पर्यवेक्षक डी.आर.जाधव, आदींनी सत्कार केला. सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रा. डॉ. राजेश गायकवाड प्रा. डॉ तुषार धोंडगे, प्रा. डॉ सुभाष वाघमारे प्रा. डॉ संतोष वानखेडे , प्रा.के.एम. कांबळे,प्रा.चारूलता पाटील प्रा.अच्युत मगर आदींनी सत्कार करुन अभिनंदन केले कु. गोदावरी गायकवाड हिच्या यशाबद्दल मित्रपरिवार नातेवाइकाकडून सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.