200

Followers

Thursday, 31 October 2019

मंठा तालुक्यात अवैध दारू विक्री जोमत...

(जिल्हा दारूबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, स्थानिक पोलिसांचे अभय)

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी : शहरातील जालना- जिंतूर रोडवर असलेल्या ढाब्यावर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध विदेशी दारू विक्रीने अक्षरशः थैमान घातले आहे शहरातील ए
कही ढाब्याला अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नाही हे विशेष . मंठा तालुक्यातील सर्व ढाबे तसेच ग्रामीण भागात किराणा दुकानावरही अवैद्य विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे तळीरामांची संख्या वाढली आहे. या तळीरामांमुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे .राज्य उत्पादन शुल्क विभाग ,अन्न व औषध प्रशासन विभाग व स्थानिक पोलिसांची अवैद्य विदेशी दारू विक्री करणाऱ्या ढाबे चालकांवर मेहर नजर असून आर्थिक देवाण-घेवाण करून पोलीस सहकार्य करीत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात कुठे नाही तेवढे अवैद्य ढाबे मंठा शहरात विनापरवाना बिनबोभाटपणे चालू आहेत. शहरासह तालुक्यात अवैध देशी दारू मिळत असल्यामुळे शहरासह तालुक्यातील परवाना प्राप्त असलेले वाईन बार ,बार अँड रेस्टॉरंट ओस पडलेले आहेत. वास्तविक परवानाधारक बार चालकांना दरवर्षी शासकीय नियमानुसार सरकारचा टॅक्स जीएसटी भरावा लागतो तर अवैद्य ढाबे चालकांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय टॅक्स न भरता विनापरवाना ढाबे  मागील अनेक वर्षापासून चालू केले आहेत . तालुक्यातील सर्व अवैध धाब्यावर होणारी तसेच ग्रामीण भागात होणारी दारूची अवैध विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी होत आहे

No comments:

Post a Comment