मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये मजूर महिलांची बांधकाम प्रमाणपत्रावर सह्या द्याव्या या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी कृत मजूरांना विविध कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत यामध्ये नोंदणी करण्यासाठी मजूरांना नगर पंचायत अंतर्गत मुख्याधिकारी यांच्या सहीची आवश्यकता आहे परंतु येथील अधिकारी व कर्मचारी खऱ्या मजूरांना सह्या देत नसल्याने मजूर विविध लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणून मंठा शहरातील शेकडो मजूर महिलांनी आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये तिव्र निदर्शने केली.यावेळी पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या मध्यस्थीने व कार्यालय अधीक्षक अन्सारी यांनी दोन दिवसात सर्व मजूरांना सह्या देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेया आंदोलनात लालबावटा युनियनचे राज्याध्यक्ष काॅम्रेड मारोती खंदारे व जिल्हासचिव काॅम्रेड सरिता शर्मा सचिन थोरात कालिंदा प्रधान बंडोपंत कणसे शेषकला थटवले सुवर्णा चाळक गोदावरी गायकवाड सुलताना शेख महानंदा वाघमारे छाया शेळके आशामती मिसाळ लता शेजूळ विश्वनाथ वाघमारे आदी
सह मोठय़ा संख्येने मजूर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.मंठा प्रतिनिधी:आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये मजूर महिलांची बांधकाम प्रमाणपत्रावर सह्या द्याव्या या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी कृत मजूरांना विविध कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत यामध्ये नोंदणी करण्यासाठी मजूरांना नगर पंचायत अंतर्गत मुख्याधिकारी यांच्या सहीची आवश्यकता आहे परंतु येथील अधिकारी व कर्मचारी खऱ्या मजूरांना सह्या देत नसल्याने मजूर विविध लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणून मंठा शहरातील शेकडो मजूर महिलांनी आज नगर पंचायत मंठा येथे लालबावटा युनियनच्या नेतृत्वामध्ये तिव्र निदर्शने केली.यावेळी पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या मध्यस्थीने व कार्यालय अधीक्षक अन्सारी यांनी दोन दिवसात सर्व मजूरांना सह्या देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेया आंदोलनात लालबावटा युनियनचे राज्याध्यक्ष काॅम्रेड मारोती खंदारे व जिल्हासचिव काॅम्रेड सरिता शर्मा सचिन थोरात कालिंदा प्रधान बंडोपंत कणसे शेषकला थटवले सुवर्णा चाळक गोदावरी गायकवाड सुलताना शेख महानंदा वाघमारे छाया शेळके आशामती मिसाळ लता शेजूळ विश्वनाथ वाघमारे आदी
आंदोलनातील मागण्या :-
१)मंठा शहरातील नाका कामगारांना खात्री करून खऱ्या कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या द्या
२)"क" वर्ग नगरपंचायत मंठा मध्ये मजुरांना त्वरित मनरेगाची कामे द्या.
३) मजूरांना सह्या न देणाऱ्या व उर्मठ भाषा वापरणाऱ्या कर्मचारी याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करा

No comments:
Post a Comment