Saturday, 9 March 2019

ना. लोणीकरांनी मंठा बसस्थानकाच्या नवीन इमारत मंजुरीचे श्रेय लाटू नये----- जिल्हाप्रमुख ए जे बोराडे ... मंठा

मोसीन कुरेशी,
प्रतिनिधी : मंठा बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामासाठी राज्याचे परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा केल्यामुळे बसस्थानकाच्या नवीन अद्यावत इमारतीसाठी निधी मंजूर झाला या कामात ना. बबनराव लोणीकर राजकारण करीत असून त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिला.ना. लोणीकर यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करीत अत्यंत घाईघाईने नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन उरकून घेतले या निमित्ताने त्यांनी महामंडळाच्या कार्यक्रमातच भाजपचा कार्यकर्ता मेळावा घेतला अशी घणाघाती टीका जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.  ना. दिवाकर रावते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत तसेच राज्याचे परिवहनमंत्री म्हणून मंठा बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत होती .यासंदर्भात ना. रावते यांचेकडे मागील सहा महिन्यांपासून जिल्हाप्रमुख म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा केला यासाठी वेळोवेळी मंत्रालयात बैठका झाल्या या बैठकांमधून ना. रावते यांनी या  नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मंजुरी सह  निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले .या कामासाठी तीन कोटी 31 लक्ष रुपये निधी मंजूर झाला . फक्त शिवसेनेमुळेच  मंठा  बसस्थानकासाठी निधी मिळाला मात्र ना. लोणीकर यांनी जनतेची दिशाभूल करून घाईघाईने भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला भविष्यात त्यांनी राजकारण करताना शिवसेनेमुळे मंजूर झालेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये आणि विकास कामात राजकारण आणू नये असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment