प्रतिनिधी : पत्रकारांना पत्रकारिता करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पत्रकारांची आर्थिक व कौटुंबिक अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ग्रामीण भागातील पत्रकारांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने विविध बँक आणि महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले. मंठा येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवार ता. 7 रोजी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते ॲड मधुकरराव मोरे ,पत्रकार संघाचे मंठा तालुकाध्यक्ष संतोष दायमा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पंडितराव बोराडे ,तुकाराम मुळे, विष्णुदास अर्दड, यांची उपस्थिती होती .प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईने काढलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच पत्रकारांना ओळखपत्र वितरित करण्यात आले. पुढे बोलताना श्री दिगंबर गुजर यांनी सांगितले की, मंठा येथे पत्रकार भवन आणि गृहनिर्माण संस्था होण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून पत्रकारांसाठी येणाऱ्या काळात अनेक योजना राबवायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका मंठा हा विविध सामाजिक कार्याच्या बाबतीत अग्रेसर आहे असे कौतुकास्पद उदगार त्यांनी काढले .यावेळी बोलताना ॲड मधुकर मोरे म्हणाले की, सामाजिक जीवनात पत्रकारांचे मला नेहमीच सहकार्य मिळते, पत्रकार हा कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जनसामान्यांपर्यंत बातमी पोहोचवण्याचे काम करतो, लोकशाही टिकून ठेवण्याचे काम पत्रकार करतात त्यांना हक्काची घरे मिळावीत म्हणून चळवळीच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करेल असा विश्वास ॲड मधुकर मोरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष दायमा यांनी केले .या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष अरुण राठोड, ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख ,लखन जयस्वाल ,रमेश देशपांडे ,अमोल राऊत, डॉ अशिष तिवारी, रवी पाटील,प्रकाश भावसार राघुई सिंग जनकवार,
किरण अवचार , कैलास पवार, गौतम सदावर्ते, प्रवीण दीक्षित, आसाराम शेळके आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बा. खंदारे यांनी केले तर सरचिटणीस मोसिन कुरेशी यांनी आभार मानले
किरण अवचार , कैलास पवार, गौतम सदावर्ते, प्रवीण दीक्षित, आसाराम शेळके आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बा. खंदारे यांनी केले तर सरचिटणीस मोसिन कुरेशी यांनी आभार मानले

No comments:
Post a Comment