पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये
तणावाचे वातावरण आहे.अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने एलओसी ओलांडली. मात्र, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने केला आहे. भारतीय सैन्याने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची 10 विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय
हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे.

काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. पाकिस्तान आणि भारताकडून दोन्ही बाजुंनी एकमेकांना घेरण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी दिली होती. यावर पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिला होता.

No comments:
Post a Comment