Wednesday, 16 January 2019

भाजपा युवामोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.


मंठा प्रतिनिधी:जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर सर्कलमधील भाजपा युवामोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लोणीकर पितापुत्रांच्या हुकुमशाहीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश घेतला. जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेऊन शिवसेनेत मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर प्रवेश घेऊन तीळ-गुळ भेट दिली.शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की, शेतकऱ्यांसाठी झगडणारा, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामिल होणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांना योग्य न्याय देणारा असल्यामुळे आम्ही सर्वजन शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे युवा कार्यकर्त्यांनी सांगितले. शिवसेनेत जाहीर प्रवेश करणारे पांडुरंग सस्ते, संभाजी काकडे, नारायण सस्ते, कृष्णा पवार, योगेश सस्ते, शिवहरी सरकटे, भागवत एरंडे, किरण सोनवणे, भागवत देशमुख, अमोल जाधव, सुरेश काकडे, रामेश्वर काकडे, रामप्रसाद काकडे, निवृत्ती काकडे, कृष्णा काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंठा शिवसेना संपर्क कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे अंकुशराव अवचार, बाजार समितीचे माजी उपसभापती प्रल्हादराव बोराडे, पं.स.चे माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, आकाश कास्तोडे, बालासाहेब बोराडे, इलियास कुरेशी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment