Wednesday, 16 January 2019

स्वामी विवेकानंद महाविद्याल्यात जीजा माता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:स्वामी विवेकानंद वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्याल मंठा येथे राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात अली जंयतीनिमित्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार दिना निमित्य महाविद्यालयात  व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता ,अनेक विधार्थ्यांनी भाषणे केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारतराव खंदारे साहेब ,व्याख्याते प्रा.एस. आर चव्हाण सर, निवृत प्राध्यापिका प्रा. सौ. डहाळे मॅडम,प्रा. पांडूरंग नवल सर यांनी विचार मांडले. व्यासपिठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सरवदे सर ,उप प्राचार्य ए. डी. खरात सर, कार्यालयिन अधिक्षक पि. एल. खराबे  सर, प्रा. सौ. सी. पी. पाटील मॅडम ,प्रा. पंढरीनाथ काकडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाराविची विद्यार्थिनीं कु. वैष्णवी गोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महा विद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठया संख्येनें विद्यार्थी हजर होते. आभार प्रदर्शन कु. वैष्णवी गोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment