Sunday, 20 January 2019

शिवजयंती उत्सव समेती कार्यकारणी जाहिर

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:तालुक्यातील 20 जानेवारी रविवार रोजी शासकिय विश्रामगृह मंठा येथे सार्वजनिक शिवजंयती उत्सव निमित्य बैठक झाली.या बैठकित सर्वानुमते शिवजंयती समितीच्या अध्यक्षपदी डिंगाबर बोराडे यांची नियूक्ती जाहिर करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी  बाबा कातारे,विनायक चव्हाळ,सचिवपदी स्वपनील खंदारे, निलेश शिंगने,सहसचीव नानासाहेब बोराडे,मुन्ना खंदारे, कोषाध्यक्षपदी संभाजी बोराडे,विजय बोराडे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी किरण सुर्यवंशी,संदिप बोराडे यांची निवड झाली. 
प्रसिध्दी प्रमुख:विकास बोराडे,विशाल देशमुख,विष्णू कळणे,आकाश कासतोडे,सचिन रणभवरे ,गोपाल कडूकर ,राहूल गोंडंगे यांची निवड करण्यात आली. सल्लागार समिती: गजानन बोराडे, संभाजी देशमुख ,प्राचार्य ज्ञाणेश्वर वायाळ, शिवश्री शिवाजीराव जाधव,आशोक शेरे,एकनाथ काकडे,शरद बाहेकर,शिवश्री संतोस मोरे सर ,सुधाकर चव्हाण सर, शिवश्री मोरेश्वर बोराडे,कुलदिप बोराडे, शिवश्री महेश बोराडे, गजानन खरात प्रा. परमेश्वर शेळके, यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी मोठिया प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते.

Friday, 18 January 2019

परभणी : वक्फ बोर्ड निवडणूक; दुर्राणींचा अर्ज

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परभणी : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील मुस्लिम विधानसभा- विधानपरिषद आमदारांमधून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ.खाजा बेग, वक्फ बोर्डाचे माजी सदस्य हबीब फकीर, जमील मौलाना, फहाद पठाण, अतिक जहागीरदार, सागर देशमुख, मुकूंद विटेकर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. असा आहे निवडणूक कार्यक्रम मुस्लिम विधानसभा- विधानपरिषद सदस्यांमधून वक्फ बोर्डावर पाठवायच्या एका सदस्यपदासाठी २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २२ रोजी अर्जांची छाननी होणार असून २४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. आवश्यक असल्यास ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबई शहर जिल्हाधिकाºयांच्या दालनात मतदान होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे.

Thursday, 17 January 2019

आष्टीत बंदला मोठा प्रतिसादश्रीसंत भगवान बाबा याच्या मूर्तीच्या विटंबनीचे तीव्र पडसाद आष्टित उमटले.

आष्टी प्रतिनिधी -; परतुर तालुक्यातील
आष्टी येथे दुकाने बंद करून निषेध व्यक्त केले.
भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटंबना मालवणी ता
पारनेर जि अहमदनगर घडली आसुन या घटनेचा
निषेध आष्टी येथे केला.श्रीसंत भगवान बाबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्याच्या मूर्तीची विटंबना हो खप-वून घेणार आहेत. सदरील घटना घडली असून
या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी नसता
जय भगवान महासंघाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे
आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा पोलीस
सहायक निरीक्षक दिलेल्या निवेदनात करण्यात
आला. या संदर्भात जय भगवान महासंघाचे परतुर
तालुकाध्यक्ष राजभाऊ आघाव व उपाध्यक्ष दादाराव।
चौरे, बळीराम कडपे, रामप्रसाद थोरात, अमोल
जोशी,भाई शेळके, परमेश्वर पोटे, भागवत कडपे,
कृष्णा थोरात, संतोष रोहिमल, विलास आगलावे,
सिद्धार्थ राख, सत्तार कुशी, मुरूतुजा कल्याकर,
श्रीरंग गांजाळेआदींसह मोठ्या संख्येने सहभागी
झाले होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीतजालना जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री श्री लोणीकर यांनी केली 159 कोटी 9 लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी

जालना, दि. 17 - जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली.  जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 159 कोटी 9 लक्ष रुपयांच्या वाढीव निधीची मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा नियोजन अधिकारी वै.र. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एन.व्ही. आघाव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सन 2019-20 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 175 कोटी 90 लक्ष रुपयांची वित्तीय मर्यादा शासनाने दिली आहे.  परंतू जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.  जिल्ह्यातील कृषि व संलग्न सेवा (गाभा क्षेत्र), ग्रामविकास, सामाजिक व सामुहिक सेवा, लघुपाटबंधारे, ऊर्जा, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा, नाविन्यपूर्ण योजना, टंचाई, अतिवृष्टी, गारपीट, पुरपरिस्थिती, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यासह इतर योजनांसाठी अधिकच्या 159 कोटी 9 लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय रुरबन योजनेच्या माध्यमातुन परतूरसह 16 गावांच्या सर्वांगिण विकासासाठी 20 कोटी रुपयांचा अधिकचा निधी तसेच मानवविकास कार्यक्रमांतर्गत परतूर व भोकरदन तालुक्यासाठी अनुक्रमे 17 कोटी 63 लक्ष व 14 कोटी 85 लक्ष रुपये, जिल्ह्यातील रस्यां ्ची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन रस्ते विकासासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक पाच कोटी रुपयांप्रमाणे 25 कोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी करत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकसित करुन बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या पर्यटन आराखड्यासही मंजुरी देण्याबरोबरच जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठीही निधी देण्याची मागणी  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकचा निधी देण्याची मागणी वित्तमंत्र्यांकडे करुन जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांसाठीही निधी देण्याची आग्रही मागणी केली. आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची पॉवर पाँईटच्या माध्यमातुन मंत्री महोदयांना माहिती देत जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधीची मागणी केली. वित्तमंत्री व नियोजन मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यात विकास कामे राबवत असताना इतर बाबींबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा.  यात्रास्थळांचा विकास, शाळांची दुरुस्ती, मंठा व जाफ्राबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची उभारणी, आयुर्वेद व युनानी दवाखान्यांचे बांधकाम, आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची देखभाल दुरुस्ती, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण या बाबींसाठी जवळपास 36 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याचे मान्य करत मानव विकास मिशनच्या माध्यमातुन जिल्ह्यातील अंगणवाडीच्या बांधकामांसाठी 11 कोटी 74 लक्ष रुपयांचा निधी तसेच राष्ट्रीय रुरबनसाठीही अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याचेही वित्तमंत्री श्री मुनगंटीवार यांनी यावेळी मान्य केले. तसेच तुती लागवड व वनक्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात यावा.  तसेच शासकीय विविध प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी निधी उपलब्धतेसंदर्भात राज्यस्तरीय बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मंठा अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न; तिजोरी न तुटल्याने बँकेतील सीसीटीव्ही घेऊन चोर पसार

जालना - शहरातील मंठा अर्बन बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी बँकेचे शटर उचकटून बँकेत प्रवेश केला. मात्र, बँकेची तिजोरी न तुटल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. दरम्यान, या चोरीत चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डर पळवले. असल्याची माहिती सूत्रा कडून मिडाली.जालना शहरातील मुख्यरास्त्यांवर मंठा अर्बन बँकेत मध्ये रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती.चोरट्यांनी बँकेचे शटर उचकटून बँकेत प्रवेश केला. मात्र, बँकेची तिजोरी न तुटल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसलादरम्यान, या चोरीत चोरट्यांनी बँकेतील सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डर पळवले. असल्याची माहिती सूत्रा कडून मिडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असून अधिक तपास सुरू आहे. 

Wednesday, 16 January 2019

मूर्ती विटबंनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील भाळवाणी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटंबना झाल्याचा निषेध नोंदवात मंठा येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक त्रिभावन साहेब यांना निवेदन देण्यात आले.भाळवाणी येथे समाजकंटकांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटबंना केल्याची घटना घडली होती.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहे.बुधवारी दी. 16 जानेवारी रोजी भगवान बाबा यांच्या भक्तांनी तहसील कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदन देवून निषेध व्यक्त केला. यावेळी निवेदनावर नारायण बुधवंत,खुशा ईघारे,तुकाराम बोंडारे,परमेश्वर बोंडारे,जगनाथ बुधवंत,पंढरीनाथ कंगणे,दशरथ कुटे,दत्ता बुधवंत आदिच्या स्वाक्षऱ्या होते.

जमीयत उलमा-ए-हिन्द के राष्ट्रीय महासचिव मौलाना महमूद मदनी ने दिया इस्तीफा, जानें वजह?

जमीयत उलमा-ए-हिंद के राष्ट्रीय महासचिव मौलाना सैय्यद महमूद मदनी ने अपने पद से त्यागपत्र दे दिया। उन्होंने अपना त्यागपत्र अध्यक्ष कारी मोहम्मद उस्मान मंसूरपुरी को भेजा है। अचानक लिए गए इस फैसले से सभी हैरान हैं। हालांकि इस्तीफा देने की क्या वजह रही इसके बारे में न तो मदनी कुछ कहने को तैयार हैं और न ही कारी उस्मान कुछ ही बता पा रहे हैं। 
मदनी ने मंगलवार की रात्रि अध्यक्ष कारी मोहम्मद उस्मान मंसूरपुरी को अपना इस्तीफा एक बंद लिफाफे में भेजा जिसे पढ़कर कारी उस्मान मंसूरपुरी काफी परेशान हुए। मदनी ने जो त्यागपत्र कारी उस्मान को भेजा उसमें कुछ शब्दों का इस्तेमाल किया जाना कई सवाल खड़े कर रहा है। मदनी ने इस्तीफे में स्वयं को नकारा लिखा है। मदनी द्वारा भेजे गए इस्तीफे की कॉपी सोशल मीडिया पर वायरल हुई तो इस्लामिक हल्कों में चर्चाओं का बाजार भी गरम हो गया। 
इस संबंध में मौलाना महमूद मदनी से बात की गई तो उन्होंने कहा कि उन्होंने इस्तीफा दिया है, लेकिन इसकी वजह क्या है इस पर मदनी ने केवल इतना ही कहा कि उन्होंने इस्तीफे में सब कुछ लिखा है।उधर, जमीयत अध्यक्ष कारी उस्मान मंसूरपुरी ने बताया कि मंगलवार की रात्रि उन्हें मदनी का इस्तीफा मिल गया। अचानक इस्तीफा देने के बारे में अभी कुछ कहना जल्दबाजी होगी, लेकिन इतना जरूर है कि मौलाना महमूद मदनी कई बार मौखिक रूप से अपनी मजबूरियां जाहिर कर चुके हैं। बता दें कि मौलाना महमूद मदनी वर्ष 2001 से जमीयत में महासचिव पद की जिम्मेदारी निभा रहे थे। उनके पद से इस्तीफा देने को लेकर इस्लामिक हल्कों में बहस छिड़ी हुई है।  
कारी उस्मान ने पुनर्विचार के लिए मदनी के पास वापस भेजा इस्तीफा
जमीयत उलमा-ए-हिंद के अध्यक्ष कारी मोहम्मद उस्मान मंसूरपुरी के मुताबिक उन्होंने मदनी से इस्तीफे पर पुनर्विचार करने को कहा है। उनका यह भी कहना है कि मौलाना मदनी ने यह कदम जल्दबाजी में उठाया है इसलिए उन्होंने इस्तीफे को उनके पास भेजकर नजरेसानी (पुनर्विचार) करने को कहा है।

मतीन यांचे स्थायीचे सदस्यत्व जाणार ?

औरंगाबाद प्रतिनिधी ,औरंगाबाद एमआयएम’मधून हकालपट्टी केलेले नगरसेवक सैय्यद मतीन स्थायी समिती सदस्यपद धोक्यातआले आहे. गटनेते नासेर सिद्दिकी यांनी महापौरांना पत्र देऊन पक्षाच्या कोट्यातून दिलेले स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. कायदेशीर बाबी तपासून सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी, असे
आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.वॉर्ड क्रमांक २० जयभीमनगरघाटी परिसर येथून सय्यद मतीन हे एमआयएम'कडून निवडून आले आहेत. त्यांना पक्षाने स्थायी समितीवर पाठवले होते. पक्ष विरोधी कारवाया तसेच विवादास्पद प्रकरणे समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मतीन हे भाजपच्या नगरसेवकांसोबत बसले होते. भाजपसोबत बसणे, तसेचसिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर गटनेते नासेर सिद्दीकी यांनी महापौरांना पत्र देऊन स्थायी समिती सदस्यत्व रद्दकरण्याची मागणी केली आहे.
एमआयएम'च्या गटनेते कडून मागणी आल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी हे प्रकरण विधी  विभागाकडे पाठवून, या प्रकरणात कायदेशीर अभिप्राय मागितला आहे. हा प्रस्ताव झाल्यास सय्यद मतीन स्थायी समिती सदस्यत्व जाऊ शकते.

पांगरी खुर्द शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:आज दि.८ जानेवारी रोजी जि. प. प्रा. शा पांगरी खुर्दच्या शाळा व्यवस्थापन ल समितीची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली शालेय व्यवस्थापन समितीत ७ सदस्यांची निवड करण्यात आली असुन शा व्य समितीच्या अध्यक्षा महिला उमेदवार सौ संगिता सुधाकर शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन , श्री भागवत गैनाजी काळे हे ही बिनविरोध उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले सर्व सदस्यांच्या निवडी नंतर सर्वानी शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक वृंदांना नेहमी सहकार्य करण्याचे वचन दिले.शाळा व्यवस्थापन समिती निवडीसाठी गावातील सर्व पालकासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरीक , सरपंच , उपसरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष सर्व ग्रा पं सदस्यांनी उत्सुर्फत सहभाग घेऊन शाळेला सहकार्य केले ,शाळेचे मुख्यधापक श्री मुख्तार अन्सारी यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार व कर्तव्य सर्व गावकऱ्यासमक्ष सोप्या शब्दात समजावून सांगितले .शाळेचे शिक्षक श्री बी.के खरात सर यांना यंदाचा शिक्षकरत्न पुरुस्कार मिळाल्या मुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांचा हार घालुन त्यांच्या कामाचे कौतुक करत सत्कार केलाशाळेचे सहशिक्षक श्री अंतरकर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

स्वामी विवेकानंद महाविद्याल्यात जीजा माता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

मोसीन कुरेशी,
मंठा प्रतिनिधी:स्वामी विवेकानंद वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्याल मंठा येथे राजमाता जिजाऊ ,स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात अली जंयतीनिमित्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार दिना निमित्य महाविद्यालयात  व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता ,अनेक विधार्थ्यांनी भाषणे केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारतराव खंदारे साहेब ,व्याख्याते प्रा.एस. आर चव्हाण सर, निवृत प्राध्यापिका प्रा. सौ. डहाळे मॅडम,प्रा. पांडूरंग नवल सर यांनी विचार मांडले. व्यासपिठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. सरवदे सर ,उप प्राचार्य ए. डी. खरात सर, कार्यालयिन अधिक्षक पि. एल. खराबे  सर, प्रा. सौ. सी. पी. पाटील मॅडम ,प्रा. पंढरीनाथ काकडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाराविची विद्यार्थिनीं कु. वैष्णवी गोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महा विद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठया संख्येनें विद्यार्थी हजर होते. आभार प्रदर्शन कु. वैष्णवी गोरे यांनी केले.

भाजपा युवामोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.


मंठा प्रतिनिधी:जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर सर्कलमधील भाजपा युवामोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लोणीकर पितापुत्रांच्या हुकुमशाहीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश घेतला. जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेऊन शिवसेनेत मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर प्रवेश घेऊन तीळ-गुळ भेट दिली.शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की, शेतकऱ्यांसाठी झगडणारा, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामिल होणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांना योग्य न्याय देणारा असल्यामुळे आम्ही सर्वजन शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे युवा कार्यकर्त्यांनी सांगितले. शिवसेनेत जाहीर प्रवेश करणारे पांडुरंग सस्ते, संभाजी काकडे, नारायण सस्ते, कृष्णा पवार, योगेश सस्ते, शिवहरी सरकटे, भागवत एरंडे, किरण सोनवणे, भागवत देशमुख, अमोल जाधव, सुरेश काकडे, रामेश्वर काकडे, रामप्रसाद काकडे, निवृत्ती काकडे, कृष्णा काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंठा शिवसेना संपर्क कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे अंकुशराव अवचार, बाजार समितीचे माजी उपसभापती प्रल्हादराव बोराडे, पं.स.चे माजी सभापती संतोष वरकड, तालुकाप्रमुख अजय अवचार, आकाश कास्तोडे, बालासाहेब बोराडे, इलियास कुरेशी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday, 15 January 2019

नगरसेवक मतीन वर बलात्कारचा गुन्हा


औरंगाबाद प्रतिनिधी : एमआयएममधून बडतर्फ
वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर सिटी
चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी बलात्काराचा गुन्हानोंदविण्यात आला. त्याने एका महिलेस नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे.दोन महिन्यांपूर्वी एका नगरसविकला हा मतीनने फूस लावून पळवून नेल्याची चर्चा होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रशीदपुरा येथे राहणाच्या ३० वर्षीय महिलेस पतीने सोडून दिलेले आहे.सध्या ती दोन मुलांसह तिच्या आईसोबत राहते. वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवून मिळावे म्हणून ती नगरसेवक सय्यद मतीन याच्या कार्यालयात गेली होती. त्यावेळी मतीनने गोड बोलून तिच्याविषयी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आधार कार्ड बनवून देतोच, शिवाय नोकरी मिळवून देतो,असे आमिष दाखविले. नंतर तिच्याशी जवळीक करीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लगट केली.महिलेने लग्नासाठी तगाला लावला असता तो टाळाटाळ करू लागला. वर्ष होत आले तरी मतीन लग्न करत नसल्याने महिलेने अखेर त्याला दरडावून विचारले, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला.मतीनने आपल्याला फसविल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस आयुक्तांकडे मतीनविरुद्ध तक्रार केली. आयुक्तांनी सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब शिंगारे यांना महिलेची तक्रार घेऊन मतीनवर कारवाईचे आदेश दिले. त्यावरून मंगळवारी सायंकाळी महिलेने तक्रार दिल्यावर पोलिसांनी                मतीनविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मंठा येथे मकरसंक्रांत निसर्गाचा संदेश देऊन साजरी.

मोसीन कुरेशी
प्रतिनिधी मंठा:मंठा येथे मकर संक्रांत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली आपापल्या रीतीरिवाजाप्रमाणे ठिकठिकाणी महिलांनी साजरी केली परंतु यावर्षी तुकाराम नगर मंठा येथे शोभा लक्ष्मीकांत जोशी परिवाराने मकरसंक्रांत रीतीरिवाजाप्रमाणे साजरी करून त्यांनी एक समाजामध्ये झाडे लावा झाडे जगवा हा मूलमंत्र जपत त्यांनी ढोल ताशाच्या गजरात प्रत्येक महिलांना झाडे लावण्यासाठी  कुंडां चे वाटप केले   व हिंदू सणा बरोबर निसर्गाचा कसा समतोल राहील तसेच प्रत्येक महिलांनी झाडे     जगवा हा संदेश दिला झाडे लावा झाडे जगवा या मागचा उद्देश होता जसे प्रत्येक माता आपल्या मुलाला सांभाळते त्याचप्रमाणे आपण एक नवीन वर्षाचा संकल्प करून प्रत्येक महिलांनी आपल्या घरासमोर झाड लावून आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करावे एवढा साधा उद्देश ठेवून मी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे त्या म्हणाल्या नवीन खेळणी चायनीज खेळणी या सर्व गोष्टीला फाटा देत त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतला त्यामुळे म्हणत्यात हा नवीन संकल्प करून आपले कार्य उद्दिष्ट केले असाच नवीन नवीन विचार करून आपली हिंदू सण पण असेच साजरे केले तर निश्चितच निसर्गाचा समतोल आपण राखू शकू  येणाऱ्या नवीन पिढीला एक चांगला संदेश पोहोचेल त्यांना सहकार्य करण्यासाठी श्री लक्ष्मीकांत जोशी नंदकिशोर जोशी सुनील जोशी व त्यांच्या परिवाराने साथ दिली

नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम

मंठा प्रतिनिधी:डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 14 जानेवारी रोजी येथील नामविस्तार दिनानिमित्त मंठा तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. यावेळी राजा खंदारे,गणेश वाघमारे,नगरसेवक अरुण वाघमारे,राजा घुले अड़.मोरे काका,नितिन मोरे,प्रदीप वाघमारे,सुरेश वावळे,राहुल गोंडगे,शरद मोरे,अनिल अंभोरे आदी उपस्थित होते.