कॉंग्रेसचे दलितनेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद
मोसीन कुरेशी
बंगळुरु : जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री म्हणून बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर गुरुबारी विधानसभाध्यक्षांची निवड करण्यात येईल. शपथविधीनंतर आपण विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडू, असे कुमारस्वामी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या के.आर रमेशकुमार यांचे नाव निश्चित केले आहे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर अन्य मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप केले जाईल, असे कुमारस्वामी म्हणाले.
No comments:
Post a Comment